भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पेनुर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पेनुर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न (प्रतिनिधी) दि २५ भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 21/08/2023 रोजी पेनुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पो. नि. श्री. संभाजीराजे गायकवाड, डॉ. स्वामी गुरुजी, अक्षय ब्लड बँकेचे प्रतिनिधी श्री. सागर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. मागील 20 वर्षापासून या संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. सालाबाद प्रमाणे संस्थेने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास यावर्षीही पेनुर व पेनुर परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सहभाग नोंदवला. यावर्षी संस्थेने केलेल्या आव्हानास 161 रक्तदात्यांनी रक्तदान करुन भरभरून प्रतिसाद दिला. यातील गौरवपूर्ण बाब म्हणजे 5 जोडप्यांनीही रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. या सर्व रक्तदात्यांचा उचित असा सन्म...