रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे पोलीस बांधवांना जेवणाच्या किटचे वाटप



तळेगाव दाभाडे दि. ३ (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ मावळ ही संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असते. गणपती विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांकरिता रात्रीच्या जेवणाची सोय या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मावळ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या,पुस्तके,शालोपयोगी वस्तूंचे वाटप, विद्यार्थिनींकरिता गुड टच व बॅड टच या विशेष व्याख्यानांचे आयोजन, रायलाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम, वृक्षारोपण,गोदान अशा अनेक उपक्रमांपैकीच पोलीस बांधवांना या संस्थेचे वेळोवेळी सहकार्य असते. 



गणपती विसर्जना करिता तळेगाव दाभाडे व सोमाटणे परिसरात एकूण 225 पोलीस कर्मचारी कार्यरत होते.या पोलीस बांधवांना बंदोबस्तावेळी रात्रीच्या जेवणाची सोय दरवर्षी क्लबच्या माध्यमातून केली जाते,अशी माहिती क्लबचे संस्थापक मनोज ढमाले यांनी दिली.



विसर्जन मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय,राज्य राखीव पोलीस दल,होमगार्ड येथून जादाची कुमत मागवली जाते. या सर्व पोलीस बांधवांच्या रात्रीच्या जेवणाची सोय संस्थेच्या माध्यमातून केली जाते. 



त्यांच्या या कामाचं कौतुक तेथे उपस्थित पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी केलं.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मावळचे संस्थापक मनोज ढमाले,अध्यक्ष विशाल सांगडे,सचिव रेश्मा फडतरे,माजी अध्यक्ष ॲड.दीपक चव्हाण,सदस्य अमोल नरवडे,नवनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी डॉ.रवींद्र पंडित यांचे विशेष सहकार्य लाभले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा