श्री जीवन मूल्यांचे सामर्थ्य वाढविणाऱ्या प्रेरणादायी सुविचारांचे प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद

तळेगाव दाभाडे दिनांक 14 (प्रतिनिधी) दैनंदिन जीवन जगताना माणसाला अनेक सुखदुःखाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते मनावर नैराश्य पसरत असेल तर ते झटकून टाकावे लागते या उद्देशाने कलापिनी सांस्कृतिक केंद्रात श्री जीवन मूल्यांचे सामर्थ्य वाढविणाऱ्या प्रेरणादायी सुविचारांचे प्रदर्शन प्रथमच तळेगाव दाभाडे शहरात नुकतेच भरवण्यात आले होते. प्रेरणादायी व्याख्याते श्री राजेंद्र भिकन पवार व सौ. सोनल राजेंद्र पवार या दांपत्याने 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त या प्रेरणादायी सुविचारांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन  श्री भिकन दौलत पवार आणि सौ. दमयंती भिकन पवार (आयोजकांचे आई वडील) यांच्या शुभ हस्ते झाले. अंबर साप्ताहिकाचे संपादक सुरेश साखवळकर व कलापिनीचे डॉ. अनंत परांजपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.



जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे केला जात असल्यामुळे सुरेश साखवळळकर व डॉ. परांजपे यांनी राजेंद्र पवार यांचे अभिनंदन केले. अशी प्रदर्शने शाळा कॉलेजमध्ये भरविण्याची सूचना ही त्यांनी केली याबाबत बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की मानवी मूल्यांसाठी सकारात्मक विचारांची आज खूप गरज आहे. प्रेम, मैत्री, नातेसंबंध ,सुख -दुःख, यश -अपयश  आदींवर सकारात्मक मांडणी करणारे 108 प्रेरणादायी विचार या प्रदर्शनात आहे. सकारात्मक विचार स्वतःची वेगळी ओळख करणारा व जीवनमूल्य यांचे सामर्थ्य समजावणार  विचार यामध्ये आहे.



श्री.विलास शहा यांनी मनोगत व्यक्त केले, सौ.. भारती शहा यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. संजय मालकर ,चेतन शहा अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बापूसाहेब भिकन पवार यांनी केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा