मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; सुदेश गिरमे अध्यक्ष, विशाल विकारी कार्याध्यक्ष तर रामदास वाडेकर यांची सचिवपदी निवड

वडगाव मावळ दि. 29 (प्रतिनिधी): मावळ तालुक्यात प्रथमच मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या संघटनेची स्थापना आणि पदग्रहण समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, लोकमतचे उपसंपादक योगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूरोड पत्रकार संघाचे सर्व सदस्...