व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन

  


लोणावळा दि. २४ (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना देशाच्या अखंडतेसाठी कार्यरत असलेल्या महान नेत्यांची माहिती देण्यात आली. लौहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वगुणांवर विशेष माहिती देण्यात आली तसेच त्यांनी केलेल्या कार्याची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आली.



यानंतर ऑपरेशन पोलो या ऐतिहासिक लष्करी मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेमुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले व देशाची भौगोलिक एकता अधिक दृढ झाली. तसेच कलम ३७० च्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम रद्द झाल्यामुळे भारताची खरी एकात्मता व समानता अधोरेखित झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.


संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भगवान आंबेकर, ॲड. संदीप अगरवाल, श्री. नितीन गरवारे व श्री. स्वप्नील गवळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख, प्रा. सोनी राघो, प्रा. सायली धरणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा शाह, प्रा. प्रिती चोरडे, प्रा. किरण शारीकर, प्रा. तनुजा हुलावळे, प्रा. सुनिल परगे, प्रा. नम्रता जंगम, प्रा. अमिषा नाईक, प्रा. अनुप देशमुख, प्रा. श्रीकांत घाटगे, प्रा. मोनाली देशमुख, प्रा. मानसी बसुतकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. श्रद्धा पुजारी, श्री. पराग मराठे, श्री. नंदू ठाकर, श्री. स्नेहल कुटे, श्री. वैभव कापसे, श्री. रघुनाथ शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा