सुदृढ समाज निर्मितीसाठी स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे: गणेश काकडे

 


तळेगाव दाभाडे दि. ५ (प्रतिनिधी) : 


सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता श्रीरंग कलानिकेतन,  वनश्री, तळेगाव स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाला. परमात्मा हे एकमेव सत्य आहे. मानवता हा खरा धर्म आहे. मानव धर्माचा संदेश आत्मसात करा. पुरातन काळापासून सामाजिक एकोपा आणि स‌द्भावना वृद्धिंगत करण्याचे काम महिलांनी केले आहे.सुदृढ समाज निर्मितीसाठी  स्त्रियांचे योगदान मोठे आहे. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर गणेश काकडे यांनी केले. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तळेगाव  दाभाडे शहरातील जवळपास ७५ महिलांनी सहभाग नोंदवला होता. गणेश काकडे म्हणाले, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या माध्यमातून तळेगाव शहर परिसरात मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महिलांची उपस्थिती आणि अतिशय नेटका सोहळा हे आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून काकडे यांनी गौरी आणि गणपतीचे महत्त्व विशद केले. पुराणातील अनेक दाखले दिले. गणेश काकडे यांचे भाषण ऐकताना सर्व महिला भारावून गेल्या होत्या.



मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक रोहित लांघे, राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे शहर महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, मनकर्णिका महिला महासंघाच्या संस्थापिका वीणा करंडे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका शालिनी झगडे, हेमलता दाभाडे, लता घोलप, अर्चना दाभाडे, संध्या देसाई, निलिमा गुंजाळ, संध्या जाधव, मोहिनी काळे, शितल शहा, ज्योती राजीवडे, सुजाता कुलत, अनिल वेदपाठक, परीक्षक  योगेश कार्लेकर आदी उपस्थित होते.



पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून केलेल्या या  सजावटींमधून बक्षीस देण्यात आले.  यात संध्या अळसुंदेकर  यांनी  विशेष प्राविण्य महापैठणी आणि सन्मानचिन्ह  पटकावले.  वृषाली भेगडे  प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. पैठणी आणि  सन्मानचिन्हाच्या  त्या मानकरी ठरल्या. काव्या  दवणे यांना द्वितीय क्रमांक मिळाला.  सोन्याची नथ आणि सन्मानचिन्ह असे या बक्षिसाचे स्वरूप होते.  पूनम बैरागी यांना तृतीय क्रमांक मिळाला.  चांदीचा छल्ला आणि सन्मानचिन्ह असे या बक्षिसाचे स्वरूप होते.  यावेळी प्रिया मोडक,  सोनाली गायकवाड,  स्वाती भेगडे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.  तांब्याचा भांड्यांचा सेट आणि सन्मानचिन्ह असे या बक्षिसाचे स्वरूप होते. सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिव केदार शिरसट, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी,  खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, माजी अध्यक्ष महेश भागीवंत, सुरेश शिंदे यांच्यासह प्रेस फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.



कार्यक्रमादरम्यान पाच लकी ड्रॉ काढण्यात आले.  यात भाग्यवान  विजेत्यांना २५ लिटर क्षमतेचे पाण्याचे जार देण्यात आले. सहभागी स्पर्धकांना  आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.  यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.   शैलाजा काळोखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  योगेश कार्लेकर यांनी स्पर्धेतील निकष आणि यापुढे घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.
प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा  फडतरे यांनी  प्रास्ताविक आणि  स्वागत केले. संस्थापक विलास भेगडे यांनी प्रमुख अतिथी गणेश काकडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ संदीप गाडेकर आणि रमेश  फरताडे यांनी केले. अमित भागीवंत  यांनी आभार मानले. स्पर्धक आणि उपस्थित महिलांसाठी अल्पपोहाराची खास व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा