नुतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे जिल्हा क्रीडा स्पर्धेत यश


 

तळेगाव दाभाडे दि. २९ (प्रतिनिधी)  पुणे जिल्हा क्रीडा विभाग समितीच्या वतीने आयोजीत प्रतिभा महाविद्यालय चिंचवड येथे दिनांक  २५ सप्टेंबर  रोजी झालेल्या शूटिंग (मुले व मुली) स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतनुतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्शद दिलावर संदे याने एअर रायफल (पिस्तूल १० मीटर्स रेंज) द्वितीय क्रमांक पटकावला.



तसेच मुलींच्या (पिस्तूल एअर रायफल १० मीटर रेंज) या प्रकारात मोक्षदा लाखेसिंग परमार यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. दिनांक २९/०९/२०२५ ला दोघांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 




कॉलेजचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे , उपाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे,कॉलेज चे कार्यकारी समिती चे चेअरमन राजेश म्हस्के, स सचिव नंदकुमार शेलार,संतोष खांडगे, सीईओ रामचंद्र जहागिरदार, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख व  राजेंद्र लांडगे क्रीडाशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.



डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा