Posts

ॲड पु. वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

Image
  तळेगाव दाभाडे दि. 26 (प्रतिनिधी) माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसमोर आपल्या कार्याचे आदर्श ठेवावेत. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक तसेच श्री एकविरा विद्या मंदिर कारला या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे गुरुजी यांनी व्यक्त केले.यावेळी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे विद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार भेगडे, संजय बाविस्कर, श्रीकांत दाभाडे, बहुसंख्येने माजी विद्यार्थी,पालक आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोनबा गोपाळे गुरुजी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.  सामूहिक राष्ट्रगीत ,ध्वजगीत, राज्यगीत,प्रतिज्ञा व प्रार्थना यानंतर घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर दुमदुमला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले.यावेळी शासन परिपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह गीत गायन,समूहनृत्य,भाषण, चित्रकला व हस्तकला दालन यांसारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी तुषार भेगड...

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
  वडगाव मावळ दि. 26 (प्रतिनिधी) वडगाव येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालय, हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज व कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय मदनजी बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकारामजी असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना व सर्व संचालक मंडळ, वडगाव मावळ येथील सर्व प्रतिष्ठित, शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, सर्व प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक, नागरिक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन असल्यामुळे विविध सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यास वडगावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार अमोल पाटील या...

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
  वडगाव मावळ दि. 26 (प्रतिनिधी) वडगाव येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालय, हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज व कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय मदनजी बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकारामजी असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना व सर्व संचालक मंडळ, वडगाव मावळ येथील सर्व प्रतिष्ठित, शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, सर्व प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक, नागरिक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन असल्यामुळे विविध सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यास वडगावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार अमोल पाटील या...

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे ७६ वा प्रजासत्तक दिन उत्साहात साजरा

Image
  तळेगाव दाभाडे दि. २६ (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे  ७६ वा प्रजासत्तक दिन २६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण विद्या प्रसारिणी सभा पुणे च्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे आणि विद्या प्रसारिणी सभा पुणे चे सदस्य श्री नितीन गरवारे सर यांच्या हस्ते करण्यात आले.                या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर, व्ही. पी एस इंग्लिश मीडीअम स्कुल च्या प्राचार्या सौ. निशा नाईक,महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रो.हुसेन शेख, प्रो.सोनी राघो, प्रा.सायली धारणे, रजिस्टर रोहित जगताप उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

सशक्त समाज हेच प्रगतीचे लक्षण - कौस्तुभ कुलकर्णी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे

Image
तळेगाव दाभाडे दि. 26 (प्रतिनिधी) सशक्त समाज हेच प्रगतीचे लक्षण आहे. नवीन उद्योग, आरोग्य, शिक्षण यात अमुलाग्र बदल होत आहे. कुशल मनुष्यबळ हे आजच्या काळाची गरज आहे. मेडिकल, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. त्यासाठी चांगले शिक्षण गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. नवीन उद्योगांकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे असे मत कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते आज इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर कॉन्टिनेन्टल इंटरनॅशनल ग्रुप चे मान्यवर तसेच मिस्टर दुवा किंग उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते. याप्रसंगी खजिनदार शैलेश शहा, संजय साने, निरुपाताई कानिटकर, युवराज काकडे , विलास काळोखे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. संजय आरोटे, आदी मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी होंडाई या कंपनीचे कोरियन अधिकारी आहे मिस्टर किम उपस्थित होते. त्यांनी ह्युंदाई कंपनीच्या प्रगतीचा आढाव...

कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल चा शालेय क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न

Image
तळेगाव दाभाडे दि.२४ (प्रतिनिधी)  कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, संचालिका सोनल काकडे, संचालिका सुप्रिया काकडे, मुख्याध्यापिका ज्योती सावंत, पर्यवेक्षिका शुभांगी वनारे, पर्यवेक्षिका कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या.  या कार्यक्रमानिमित्त नर्सरी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.त्यामध्ये लिंबू चमचा, विठोबा जंप, फ्रॉग जंप, गेट रेडी फॉर स्कूल,कोन कलेक्शन,धावणे,कबड्डी, खो-खो,दोरी उड्या ,बास्केटबॉल ,कॅरम बुद्धिबळ,मॅरेथॉन , लांब उडी यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते.या स्पर्धांमध्ये नर्सरी विभागातील 53, तर प्राथमिक व माध्यमिक विभागातील 252 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे द...

तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक कर्मचा-यांचे मानधन 8 महिन्यांपासून थकीत

Image
  तळेगाव दाभाडे दि.२४ (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय  नं.२ आणि नं.६ येथील कर्मचाऱ्यांचे मानधन मे २४ पासून डिसेंबर २४ पर्यंत मिळाले नाही. यापुर्वीही सदर कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालयात संपर्क साधला असून मुख्याध्यापकांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे.तरीही मानधन न मिळाल्यामुळे  तेथील कर्मचाऱ्यांची अर्थिक कुचंबना होत असुन त्यांना श्री. गणेश उत्सव,दसरा,दिवाळी आदी सणही साजरे करता आले नाहीत.कर्मचा-यांची अर्थिक परिस्थिती हलाखिची झालेली आहे.तातडीने मानधन मिळाले नाही तर सदर कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ येणार आहे आणि यापुढे मानधन दरमहा  वेळच्यावेळी देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन संबंधित कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले असुन ते निवेदन उपमुख्याधिकारी यांनी स्वीकारले आहे.  प्रांतांची सही  झाली नसल्यामुळे सदर मानधन देता आले नाही असे  यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.सदर निवेदनाची प्रत मावळचे विद्यमान आमदार यांनाही देण्यात आलेली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक शाळा  नं.२ आणि नं.६ चे कर्मचारी ...

शाळा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करू: आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

Image
  तळेगाव दाभाडे दि.२२ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी पटसंख्येचा वाढता आलेख कौतुकास्पद आहे. नगर परिषदेच्या शाळांची सर्वांगीण सुधारणा करून शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्याच्या हेतूने शासकीय निधीसह कंपन्यांचा सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले. तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाच्या वार्षिक समारंभाला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक ह्यांच्या अध्यक्षस्थानी होत होते. माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, विलास शहा, दीपक हुलावळे, संदीप शेळके, शिल्पा रोडगे, संध्या थोरात,  आदींसह उपस्थित होते. प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी आमदार श्री सुनील शेळके यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. १४ वर्षाखालील राष्ट्रीय एअर रायफल शूटींग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू अर्शती विजयकुमार सरनाईक हिचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध तालुकास्तरीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राथमिक शाळा क्रमांक सहाचे विद्यार्थी आणि संघानी सर्वाधिक प्रथम बक्षिसे पटकावीत अव्वलस...

इंद्रायणी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Image
 अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी : डॉ. सुनील भिरूड तळेगाव दाभाडे दि.२३ (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी क्षेत्र हे झपाट्याने बदलत असून, एआय, डेटा मायनिंग अँड मशीन लर्निंग, सॉफ्ट कंप्यूटिंग, सिग्नल अँड इमेज प्रोसेसिंग या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. रोबोटीक क्षेत्राच्या माध्यमातून जग प्रचंड बदलत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी केले.              इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेच्या समारोपप्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिरूड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. यावेळी संस्थेचे सदस्य संदीप काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. उत्तम खाडे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या...

प्राचार्य शिवाजीराव कामथे व प्रा.अरविंद मोडक महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
  पुणे दि. २३ (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी पुणे यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना महात्मा फुले सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षीचा हा पुरस्कार पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव, पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष, पुणे शहरातील नामांकित अशा रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, आदरणीय शिवाजीराव कामथे सरांना तसेच पुणे शहर जुनिअर कॉलेज  टीडीएफचे सचिव, शिवाजी मराठा ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आदरणीय अरविंद मोडक सरांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते तसेच मा.दत्तात्रय सावंत मा. शिक्षक आमदार, विपुल वाघमारे (IRS), मा. डॉ. श्रीमंत कोकाटे रावसाहेब मिरगणे शिक्षण निरीक्षक पुणे विभाग, मा. शिवाजीराव खांडेकर कार्यवाहक शिक्षकेतर महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले.  प्राचार्य शिवाजीराव कामथे गेली 27 -28 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून आपल...