अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जागृती अभियान


वडगाव मावळ दि. ९ (प्रतिनिधी): येथील श्री संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयातील ग्रीन क्लब अंतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जागृती अभियान  घेण्यात आले. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही काळाची गरज असल्याने महाविद्यालयात दि. 09 सप्टेंबर 25 रोजी  महाविद्यालयातील प्रांगणात  फुलझाडांचे रोपण करण्यात आले.


 या अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंदानी उत्साहाने सहभागी झाले. संस्थेचे अध्यक्ष श्री. तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव श्री. अशोकभाऊ बाफना, संचालक श्री. राज खांडभोर,श्री राजेश बाफना, श्री. चंद्रकांतजी ढोरे, श्री. दत्ता असवले सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



 महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे  यांनी वृक्षारोपनाचे महत्त्व बद्दल मार्गदर्शन केले. तसेच अध्यापक ग्रीन क्लबचे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन क्लबचे समन्वयक  प्रा. सोनाली पाटील व  प्रा. ज्योती रणदिवे यांनी केले. 


कार्यक्रमास बी.एड महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी,तसेच प्रा. महादेव सांगळे, डॉ कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. शबाना मोकाशी, एम.एड. विभागातील डॉ. दिपा नेवसे, प्रा. संध्या घोडके,डॉ. अनामिका कावरे, ग्रंथपाल सुजाता जाधव, श्री. मोहन कडू, श्री. सुरेश घोजगे वृक्षारोपण कार्यक्रमास सहभागी  होते. तसेच वृक्षारोपण करण्यास श्री. संतोष ढमाले, श्री. रमेश राणे, श्री. विनायक येळवंडे याची मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा