Posts

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न

Image
 व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ८ मार्च २०२३ येथील व्ही.पी.एस.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , लोणावळा येथे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सोनी राघो यांनी महिला दिनानिमित्त थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व केक कट करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी प्रा.सोनी राघो, प्रा. प्रीती चोरडे, प्रा. रश्मी भुंबरे, प्रा. मनीषा कचरे, सौ. पूजा साठे, कु. सुप्रिया पेठकर, कु. स्वाती म्हस्के, कु. प्रीतीजा घोलप, आणि सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Image
  अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा तळेगांव स्टेशन(वार्ताहर)  दिनांक 8 मार्च 2023 हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्मिता धुमाळ , ॲड. अर्चना ढोरे व प्रा.वंदना केमसे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्मिता धुमाळ यांनी भूषवले त्यांनी आपल्या भाषणात रोजगार संधी आणि कौशल्य उद्योजकता यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली व वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध आहेत या विषयक मार्गदर्शन केले,  ॲड. अर्चना ढोरे यांनी आपल्या भाषणात कौटुंबिक अत्याचार व कायदे यावर मार्गदर्शन केले तसेच कौटुंबिक अत्याचार कसे थांबवता येतील त्याला आळा कसा घालता येईल यावर मार्गदर्शन केले, प्रा. वंदना केमसे यांनी स्वसंरक्षण मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांनी आपले संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले व कराटे प्रशिक्षण दिले. यावेळी प्रा. महादेव सांगळे, डॉ.कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. सोनाली पाटील ,प्रा. सुजाता जाधव व सर्व बी. एड. व एम.एड. विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम केतकी गटा...

लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच

Image
 लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच मुंबई (संपादक - डॉ.संदीप गाडेकर)  दि.1 मार्च 2023... लढा 100 % अनुदानाचा समान काम, समान वेतन व सन्मानाचा 24 नोव्हेंबर 2001पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयास अनुदान प्राप्त व्हावे यासाठी दिनांक २१ फेब्रुवारी पासून लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असोसिएशनचे ठाणे अध्यक्षा डॉ.मेघा गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यापीठातील नेतृत्व प्रमुख करण्यासाठी आलेले प्राचार्या डॉ.विद्युलत्ता कोल्हे, प्रा.समिर तहसीलदार मुंबई विद्यापीठ, प्रा. डाॅ.धनंजय वडमारे,भागवत करडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद  प्रा.डाॅ.रविंद्र पाटील, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा.डाॅ.सचिन इंगळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर प्रा.डाॅ.संजय खूपासे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्या डॉ.अनिता धायगुडे, प्रा.महादेव सांगळे, डॉ.कविता तोटे, डॉ.संदीप गाडेकर...

व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन

Image
 व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) दि.२७ व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये आठवड्याच्या अंतरात होणाऱ्या सांस्कतिक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसूरकर, प्रा. सोनी राघो व प्रा. प्राणेश चौव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आडठवडयामधील विविध होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेशा ठरवली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त

Image
 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) ट्रेकिंग पलटन पुणे ग्रूप तर्फे सलग तिसऱ्या वर्षी शिव जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंहगडाची अतकरवाडी ते पुणे दरवाजा ही गडवाट प्लास्टिक मुक्त करण्यात आली.  ट्रेकिंग पलटन गृप ची एकूण  ही ९६ वी मोहीम होती. घोड्यांची पागा, दारूगोळा कोठार, पाण्याची टाकं, पुणे दरवाजा मार्गे उतरत अतकरवाडी पर्यंत ट्रेक करत गडवाट च्या दोन्ही बाजूंना उतारावर पर्यटकांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेय बाटल्या तसेच बिस्कीट, वेफर्स अशा कोरड्या खाऊचे पॅकेट्स गोळा करून पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या स्वाधीन केला. असा सुमारे सहा पोती पर्यावरणास घातक कचरा गोळा करण्यात आला. ट्रेकिंग पलटन गृप च्या सदस्यांना कचरा गोळा करताना बघून काही पर्यटकांनी हातभार लावला. काहींनी आभार मानले. काहींनी कौतुक केले.  ट्रेकिंग पलटन गृप गेली सात वर्षे विविध गडावर अशा प्लास्टिक मुक्त अभियान राबवित आली आहे. सुदैवाने हळू हळू प्लास्टिक चे कचऱ्याचे प्रमाण कमी होत चाललेले दिसत आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी गडवाट वरील...

आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश

Image
आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा  स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. 17 कोरोना महामारीनंतर प्रथमच डी.एड.च्या विद्यार्थ्यांच्या कला स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये कॉलेजच्या PPT या स्पर्धेत बाफना डी.एड. कॉलेजची विद्यार्थिनी  कु. प्रीती माटे हिने तृतीय क्रमांक आणि लोकनृत्य या  स्पर्धेत विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य हिरामण लंघे, प्रा.राजेंद्र डोके, प्रा.मनोज गायकवाड, प्रा.शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई , प्रा.योगेश जाधव, नंदकिशोर, सोमनाथ धोंगडे  उपस्थित होते.

वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

Image
  वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न  शिक्षक शिक्षण क्षेत्रासाठी वसुधैव कुटुंबकम् संदेश महत्त्वपूर्ण : डॉ. दिपक माने  आळंदी पुणे : (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) येथील माईर्स, एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज मध्ये विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या  82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे संचालक डॉ. विजय खरे व डॉ. बी. बी. वाफारे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व संशोधक सहभागी झालेले होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये रोमानिया, युरोप मधून  डॉ. आन्का लाँयना निकोलायू, डॉ. नाडा राटकोव्हीक हे सहभागी झाले होते. या परिषदेत एमआयटी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांनी वसुधैव कुटुंबकम या विषयावर 12 शैक्षणिक मॉडेल तयार करून त्याचे सादरीकरण केले होते. सदर परिषदेमध्ये W2...

राजमाता जिजाऊ मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा

Image
 राजमाता जिजाऊ मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  सौ.रूपालीताई चाकणकर  पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ३० पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुणे शहरातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिकांसाठी राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराचे आयोजन पत्रकार भवन ,गांजवे चौक, नवी पेठ येथे करण्यात आलेले होते. यावेळी रूपालीताई चाकणकर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समाज शिक्षित व संस्कृत करण्यामध्ये शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असून शिक्षकाचे कार्य अतुलनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकच एखाद्या विद्यार्थ्यांचा आयुष्य कसं चांगलं घडू शकतात याचा निर्वाळा दिला.    यावेळी पुणे शहरातील तेरा मुख्याध्यापिकांना राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका, बत्तीस शिक्षिकांना ...

प्रेमातूनच जाती अंत शक्य! - प्रदीप निफाडकर

Image
 प्रेमातूनच जाती अंत शक्य! - प्रदीप निफाडकर  तळेगांव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.17 प्रेम ही उदात्त संकल्पना आहे. तिला विनाकारण बदनाम केले जाते. महाविद्यालयीन युवकांनी प्रेमाचा सात्विक अनुभव घेत  आयुष्याला सामोरे जावे त्यातून जाती अंतासारख्या मोठ्या प्रश्नाची उकल सहज शक्य असल्याचे मत सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले.इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  याप्रसंगी प्राचार्य डॉ संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे, प्रा सत्यजित खांडगे,डाॅ संदीप कांबळे,डाॅ प्रमोद बोराडे, प्रा राजेंद्र आठवले तसेच विविध विषयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ऐकले नाही जगाचे छान केले l मी तुला तारूण्य माझे दान केले ll प्रेमाच्या या गझलेचा संदर्भ देत, प्रेमात लिहिलेली गझल जगण्याला उर्मी देते तर दु:खातली गझल वेदनांचा निचरा करते असे निफाडकर म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पंधराव्या शतकापासूनचा गझलेचा प्रवास उलगडून सांगितला तसेच...

विद्यार्थांचा सर्वांगीण विकास जोपासणारी शाळा -सचिव श्री.पोपटशेठ बाफना

Image
  विद्यार्थांचा सर्वांगीण विकास जोपासणारी शाळा  -सचिव श्री.पोपटशेठ बाफना. तळेगाव स्टेशन ( संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.१७ श्री.भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर मुख्याध्यापक श्री.कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली. दिनांक 3/4 जानेवारी. रोजी विद्यालयात क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  कबड्डी,खो - खो,धावणे,उंच उडी, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला.विद्यार्थांनी विविध खेळातील कौशल्य दाखवले.त्यामुळे संस्थेचे सचिव श्री.पोपटशेठ बाफना यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बऊर ग्रामपंचायत संरपंच .श्री.प्रविण भवार,मा.संरपंच श्री.संदिप खिरीड, ग्रामपंचायत सदस्य श्री.शंकर शिंदे, ग्रामस्थ संजय ठोंबरे,भाऊ म्हस्के, संतोष आढाळगे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे कार्यक्षम मुख्याध्यापक श्री.कदम सर यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्पर्धेमध्ये पंच म्हणून श्री.माने सर  श्री. शिंदे सर व श्री. खोसे सर श्री.सुनिल तिकोणे  यांनी काम पाहीले....