व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे अंत्योदय दिन तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोणावळा दि. २६ (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत अंत्योदय दिन तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाची सुरुवात पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर प्रथम वर्षातील विद्यार्थी प्रतिक हनवटे, शेखर झिंजाडे, आदित्य उबाळे, तेजस असाळ, रिया धाडके, श्वेता अंबेगावे, संस्कृती कचरे व स्वाती लोमटे यांनी उपाध्यायजींच्या जीवनकार्याविषयी माहिती सादर केली. तसेच अजय विश्वकर्मा, श्वेता जाधव व श्रुष्टी कुंभार यांनी पोस्टरद्वारे जनजागृती केली.



या कार्यक्रमासाठी संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भगवान आंबेकर, ॲड. संदीप अगरवाल, श्री. नितीन गरवारे व श्री. स्वप्नील गवळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. हरीश हरसुरकर यांच्यासह प्रा. हुसेन शेख, प्रा. सोनी राघो, प्रा. सायली धरणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा शाह,  प्रा. प्रिती चोरडे, प्रा. तनुजा हुलावळे, प्रा. सुनिल परगे,  प्रा. अमिषा नाईक, प्रा. अनुप देशमुख, प्रा. श्रीकांत घाटगे, प्रा. मोनाली देशमुख, प्रा. मानसी बसुतकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. श्रद्धा पुजारी तसेच श्री. पराग मराठे, श्री. नंदू ठाकर, स्नेहल कुटे, श्री. वैभव कापसे व श्री. रघुनाथ शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा