शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नाही तर तो विद्यार्थ्यांचा आयुष्याचा शिल्पकार असतो - माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे

 

जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करताना माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे,माजी नगरसेवक संतोष भेगडे व इतर मान्यवर

तळेगाव दाभाडे दि. 29 (प्रतिनिधी) : शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नाही तर तो विद्यार्थ्यांचा आयुष्याचा शिल्पकार असतो असे मत माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे  यांनी शिक्षक परिषद मावळ आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारानिमित्त व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ व  नगरसेवक  संतोषभाऊ भेगडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला.यावेळे बाळा भेगडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी  पुणे पीपल्स को-ऑफ बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे, नगरसेवक अरुण माने, वडगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, जिल्हाध्यक्ष  निलेश काशिद, कार्यवाह महेश शेलार,  संघटनमंत्री रामदास अभंग, डोळसनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित भसे,राजेंद्र भांड, धनकुमार शिंदे, जिल्हा प्रतिनिधी भाऊसाहेब आगळमे, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष राम कदमबांडे कार्यवाह देवराम पारीठे, कार्याध्यक्ष अशोक कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळा भेगडे म्हणाले की,शिक्षक आपल्या ज्ञानाने अनुभवाने आणि मार्गदर्शनाने नव्या पिढीला घडवतो संस्कार देतो आणि त्यांच्या स्वप्नांना गती देतो.


यावेळी बोलताना संतोष भेगडे म्हणाले की,शिक्षक पुरस्कार हा केवळ सन्मान नाही तर शिक्षकांच्या अथक परिश्रमाचा, निष्ठेचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव आहे.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला काळे निलेश काशिद,महेश शेलार, गुलाबराव गवळे यांची मनोगते व्यक्त केली. 
 यावेळी शिक्षकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार तसेच गुलाबराव गवळे यांनी विशेष कार्यगौराव सन्मानाने सन्मानित करण्यात आले  मावळ तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाला नवा सन्मान मिळाला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राम कदमबांडे यांनी मानले सुत्रसंचलन भारत काळे, वैशाली कोयते यांनी केले तर आभार समीर भेगडे यांनी मानले
 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सल्लागार विलास भेगडे, धनंजय नांगरे, नारायण असवले, पांडुरंग पोटे,संभाजी बोऱ्हाडे, बाळासाहेब पाचारणे,जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण मखर, भाऊसाहेब खोसे,भारत काळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष सोपान असवले,संदिप क्षीरसागर, कोषाध्यक्ष गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, सहकार्यवाह रियाज तांबोळी, संघटनमंत्री श्रीनिवास गजेंद्रगडकर,संजय हुलावळे, समीर गाडे, संतोष बारसकर, सुनिल मंडलिक,नरेंद्र इंदापूरे, संपत गोडे, गणेश दातीर, दिलीप पोटे, दिनेश टाकवे, बळीराम भंडारी सर्व शिक्षकांनी  विशेष परिश्रम घेतले. 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा