एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे, दि. ०७ (प्रतिनिधी)  माईर एमआयटी पुणेच्या एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संस्थेतील २५ वर्षांपेक्षा जास्त सेवा बजावणाऱ्या वरिष्ठ शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पीएसएम विभागाच्या मानद प्राध्यापक डॉ. रत्ना मजुमदार, सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन नाईक, सर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. निखिल फडके, पॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. स्मिता भिडे, पीएसएम विभागाच्या सहप्राध्यापक डॉ. स्वाती राजे, फार्माकॉलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश पेंटेवार यांचा संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास व प्राचार्या डॉ. दीपा नायर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षकांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड व संस्थेचे वैद्यकीय संचालक कै. डॉ. सुरेश घैसास यांचे आभार मानले.
कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की “आपल्या समाजातील प्रत्येक घटकाकडून आपण काही ना काही शिकत असतो आणि तो आपला गुरु ठरतो.” तसेच त्यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना आपले प्रथम गुरु  मानले असून कै. डॉ. सुरेश घैसास यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे नमूद केले. कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास यांनीही आपले मनोगत व्यक्त करून गौरवण्यात आलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुषमा शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्या डॉ. जेनीस जैसन यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉ. तुषार खाचणे, भौतिकोपचार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल घोडे, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूर्वा मांजरेकर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा