टी.जे.महाविद्यालयाच्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता उपक्रमांचे गुजरात राज्य शिष्टमंडळाकडून भरभरून कौतुक


खडकी: दि. ११ ( प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान ( 'अ' श्रेणी: स्वायत्त) महाविद्यालयास गुजरातमधील शासकीय कला महाविद्यालय रानवाव, पोरबंदर आणि शासकीय कला महाविद्यालय अमीरगड या दोन शासकीय महाविद्यालयांच्या शिष्टमंडळाने शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. या शिष्टमंडळात दोन्ही शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. जोशी, प्राचार्य नयनकुमार सोनारा यांच्या सहसहाय्यक प्राध्यापक एम.ए.पटेल,आर. जे.पारमार,आर.के. कोडीयातर,जयकुमार बुद्धदेव, फराहीना शेख, वर्षा चौधरी यांचा समावेश होता. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने मिळवलेली नॅक 'अ' श्रेणी, स्वायत्त दर्जा, संशोधनातील वैविध्यपूर्ण कार्य,नवनवीन उपक्रम,पेटंट व क्रीडा क्षेत्रातील विशेष प्राविण्य अभ्यास पाहणीसाठी हे शिष्टमंडळ विशेष भेटीवर आले होते.
या शिष्टमंडळाने महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील प्रत्येक विभागाची पाहणी करून अध्ययन-अध्यापन पद्धती,संशोधन उपक्रम,पेटंट कार्य,बेस्ट प्रॅक्टिसेस यांचा आढावा घेतला.तसेच एन. एस. डी. सी.कौशल्य विकास केंद्र, रेडिओ टी.जे. 89.6,एफ.एम., शूटिंग रेंज, ग्रंथालय, एन. एस. एस., एन सी सी, क्रीडा विभाग,परीक्षा विभाग, कार्यालय, या सर्व विभागांना भेटी देऊन सर्व माहिती जाणून घेतली. प्रत्येक विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. 'आजची ही भेट आम्हा सर्वांसाठी संस्मरणीय ठरली' असल्याचे सदस्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री.कृष्णकुमार गोयल यांनी या शिष्टमंडळास शुभेच्छा देताना सांगितले की,गुजरातहून आलेल्या शासकीय महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने टी.जे. महाविद्यालयाची केलेली निवड आम्हा प्रत्येकासाठी अभिमान व गौरवाची बाब आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे शैक्षणिक देवाणघेवाण अधिक दृढ होईल, नव्या संधी उपलब्ध होतील, आणि टी. जे. महाविद्यालयाचे उपक्रम देशपातळीवर आदर्शवत ठरतील.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले की, 'विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोगशील उपक्रम,संशोधन व सामाजिक बांधिलकी हीच टि.जे.महाविद्यालयाची खरी ओळख आहे.शैक्षणिक देवाणघेवाण ही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम बनवते. गुजरात सारख्या राज्यबाहेरील दोन शासकीय महाविद्यालयाचे शिष्टमंडळ आपल्या महाविद्यालय भेटीसाठी येते आहे, हे आपल्यासाठी जसे गौरवाची बाब असली तरी आपली जबाबदारी इथून पुढे निश्चितपणे वाढलेली आहे. अजून आपल्याला खूप काही करायचे आहे.याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची आहे.त्यासाठी प्रत्येकाने गुणवता वृद्धिंगत करण्यासाठी कायम सज्ज राहिले पाहिजे.या अभ्यास दौऱ्यामुळे दोन राज्यांतील महाविद्यालयांमध्ये परस्पर सहकार्य व नवे शैक्षणिक प्रयोगांची देवाणघेवाण होईल.असे मत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अनिल मेहता, सचिव श्री.आनंद छाजेड,आणि सदस्य रमेश अवस्थे व पदाधिकारी उपस्थित होते.




या शिष्टमंडळातील प्राचार्य आर.बी.जोशी व जयकुमार बुद्धदेव यांनी मनोगते व्यक्त केली.त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'टी.जे.महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण,संशोधन कार्य,नवनवीन उपक्रम व गुणवत्तापूर्ण अध्यापन खरोखरच अनुकरणीय आहे. प्राचार्य,प्राध्यापक व संस्थासंचालक यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे महाविद्यालय देशातील इतर महाविद्यालयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.आम्ही सर्वजण अक्षरशः भारावून गेलो.आम्ही आमच्या महाविद्यालयात हे सर्व उपक्रम राबवू.आपण सर्वजण आमच्या महाविद्यालयास भेट देण्यासाठी आवर्जून या' असे निमंत्रण दिले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक प्रा. गौरी माटेकर यांनी केले,त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाची ओळख करून दिली.यावेळी उपप्राचार्य प्रा.महादेव रोकडे, सर्व विभागप्रमुख,सर्व प्राध्यापक वृंद,कार्यालय अधीक्षक श्री.लक्ष्मण डामसे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.सुचेता दळवी यांनी केले,तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले यांनी मानले.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा