अन्यायाचा महामेरू भ्रष्ट व्यवस्थेचा खरा बाहुबली कोण ? - श्री .अशोक देवकते

पुणे दि. 23 (प्रतिनिधी) कल्पनेच्या पल्याड सर्व क्षेत्रीय उघडी नागडी मन विषन्न करणारी विषमता ही कोट्यावधी जनतेला नागवते बेघर बेरोजगार करते आणि नेतागिरीही त्यावर पोसते . स्वातंत्र्याची पहाट उजाडून 78 वर्षे झालेल्या गाव गाड्या खेडोपाड्यापर्यंत अंधारमय भविष्यात प्रकाशाची ज्ञानगंगा पोहोचावी असा उसनवारीने आव आणून बेंबीच्या देठापर्यंत कळवळा आणून सांगणाऱ्या सर्वच पांढरपेशी कृती शून्यामुळे बहुजनांच्या पदरी पडते ती निराशा. भारतातील दुष्काळाने तहानलेल्या होरपळलेल्या अन्यायाने पिचलेल्या भेदरलेल्या फाटक्या निरक्षर जनतेने या मस्तवाल भ्रष्ट व्यवस्थेची गचांडी पकडून इंडियाला भारताने खडसावून जाब विचारण्याची वेळ आली आहे. शाळेची लायसन्स बंद दारूची लायसन्स चालू जनतेच्या विकासासाठी दारू विकून महसूल जमवावा लागतो दारिद्र्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रत्येक फाईलवर नैवेद्य ठेवल्याशिवाय सही होत नाही जणू काही हाताला लकवाच मारला आहे ,नाही का ? भांडवलशाही प्रस्थापित घराण्याच्या घशात हातात शिक्षण व्यवस्...