मोबाईलचा अतिरेक टाळा: विलास भेगडे

तळेगाव दाभाडे दि. 29 (प्रतिनिधी): मोबाईलमुळे संवाद हरवत चालला असून मीडियाच्या युगात मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.मुले-मुली मोबाइलचा अतिरेक वापर करतात. तो टाळला पाहिजे. गुणवंत विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे यांनी केले. राधा कल्याणदास दर्यानानी चारिटेबल ट्रस्ट संचलित साईबाबा प्रकल्प कान्हे, मावळ येथे शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करताना ते बोलत होते. यावेळी नॅशलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्सचे सीनियर ऑफिसर प्रफुल्ल झांबरे, ज्युनियर ऑफिसर अक्षय भोसले, बालाजी भोई, ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब काळे, सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे, प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती वेदक, सोशल वर्कर अर्चना पिंगळे, दत्तात्रय चांदगुडे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सदानंद भगवान दळवी व स्वर्गीय लक्ष्मण माधवदास वाधवानी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. आकाश पुंडलिक पुजारी (श्री छत्रपती...