तळेगावात प्रथमच आगळं वेगळं असं प्रेरणादायी सुविचारांचं प्रदर्शन... जीवन मूल्यांचे सामर्थ्य समजणार....

 


तळेगाव दाभाडे दि. ३ (प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी १० ते सायं.५ या कालावधीत कलापिनी सांस्कृतिक केंद्र तळेगाव दाभाडे या ठिकाणी तळेगावात प्रथमच आपलं वेगळं असं प्रेरणादायी सुविचारांचं प्रदर्शन भरणार आहे,  ज्यामधून जीवन मूल्यांचे सामर्थ्य समजणार आहे.



मनुष्याला आज दैनंदिन आयुष्य जगताना अनेक  प्रसंगांना सामोरे जावं लागते. अशावेळी  प्रेरणादायी सुविचारांची खूप गरज असते. ती गरज पूर्ण व्हावी याकरीता कोणीही कधीही न भरवलेलं असं प्रदर्शन यशाचा मंत्र ,सुखाचा मंत्र ,एक वास्तव, एक प्रश्न ,एक सत्य ,एक चूक ,एक खंत ,चिंतन या सदराखाली मानवी जीवन मूल्यांवर सकारात्मक विचार प्रदर्शित करण्याचा एक छोटासा प्रयत्न प्रा. राजेंद्र पवार यांनी केला आहे. मानवी जीवनातील प्रेम मैत्री नातेसंबंध सुख- दुःख, यश- अपयश, भाव- भावना विचार कृती या विषयावर सकारात्मक विचार करणारे 108 प्रेरणादायी सुविचारांचं प्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे. 



सदर प्रदर्शनातून प्रेक्षकांना निश्चितच पुढील फायदे होणार आहेत.
१. सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करणे 
2. स्वतःची स्वतःबरोबर एक वेगळी ओळख करून देणे.
3. मानवी जीवन मूल्यांचं सामर्थ्य समजावणे.
     सदर प्रदर्शनास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश साखवळकर संपादक, साप्ताहिक अंबर हे उपस्थित राहणार आहेत.  तरी सर्वांनी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राजेंद्र भिकन पवार (संपर्क नंबर  9604625320 ) यांनी केले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay







Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा