Posts

Showing posts from June, 2023

विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त “वृक्षारोपण”

Image
 विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त “वृक्षारोपण” लोणावळा (प्रतिनिधी) दि. 25 विद्या प्रसारिणी सभेचे व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, वाकसई, व्ही.पी.एस. इंग्लीश मेडीयम स्कुल, वाकसई, व्ही.पी.एस. कॉलेज आँफ फार्मसी, वाकसई. लोणावळा येथे  दिनांक २५/०६/२०२३ रोजी विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त “वृक्षारोपण” करण्यात आले. यावेळी नियामक मंडळाच्या अध्यक्षा सौ. डॉ. मृणालीनी गरवारे मॅडम, तसेच कार्यवाह, डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह, श्री. विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य श्री. अरवांदभाई मेहता, श्री. डी. एच. सराफ, श्री. डॉ. एच. बी. निरगुडकर, श्री. भगवान आंबेकर,श्री. के. एस. भुरट, श्री. के. व्ही. कुलकर्णी, श्री. पी. बी. कुदळे, ॲड. संदीप अगरवाल, श्री. प्रेमोद कुदळे,शाला समाती सदस्य,श्री. धीरूभाई टेलर, श्री. राजेश मेहता, संस्था सभासद श्री. नितीन गरवारे, सौ. साधना कुदळे, सौ. विशाखा भुरके, सौ. पुजा भुरके हे सर्व उपस्थित होते. लोणावळ्यातील उद्योजक व समाजसेवक श्री. राजु खंडेलवाल यांनी महाविद्यालयाला 200 फळझाडे बक्षिस दिली. वृक्षारोपणाचे वेळी उद्यो...

संतोष थोरात यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान

Image
संतोष थोरात यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान   पुणे (प्रतिनिधी) दि. २४ पुणे शहर टीडीएफचे सचिव मा. संतोष थोरात यांना  German Language learning course मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  Foreign Language Online Application (FLOA) तसेच Inner Wheel Club of Pune Riverside च्या  वतीने Best Coordinator in German language या सन्मानाने ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मुक्ती पानसे  क्लबच्या प्रेसिडेंट  माधवी चंदन मॅडम, FLOA चे समन्वयक शैलेश लेले  मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, मा. मुख्याध्यापक बोरसे या सर्वांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल थोरात सरांना पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आपल्या सर्व टीडीएफ परिवाराने उपस्थित राहून संघटनेच्या वतीने संविधानाची प्रत व पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. यावेळी प्राचार्य शिवाजीराव कामथे,  प्राचार्य राज मुजावर , डाॅ.संदीप  गाडेकर, पुणे शहर माध्यमिक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, पुणे शहर टीडीएफचे प्र...

व्ही .पी .एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी , लोणावळा येथे योगा दिन साजरा

Image
व्ही .पी .एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी , लोणावळा येथे योगा दिन साजरा  लोणावळा (प्रतिनिधी) दि. 21 व्ही .पी .एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी , लोणावळा या महाविद्यालयात दिनांक २१ जून २०२३ रोजी जागतिक योगा दिनानिमित्त  “राजयोग कन्सल्टिंग ग्रुप” तर्फे योगा दिन साजरा करण्यात आला.   या कार्यक्रमावेळी नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. सतीश गवळी, सभेचे सदस्य श्री. भगवान आंबेकर, श्री. नितीन गरवारे, ॲड. संदीप अगरवाल यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरीश हरसुरकर आणि प्रा. हुसेन शेख व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया चिमटे हिस सुवर्णपदक

Image
इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया चिमटे हिस सुवर्णपदक  तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) दि ११ दुसऱ्या दक्षिण आशियाई कुंकू अजिंक्यपद स्पर्धा दिनांक सात आठ नऊ जून 2023 रोजी मडगाव गोवा येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या सिया चिमटे हिने सुवर्णपदक मिळविले. 19 वर्ष खालील गटात 64 किलो वजन गटात सिया चिमटे हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. कौतुक प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे म्हणाले व्यायामाने फक्त शारीरिकच नव्हे तर बौद्धिक सामाजिक भावनिक मानसीक प्रगती होत असते जी आयुष्याच्या विविध टप्प्यांवर माणसाला योग्य निर्णय घेण्यासाठी, कठीण प्रसंग कुशलतेने हाताळण्यासाठी मदत करते त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच विविध खेळांमध्ये भाग घेऊन खेळामध्ये आपले करिअर घडवावे. तिच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदासअप्पा काकडे, कार्यवाह मा. चंद्रकांतजी शेटे, खजिनदार मा. शैलेश भाई शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी तिचे अभि...

शिक्षकी पेशा नोकरी नसून एक व्रत आहे..... आमदार सत्यजित तांबे

Image
 शिक्षकी पेशा नोकरी नसून एक व्रत आहे..... आमदार सत्यजित तांबे ओतूर (प्रतिनिधी) दि ०९ इतर व्यवसाय आणि शिक्षकी पेशा यामध्ये फरक असून शिक्षकी पेशा ही नोकरी नसून एक प्रकारचे व्रत आहे. शिक्षणासारख्या व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणे हे  पूर्व जन्माचे पुण्य आहे,"असे प्रतिपादन विधान परिषदेचे नाशिक पदवीधर संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी बेल्हे येथे एका कार्यक्रमात पुरस्कार वितरण प्रसंगी  केले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक रावसाहेब आवारी होते.              स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षिका संघ यांचे संयुक्त विद्यमाने  बेल्हे येथील वेद ओंकार मंगल कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रसंगी तांबे बोलत होते. ते पुढे म्हणाले की", शिक्षक व शिक्षक लोकशाही आघाडीमुळेच मी आमदार झालो. शिक्षक लोकशाही आघाडीचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षकांनी आपल्या मागण्या संघटन...

प्रा.शशिकांत शिंदे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Image
प्रा.शशिकांत शिंदे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पुणे (प्रतिनिधी) दि.०९ टीडीएफचे माजी शिक्षक आमदार स्व.शिवाजी दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्राध्यापक शशिकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण बेल्हे येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र टीडीएफचे कार्यवाह हिरालाल पगडाल, मुख्याध्यापक महामंडळाचे रावसाहेब आवारी, राज्य टीडीएफचे विश्वस्त के.एस.ढोमसे ,अमित बेनके, जुन्नर तालुका पं.समिती सदस्य सुवर्णा घोडके व उदय पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक शशिकांत शिंदे हे सुखसागर नगर येथील पै. हिरामण बनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये पंचवीस वर्ष ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आजवर त्यांना अनेक सामाजिक पक्षाचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा शाळेमध्ये नावलौकिक आहे. विद्यार्थी व शाळेच्या विक...

शिक्षक नेते जी.के.थोरात राज्य स्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते गौरव

Image
  शिक्षक नेते जी.के.थोरात राज्य स्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते गौरव पुणे (प्रतिनिधी) दि १० टिडीएफ चे माजी शिक्षक आमदार स्व.शिवाजी दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार शिक्षक नेते जी.के. थोरात यांना देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण बेल्हे येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र टीडीएफचे कार्यवाह हिरालाल पगडाल, मुख्याध्यापक महामंडळाचे रावसाहेब आवारी, राज्य टीडीएफचे विश्वस्त के.एस.ढोमसे ,अमित बेनके, जुन्नर तालुका पंचायत समिती सदस्य सुवर्णा घोडके व उदय पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जी.के.थोरात हे महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष असून सध्या ते जय हिंद विद्यालय कासुर्डी तालुका दौंड या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी तीस वर्षाच्या शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सपत्नीक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी स...

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये "स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न

Image
  व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये "स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न   लोणावळा (प्रतिनिधी) दि.2 येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये दिनांक ०२/०६/२०२३ रोजी एक दिवसासाठी “स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमावेळी प्रा. एम. गोपालकृष्ण् (एमिटी ग्लोबल बिझनेस स्कुल) यांनी  “स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन पर्सनल इफेक्टीवनेस ॲण्ड पर्सनल ब्रँडीग फॉर करिअर ॲण्ड लाईफ सक्सेस” या विषयावर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर  हे होते. सोबत डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख प्रा. सोनी राघो, प्रा. प्राणेश चौव्हाण, प्रा. मनिषा कचरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजन

Image
 व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजन  लोणावळा (प्रतिनिधी) येथील  व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये गुरूवार दिनांक ०१/०६/२०२३ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक “चाकण ब्लड बँक” हे होते. या शिबीरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाला चाकण ब्लड बँककडून प्रमाणपत्र देण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मानव अ. ठाकूर, सोबत डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. सोनी राघो, प्रा. मनिषा कचरे प्रा. प्राणेश चौव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

करिअर गाईडन्स इन मर्चंटनेव्ही या एकदिवसीय सेमीनारचे आयोजन

Image
 करिअर गाईडन्स इन मर्चंटनेव्ही या एकदिवसीय सेमीनारचे आयोजन लोणावळा (प्रतिनिधी) येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये गुरूवार दिनांक ०१/०६/२०२३ रोजी “करिअर गाईडन्स इन मर्चंटनेव्ही या एकदिवसीय सेमीनारचे आयोजन करण्यात आले. या सेमीनारचे आयोजक “दि ग्रेट ईस्टर्न इन्स्टिटयूट ऑफ मरिटाईम स्टडीज” हे होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स ॲण्ड मर्चंटनेव्ही या विषयावरती दि ग्रेट ईस्टर्न इन्स्टिटयूट ऑफ मरिटाईम स्टडीज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मानव अ. ठाकूर, सोबत प्रा. हुसेन शेख, श्री. रोहित जगताप,  प्रा. रश्मी भुबरे, प्रा. पुनम पोफळकर, प्रा. मुबिन खान सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.