मला घडविण्यात शिक्षकांचा मोठा हातभार : अभिनेते भूषण प्रधान शिक्षक दिनानिमित्त इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेमध्ये शिक्षकांचा सन्मान

 

तळेगाव दाभाडे, दि. ०४ : इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या नावातच मंदिर आहे आणि तुम्ही सगळे शिक्षक त्यातील देव आहात. शिक्षकांचा सन्मान करण्याचा मान मिळणे, हे माझे भाग्य आहे. मी जे घडलोय, जे आयुष्य जगतोय त्यामागे आई वडिलांसोबतच शिक्षकांचा मोठा हातभार आहे, असे प्रतिपादन अभिनेते भूषण प्रधान यांनी केले. 



      इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. अभिनेते भूषण प्रधान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, संचालक संदीप काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, उपप्राचार्य एस. पी. भोसले, अमृता सुराणा, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. 



            अभिनेते भूषण प्रधान म्हणाले, पहिली शिक्षिका आई आहे. शिक्षकांची कौतुकाची थाप आयुष्यात खूप काही देऊन जाते. त्यांच्यामुळे शिस्तप्रिय झालो. आमच्या मुख्याध्यापिकेमुळेच आज मी अभिनय क्षेत्रात आहे. कॉलेजमुळे व्यक्तिमत्व घडले. मी आज स्ट्रेस फ्री असतो याचे श्रेय शिक्षकांनाच जाते. लहानमोठ्यांचा आदर कसा ठेवायचा, हे त्यांच्याकडूनच शिकलो. फिटनेस सोबतच शिकण्याची आवड कायम ठेवा. शिक्षक विद्यार्थी बॉण्ड कमी झाला आहे. शिक्षकांच्या कार्याची कशातच गणना होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते.



      आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले, इंद्रायणी महाविद्यालय सुरू झाल्याच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. तेव्हापासून आजपर्यंतची संस्थेची प्रगती थक्क करणारी आहे. संस्थेला मोठे करण्यात शिक्षकांचा मोठा हातभार आहे. त्यांच्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांची दूरदृष्टी व सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांचे सहकार्य यातून संस्था भविष्यात अजून मोठी झेप घेईल, असे शेटे म्हणाले.



        संदीप काकडे यांनी सांगितले, की सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहेत. शिक्षकांमुळेच संस्था उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. शिक्षण हे व्रत म्हणून शिक्षक सेवा करीत असतात.    



          कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. संस्थेच्या इतिहासाची उजळणी करत आजपर्यंतच्या प्रगती पर्यंतचा टप्पा उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. यावेळी शिक्षण व्यवस्थेबद्दल डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि महापुरुषांनी पेरलेल्या विचारांतून घडलेल्या समाजाचे मंथन व शिक्षण व्यवस्थेचे आकलन करणे हे शिक्षक दिनाचे फलित असावे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. मलघे लिखित 'भूक आणि भाकरी' या  पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.




         अतिथी परिचय प्रा. सत्यजित खांडगे यांनी, सूत्रसंचालन प्रा. दीप्ती कन्हेरीकर, प्राची भेगडे यांनी, तर आभार प्रा. एस. पी. भोसले यांनी मानले. सांस्कृतिक विभागाचे प्रा. कृष्णा मिटकर, प्रा. आर. आर. डोके आदी प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.



डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay







Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा