मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल



तळेगाव दाभाडे. सोमवार दि. २२ (प्रतिनिधी ) पुणे जिल्हा कार्यालय क्रीडा अधिकारी पुणे व इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मावळ तालुकास्तरीय स्पर्धेत याही वर्षी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षाखालील गटातील मुलींनी प्रथम क्रमांकाने  बाजी मारली. तसेच 14 वर्षाखालील गटातील मुलींनीही द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उंचावले. त्याचबरोबर 17 वर्षाखालील मुलांच्या गटाने व्हॉलीबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक फटकावला व या तीनही गटांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या क्रीडा शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे, शाळेचे मुख्याध्यापिका मिस टी. एन.साईलक्ष्मी उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत या सर्वांनीही या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या क्रीडाशिक्षक श्री. अशपाक मुलाणी,  शाळेच्या सहशिक्षिका सौ. रश्मी नाटे,  श्री. बबन पिलाणी व अविनाश पवार  यांचे खूप खूप कौतुक केले.  या स्पर्धा इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आल्या होत्या. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. रामदासजी काकडे साहेब हे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून सर्व मुलांना व शिक्षकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन गेले.



या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह मा.श्री. चंद्रकांत शेटे , इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे तसेच मावळ तालुक्यातील अनेक शाळांचे क्रीडाशिक्षक उपस्थित होते. प्रतिस्पर्धी म्हणून असलेला आंतरभारती बालग्राम स्कूल लोणावळा यांचा संघ होता.अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात 17 वर्षाखालील गटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला तर 14 वर्षाखालील मुलींनी द्वितीय क्रमांक पटकाकावला व आपले कसब दाखवून हे विजेतेपद खेचून आणले.



बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा