Posts

Showing posts from January, 2023

राजमाता जिजाऊ मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा

Image
 राजमाता जिजाऊ मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  सौ.रूपालीताई चाकणकर  पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ३० पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुणे शहरातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिकांसाठी राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराचे आयोजन पत्रकार भवन ,गांजवे चौक, नवी पेठ येथे करण्यात आलेले होते. यावेळी रूपालीताई चाकणकर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समाज शिक्षित व संस्कृत करण्यामध्ये शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असून शिक्षकाचे कार्य अतुलनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकच एखाद्या विद्यार्थ्यांचा आयुष्य कसं चांगलं घडू शकतात याचा निर्वाळा दिला.    यावेळी पुणे शहरातील तेरा मुख्याध्यापिकांना राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका, बत्तीस शिक्षिकांना ...

प्रेमातूनच जाती अंत शक्य! - प्रदीप निफाडकर

Image
 प्रेमातूनच जाती अंत शक्य! - प्रदीप निफाडकर  तळेगांव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.17 प्रेम ही उदात्त संकल्पना आहे. तिला विनाकारण बदनाम केले जाते. महाविद्यालयीन युवकांनी प्रेमाचा सात्विक अनुभव घेत  आयुष्याला सामोरे जावे त्यातून जाती अंतासारख्या मोठ्या प्रश्नाची उकल सहज शक्य असल्याचे मत सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले.इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  याप्रसंगी प्राचार्य डॉ संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे, प्रा सत्यजित खांडगे,डाॅ संदीप कांबळे,डाॅ प्रमोद बोराडे, प्रा राजेंद्र आठवले तसेच विविध विषयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ऐकले नाही जगाचे छान केले l मी तुला तारूण्य माझे दान केले ll प्रेमाच्या या गझलेचा संदर्भ देत, प्रेमात लिहिलेली गझल जगण्याला उर्मी देते तर दु:खातली गझल वेदनांचा निचरा करते असे निफाडकर म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पंधराव्या शतकापासूनचा गझलेचा प्रवास उलगडून सांगितला तसेच...

विद्यार्थांचा सर्वांगीण विकास जोपासणारी शाळा -सचिव श्री.पोपटशेठ बाफना

Image
  विद्यार्थांचा सर्वांगीण विकास जोपासणारी शाळा  -सचिव श्री.पोपटशेठ बाफना. तळेगाव स्टेशन ( संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.१७ श्री.भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर मुख्याध्यापक श्री.कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली. दिनांक 3/4 जानेवारी. रोजी विद्यालयात क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  कबड्डी,खो - खो,धावणे,उंच उडी, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला.विद्यार्थांनी विविध खेळातील कौशल्य दाखवले.त्यामुळे संस्थेचे सचिव श्री.पोपटशेठ बाफना यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बऊर ग्रामपंचायत संरपंच .श्री.प्रविण भवार,मा.संरपंच श्री.संदिप खिरीड, ग्रामपंचायत सदस्य श्री.शंकर शिंदे, ग्रामस्थ संजय ठोंबरे,भाऊ म्हस्के, संतोष आढाळगे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे कार्यक्षम मुख्याध्यापक श्री.कदम सर यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्पर्धेमध्ये पंच म्हणून श्री.माने सर  श्री. शिंदे सर व श्री. खोसे सर श्री.सुनिल तिकोणे  यांनी काम पाहीले....

वसुधैव कुटुम्बकम वर एमआयटी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

Image
 वसुधैव कुटुम्बकम वर एमआयटी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजन आळंदी (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.१७ विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आळंदी, पुणे येथील एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजमध्ये दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी वसुधैव कुटुम्बकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर परिषदेचे उद्घाटन हे प्रा. स्वातीताई कराड - चाटे, डॉ. संजीव सोनवणे, डॉ. विजय खरे, डॉ. दीपक माने, डॉ. आन्का लाँयना निकोलायू, डॉ. नाडा राटकोव्हीक यांच्या हस्ते होणार आहे. सदर परिषदेचा उद्देश्य आनंदी आणि शांत जगासाठी संपूर्ण विश्वात एक जग, एक कुटुंब हा विचार रुजवणे हा आहे. सदर परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट 25 बी. एड. कॉलेजचे प्राचार्य यामध्ये सहभागी होणार आहेत.परिषदेत डॉ. ललिता वर्तक, डॉ. राधिका इनामदार, डॉ. अनिता बेलापूरकर, डॉ. बापूसाहेब चौगुले, डॉ. चंद्रकांत बोरसे, डॉ. मुकुंद पोंदे, डॉ. श्रीरंग क्षीरसागर, डॉ. रवींद्र चोभे, डॉ. वंदना नलावडे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. संध्या खेडेकर, डॉ. ...

पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेवर आपले विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व:76 वर्षाची परंपरा मोडीत काढून विजयश्री आणली खेचून

Image
पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेवर आपले विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व:76 वर्षाची परंपरा मोडीत काढून विजयश्री आणली खेचून   पुणे, (प्रतिनिधी) दि.16  पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपले विकास पॅनेल व आपले पॅनेल या दोन प्रमुख पॅनेल मध्ये सरळ लढत झाली. आपले विकास पॅनेल ने आपले पॅनेलचा13/0 फरकाने दणदणीत पराभव करून पतसंस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.    पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतपेढीची स्थापना1945 मध्ये कै. गो. चाफेकर यांनी केली,तेव्हापासून आजपर्यंत संस्थेवर आपले पॅनेलचे वर्चस्व राहिलेले आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच शहरातील मध्यवर्ती भागातली पेठांच्या शाळांचा व तेथील मतदारांची कायमच महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनेलने ही परंपरा मोडीत काढून या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 13 उमेदवार निवडून आणून सत्ता स्थापन करून नवीन इतिहास घडविला आहे.    आपले विकास पॅनलने कपबशीच्या चिन्हावर नरेंद्र नागपुरे, विठ्ठल भरेकर, राजेंद्र गाढवे सर, विजयराव कचरे, प्राचा...

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण..... शरद सोनवणे

Image
  माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने 26 गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ.. राजूरी (प्रतिनिधी) दि.10 विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरीसुद्धा शिक्षकांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही, अशा आशयाचे प्रतिपादन जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे यांनी येथील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी हे होते. जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी आणि जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघ यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुणवंत शिक्षक शिक्षकेतर पुरस्काराने राजुरी येथील विद्या विकास मंदिर मध्ये गौरवले गेले, यावेळी श्री सोनवणे बोलत होते .श्री सोनवणे म्हणाले की," प्राचीन काळापासून गुरूंचे महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही. जीवनामध्ये संस्कारांचे रोपण करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. आर्थिक आणि सामाजिक क्रांती करण्याचे खूप मोठे सामर्थ्य शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे...

पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणूक

Image
आपले विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात संपन्न    पुणे (प्रतिनिधी) दि 5 पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकी तील आपले विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज नूमवी मुलींच्या प्रशालेत धुमधडाक्यात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्राचार्य हरिश्चंद्र गायकवाड सर त्याचप्रमाणे पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, विजयराव कचरे, प्राचार्य सिन्नरकर मॅडम, शिवाजीराव खांडेकर, नरेंद्र नागपुरे यांच्या तसेच आपले विकास पॅनलचे सर्व उमेदवार, असंख्य शिक्षक सभासद बंधू भगिनींच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला.    यावेळी आपले विकास पॅनलच्या उमेदवारांनी आपली ओळख करून देऊन येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पतपेढीच्या पारदर्शक कारभारासाठी व सभासदांच्या हितासाठी पॅनल मधील सर्व उमेदवारांना कपबशीच्या चित्रावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.   यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नरेंद्र नागपुरे, विजयराव कचरे, शिवाजीराव कामथे, महादेव माने, धोंडीबा तरटे, डॉ. कल्याण वाघ इ. उमेदवारांनी आपले मन...

शाळा हे सुसंस्कृत व वैचारिक तरुण पिढी घडविणारे संस्कार केंद्र आहेत- आमदार सुनील शेळके

Image
  शाळा हे सुसंस्कृत व वैचारिक तरुण पिढी घडविणारे संस्कार केंद्र आहेत- आमदार सुनील शेळके  तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि 3 - शाळा हे सुसंस्कृत, वैचारिक तरुण पिढी घडविणाऱ्या संस्कार केंद्र असल्याचे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी  नवीन समर्थ विद्यालय येथे व्यक्त केले  नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.   यावेळी प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके  हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संतोष खांडगे हे होते. यावेळी नूतन संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात त्यांच्या हस्ते करण्यात आले आले तसेच स्नेहसंमेलन ध्वजारोहण नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा एडवोकेट धनंजय काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव  संतोषजी खांडगे  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक उपाध्यक्ष  गणेशजी खांडगे ,   लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षा कु.अक्षदा कान्हुरकर, उद्योजक विलास काळोखे, पुणे...

ॲड् पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Image
  ॲड् पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती  साजरी  तळेगांव स्टेशन (संपादक -डॉ.संदीप गाडेकर) दि. 4 ॲड् पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती  साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक  श्री. सोनबा गोपाळे सर, महिंद्रा सी आय इ कंपनीचे गुणवंत कामगार,पर्यावरण प्रेमी  श्री. संदीपजी पानसरे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री. नितीन  पोटे,  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक श्री. कापरे पांडुरंग ,ज्येष्ठ अध्यापिका सौ.रजनी बधाले  ,कार्यक्रमासाठी इयत्ता सहावी ब मधील सावित्रीबाईंची वेशभूषा केलेली विद्यार्थिनी कु.डिखळे अर्पिता व ज्योतिबांची वेशभूषा केलेले कु. राऊत वर्षा या सर्वांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.श्री पांडुरंग पोटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार पर्यावरण पूरक तुळशीचे रोप देऊन करण्यात आला.         नूतन महार...

पुणे नेटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी मंडलिक सुनील जनार्दन यांची निवड

Image
  पुणे नेटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी मंडलिक सुनील जनार्दन यांची निवड तळेगांव स्टेशन (संपादक -डॉ.संदीप गाडेकर) दि 4 महाराष्ट्र शासन  व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन "३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ "यामध्ये विविध शासकीय मान्यताप्राप्त खेळप्रकाराचे  पुणे व नागपूर येथे  आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पुणे नेटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित प्रतिक विदृयानिकेतन निगडे मावळ येथील श्री मंडलिक सुनील जनार्दन यांची निवड करण्यात आली आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष मावळचे लोकप्रिय आमदार श्री सुनील आण्णा शेळके, सचिव श्री यादवेद्रजी  खळदे सहसचिव श्री वसंत पवार  व तसेच संस्थेचे संस्थापक सदस्य यांनी विशेष निवड झालेले खेळाडू यांचे  कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे नेटबॉल संघाचे खेळाडू पुढीलप्रमाणे १ समीर सिकीलकर ,२ शुभम कोडक ३,आरिफ मुजावर ४ अविनाश पाटील ५ ऒंकार नरके ६ प्रसाद शिवेकर ७ सर्वेश अडसुळे ८ पृथ्वीराज पवार ९ रोहित पवार १० दत्तात्रय कोल्हे  ११ अलिम शेख १२ दिपक डुंगाहू  यासाठी महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशन...

ट्रेकिंग पलटण पुणे यांचा कासारसाई टेकडी परिसरात स्वच्छता करून नवीन वर्ष २०२३ चा शुभारंभ

Image
तळेगांव दाभाडे  (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.1 कासार साई टेकडी परिसरात को-हाळेश्वर मंदिर, वाघजाई मंदिर आणि नैसर्गिक भुयार इ. महत्वाची स्थळे आहेत. येथून कासार साई धरणाचे सुंदर दृश्य दिसते. या परिसरात भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येवू लागले आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याच्या बाटल्या, पॅकेट्स, कोरडा खावूच्या पिशव्या असा पर्यावरणास घातक कचरा वाढत आहे. परिसरात स्थानिक प्रशासन मार्फत स्पष्ट सूचना फलक ठिकठिकाणी लावलेले असून सुद्धा परिसरात काही पर्यटक कचरा करून परिसर अस्वच्छ करीत असतात. ट्रेकिंग पलटन गृप च्या सदस्यांनी 1 जानेवारी 2023 च्या रोजी दिवशी या परिसरात स्वच्छता अभियान राबवून नवीन वर्ष साजरे केले. या मोहिमेत श्री. प्रदीप पाटील, श्री. विलास करपे, श्री. संदीप चौधरी,  श्री. अमोल गोरे, श्री. ज्ञानेश्वर पुरी आणि डॉ सुरेश इसावे यांनी योगदान दिले.