वडगाव मावळ दि. 9 (प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव मावळ येथे माजी मंत्री मदनजी बाफना शैक्षणिक संकुलात सर्व शाखांतील शिक्षकांचा संस्थेच्या वतीने 09 सप्टेंबर 25 रोजी माजी उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित शिक्षक दिन समारंभात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक संचालक राज खांडभोर यांनी केले, त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या प्रगती विषयक आढावा सांगितला व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले.
त्यानंतर संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. न्यू. इंग्लिश स्कूल टाकवे चे मुख्याध्यापक आनंदराव जांभूळकर, भैरवनाथ विद्यालय घोणशेत चे मुख्याध्यापक नारायण पवार, महादेवी माध्यमिक विद्यालय इंगळून चे मुख्याध्यापक देवेंद्र कांडेकर, हरकचंद रायचंद अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य हिरामण लंघे, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ च्या प्राचार्य डॉ.अनिता धायगुडे, कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यापक महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक महादेव सांगळे यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ह. रा. बाफना विद्यालयाच्या प्रा. शुभांगी हेंद्रे यांनी शिक्षक दिनानिमित्त विस्तृत माहिती सांगून शिक्षकांचे महत्व पटवून दिले. त्यानंतर अध्यापक महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.संदीप गाडेकर यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अपेक्षित असलेल्या शिक्षकांची जबाबदारीची ११ कर्तव्ये सांगितली, कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगितला. भैरवनाथ विद्यालय घोणशेत येथील सुनंदा कडूसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव अशोकजी बाफना यांनी सर्व शाखांतील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले व डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांनी सांगीतले प्रमाणे सर्व शिक्षकांनी सतत आपले ज्ञान अद्यावत करावे व विद्यार्थ्यांना केंद्रबिंद मानून अध्यापन करावे असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक श्री राजेश बाफना, श्री. चंद्रकांतजी ढोरे, श्री. दत्ताजी असवले सर्व शाखांतील प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने ३२ वर्ष प्रामाणिक सेवा दिल्याबद्दल अध्यापक महाविद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक सुरेश घोजगे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक महाविद्यालयांच्या सहा. प्राध्यापक ज्योती रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने व स्वादिष्ट अशा भोजनाने झाला.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment