प्रा. सुरेखा सुरेश निंगुळे - होळकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
तळेगाव स्टेशन दि. २९ (प्रतिनिधी) प्रा. सुरेखा निंगुळे - होळकर यांना 18 मार्च 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. सुरेखा ह्या सध्या सिद्धांत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील संस्थांमध्ये महिलांचे नेतृत्व विकास व ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढत आहे, यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवसाय विभागातील मानव संसाधन व्यवस्थापन यामध्ये डॉ. सुरेखा निंगुळे यांनी पुणे जिल्ह्यातील गावच्या विकासावर महिलांच्या नेतृत्वाचा प्रभाव (Impact of women leadership in development of villages in Pune district) हा संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला. यासाठी डॉ. अनिता खटके यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे नेविल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च पुणे, येथील संशोधन प्रमुख डॉ. आनंद दडस यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. सुरेखा यांचे सिद्धांत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आर. एस. यादव, उपाध्यक्ष सिद्धा...