एनएमआयईटीत इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकाथॉन व अन्वेषणा २०२५ स्पर्धा यशस्वी

तळेगाव दि.23 (प्रतिनिधी) : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NMIET) येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) तर्फे इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) व अन्वेषणा २०२५ या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले.



या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागांमधील तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. एकूण ५० संघांपैकी ४५+५ संघांची निवड स्मार्ट इंडिया हॅकाथॉन पोर्टलवर पाठविण्यासाठी करण्यात आली. तर अन्वेषणा २०२५ या स्पर्धेत ५ संघ विजेते ठरले असून, अनेक संघ प्रादेशिक स्तरावरील अन्वेषणा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकाथॉन तसेच अन्वेषणा स्पर्धेसाठी सक्षम करणे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IIC विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अथर्व जगताप, उपाध्यक्ष कौशल पवार व आकांक्षा पाटील, सचिव अथर्व चव्हाण, खजिनदार ओम बहाले तसेच सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले.



या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. नीलिमा बावणे (एसआयएच एसपीओसी) आणि डॉ. एम. के. बिरादार (कन्व्हेनर व असोसिएट डीन, IIC) यांनी केले. स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून उद्योजक श्री. विराज सरनाईक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एस. एन. सपली तसेच सीईओ डॉ. आर. एस. जहागीरदार यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा