फोटो- पिंपरी: 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांचा सत्कार करताना पद्मश्री गिरीश प्रभुणे, आमदार अमित गोरखे, डॉ. संदीप पाचपांडे आणि मान्यवर.
पिंपरी : 24 सप्टेंबर, (विशेष प्रतिनिधी)
पानिपतकार विश्वास पाटील यांची 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक ठरली आहे. या निमित्ताने औद्योगिक शिक्षण मंडळाच्या सभागृहात झालेल्या समारंभात त्यांचा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समारंभात बोलताना पद्मश्री प्रभुणे म्हणाले, “विश्वास पाटील यांच्या निवडीमुळे मराठी साहित्याला नवी दिशा मिळाली आहे. ते लिहिते-बोलते साहित्यकार असून त्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्राचा दुर्लक्षित इतिहास समोर आला. पानिपत, झाडाझडती आणि महानायक ही महाकाव्यांच्या तोडीस तोड अशी साहित्यकृती आहेत. शेतकरी मातीतून आलेल्या साहित्यिकाची ही निवड मराठी साहित्याला नवे दिवस आणणारी ठरेल.” त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि औद्योगिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, संस्था अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, पिंपरी चिंचवड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, यशस्वी ग्रुप अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, टास्क फोर्स प्रमुख डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, प्राचार्य डॉ. ललित कानोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजन लाखे यांनी केले.
सत्कारास उत्तर देताना विश्वास पाटील यांनी त्यांच्या साहित्यिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी तरुणाईला संदेश देताना म्हटले, “मोबाईलच्या नादात घराघरातील संवाद हरवला आहे. तंत्राचे गुलाम न होता त्याचा मंत्रासारखा वापर करा. माय मराठीच्या माध्यमातून संस्कृती, प्रकृती आणि चैतन्य टिकवा.” यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेवर आधारित त्यांच्या आगामी आस्मान भरारी या साहित्यकृतीविषयीही माहिती दिली.
या प्रसंगी आमदार अमित गोरखे, डॉ. संदीप पाचपांडे आणि विश्वेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी केले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/
Comments
Post a Comment