Posts

Showing posts from January, 2025

टि. ज. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आवाज राष्ट्रीय पातळीवर

Image
  पुणे दिनांक 30 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी,पुणे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग चे स्वयंसेवक सध्या राष्ट्रीय पातळीवर आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे तसेच विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प  साठी झालेली आहे. नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प राजस्थान जयपूर येथे यावर्षीचा होत आहे. या कॅम्पसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत फक्त तीनच मुलींचे सिलेक्शन झालेले आहे या सिलेक्शन मध्ये आपल्या खडकी शिक्षण संस्थेची टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी व्हिक्टोरिया जोसेफ हिची निवड झालेली आहे. व्हिक्टोरिया जोसेफ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प चे स्वयंसेवक म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.  महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी पहिल्यांदाच अशा महाराष्ट्र बाहेरील राष्ट्रीय पातळीवर एनआयसी कॅम्पला निवड  आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची झाली आहे. सदर विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभ...

स्नेहवर्धन पुणे जिल्हा अंतर अद्यापक विद्यालयीन कला क्रीडा स्पर्धेत बाफना डी एड कॉलेज चे नेत्रदीपक यश

Image
तळेगाव दाभाडे दि.30 (प्रतिनिधी)  इंद्रायणी महाविद्यालयाच्या क्रीडागणात जिल्हा क्रीडा स्पर्धा नुकत्याच  घेण्यात आल्या. यावेळी उदघाटनपर कार्यक्रमात जिल्हा सचिव प्राचार्या  उज्ज्वला सावंत व उपसचिव प्राचार्य हिरामण लंघे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्यातील 15 डी .एड कॉलेज ने सहभाग नोंदवला.  या क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक बाबीमध्ये हरकचंद रायचंद बाफना डी. एड. च्या आरती पवार - राऊत हिने थाळी फेक मध्ये द्वितीय, मेघराज दिनेश राऊत या विद्यार्थ्याने गोळा फेक मध्ये द्वितीय तर 4×100 रिले स्पर्धेत अनुक्रमे साक्षी नलावडे, मोनिका कुंभार, स्वेता लोखंडे आणि आरती कारके, सपना चव्हाण व अंकिता कोकणे यांनी तृतीय क्रमांक पटकवला.  यावेळी प्रा. राजेंद्र डोके, डॉ. मनोज गायकवाड, प्रा. शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई आणि प्रा. योगेश जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन केले. नंदकिशोर मुगेरा आणि सोमनाथ धोंगडे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले आणि सचिव अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यां...

आर्किटेक्ट इंद्रजीत आवारे यांच्या आदरातिथ्य आणि व्यावसायिक प्रकल्पाला नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटिरियर एक्सेलन्सचा पुरस्कार जाहीर

Image
तळेगाव दाभाडे दि.29 (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे येथील युवा आर्किटेक्ट इंद्रजीत आवारे यांनी लाइटिंग डिझाइन, लँडस्केप डिझाइन, साइट नियोजन आणि डिझाइन, हार्डस्केपिंग आणि सॉफ्टस्केपिंग, गार्डन डिझाइन, पर्यावरणपूरकता या गोष्टींनी युक्त मांडलेल्या बांधकाम विषयक संकल्पनांची देश पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या आदरातिथ्य प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पाला नुकताच नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटिरियर एक्सेलन्सच्या वतीने 'ट्रस्टेड अँड रायजिंग क्रिएटिव्ह आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन फर्म ऑफ द इयर 2025' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.           स्थापत्यकलेचे सखोल ज्ञान असलेले इंद्रजीत आवारे यांचे डिझाइन हे टिकाऊ आणि गांभीर्यपूर्ण  आर्किटेक्चरभोवती केंद्रित आहे. ते करीत असलेल्या प्रोजेक्टवरून असे दिसते, की त्यातून त्यांनी ठरवलेला उद्देश साध्य होत आहे. त्यांची अविन्या आर्किटेक्ट ही आर्किटेक्चरल डिझाईन फर्म आहे; जी आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाइन आणि लँडस्केप डिझाइनमध्ये आघाडीवर आहे.            यावर प्रतिक्रिया देताना आवारे यांनी सांगितले, क...

अध्यापक महाविद्यालयात इ-कचरा जनजागृती व संकलन अभियान

Image
  वडगाव मावळ दि. २८ (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे महाविद्यालयातील ग्रीन क्लब अंतर्गत पुर्णम् इकोविजन फाऊंडेशन व पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या द्वारे इ यंत्रण 2025  इ - कचरा जनजागृती व संकलन अभियान 24 ते 26  जानेवारी 2025 दरम्यान घेण्यात आले.  महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त 25 जानेवारी 2025 रोजी  महाविद्यालयातील विद्यार्थ्याची वडगाव मध्ये संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे डीएड कॉलेज ते पोटोबा मंदिर इ - कचरा जनजागृती  बॅनरद्वारे करण्यात आली.  या अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंदानी उत्साहाने सहभागी होऊन इ - कचरा संकलन केले. संस्थेचे सचिव अशोकभाऊ बाफना यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे  यांनी इ- कचरा संकलनाचे महत्त्व बद्दल मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांना  जास्तीत जास्त इ - कचरा दान करण्याबाबत  आवाहन केले. तसेच अध्यापक ग्रीन क...

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे निबंध, वकृत्व स्पर्धा संपन्न

Image
तळेगाव दाभाडे दि.28 (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माता यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे जिल्हा व राष्ट्रवादी युवती काँग्रेस मावळ तालुका आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धा तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक शाळेत नुकतीच संपन्न झाली.  या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्षा पायल देवकर, कुलस्वामिनी महिला मंच च्या संस्थापिका सारिका सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे,अल्पसंख्यांक सेल अध्यक्षा शबनम खान, श्रद्धा शेळके, राष्ट्रवादी युवती काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष तेजस्विनी गरुड, राष्ट्रवादी युवती काँग्रेस मावळ तालुका कार्याध्यक्षा पूजा खराडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तळेगाव शहराध्यक्षा प्रिया मोडक, राष्ट्रवादी युवती काँग्रेस लोणावळा शहराध्यक्षा पूर्वा गायकवाड ,राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शहराध्यक्षा भाग्यश्री विनोदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस देहू शहराध्यक्षा सुप्रिया पिंजन,मावळ तालुका युवती मोनिका येवले तालुका चिटणीस हर्षला शिंदे, तालुका सरचिटणीस शिवानी सोनवणे, तळेगा...

मराठी भाषिक म्हणून आपली जगात ओळख - डॉ. महादेव वाळुंज

Image
  लोणावळा दि.28 (प्रतिनिधी): जगामध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आजही भारतभर आणि जगभर मराठी भाषा बोलणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. भाषा ही कधीही मरत नसते ती नवे रूप घेऊन येत असते. मराठी भाषेला दोन हजार चारशे वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे. मराठीतील कोशवाड्मय हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये चौदा कोटी लोकसंख्या मराठी भाषा बोलत आहे. एखाद्या सणाच्या निमित्ताने जगामध्ये दिवाळी अंक मराठीमध्ये काढणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषिक म्हणून आपली ओळख जगभर पसरली आहे. असे मत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भिगवणचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी व्यक्त केले. निमित्त होते लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालाचा मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडादिनानिमित 'व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, मराठी व...

भग्न अवस्थेकडून पूर्णत्वाकडे...तळेगाव करांसाठी एक स्त्युत्य उपक्रम

Image
तळेगाव दाभाडे दि. २७ (प्रतिनिधी) २६ जानेवारी रोजी ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर एस. एस. सी. बॅच 1995 चे माजी विद्यार्थी आणि नाशिक येथील संपूर्णम् सेवा फाऊंडेशन या संस्थेच्या विद्यमाने शहरातील नागरिकांकडून 150 किलो देवदेवतांच्या भग्न अवस्थेतील प्रतिमा, मूर्ती, देव्हारे आणि जीर्ण झालेले धार्मिक ग्रंथ, पोथ्या संकलन करून त्यांची विधिवत उत्तरपूजा करून पर्यावरण पूरक विघटन करण्याकरिता नाशिक येथे पाठविण्यात आले.  भग्न अवस्थेतील प्रतिमा, मूर्ती, देव्हारे आणि जीर्ण ग्रंथ यांचे नक्की काय करावे हे माहित नसल्याने बरेचशे नागरिक या गोष्टी शहरातील ओढे किंवा तळ्यांच्या परिसरात ठेवत असल्याचे या माजी विध्यार्थ्यांना दिसून आल्याने शालेय मित्रांशी विचार विनिमय करून असे ठरवले की या साठी काही तरी केले पाहिजे, याविषयी त्यांनी शोध घेतला असता नाशिक येथील संपूर्णम् सेवा फाऊंडेशन या संस्थेबद्दल माहिती मिळाली, या संस्थेत सर्व देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमांचे व्यवस्थित वर्गीकरण करून त्यांची उत्तर पूजा केली जाते आणि पर्यावरण पूर्वक विघटन केले जाते... अर्थातच या सगळ्यासाठी काही खर्च येतो त्यानुसार 240 रु. प्रति...

टि. जे. महाविद्यालयाच्या एन. सी. सी. विद्यार्थ्यांनी साकारली संविधानाची प्रतीकृती

Image
  पुणे दि. २७ (प्रतिनिधी) खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेने संविधान अमृत महोत्सव प्रसंगी संविधानाची प्रतीकृती साकारून  संविधानाचे आधार स्तंभ न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत तत्वांच्या सहाय्याने रांगोळी साकारली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून  60 एन. सी. सी. छात्रांनी सलग दोन दिवसाच्या अथक परिश्रमाने ही प्रतिकृती त्याच बरोबर परमवीर चक्र पुरस्कृत सैनिकांच्या जीवनावर आधारीत डिजिटल पुस्तक प्रकाशित केले. संविधान प्रतिकृती रांगोळी व डिजिटल पुस्तकाची संकल्पना महविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सहसचिव डॉ. संजय चाकणे यांची होती तर मार्गदर्शन सहयोगी एन. सी. सी. अधिकारी लेफ्टनंट प्रा. विजय रास्ते यांचे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी पुण्यभूषण फाऊंडेशन पुणे ट्रस्टी डॉ. सतिश देसाई, सचिव आनंदजी छाजेड, सहसचिव सुरजभानजी अगरवाल, ॲड. अजय सुर्यवंशी, संचालक रमेश अवस्थे, राजेंद्र भुतडा , सुधीर फेंगसे . बाळासाहेब थोरात सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. विजय रास्ते व प्रा. सुग्रीव सावंत यांनी केले आभार प्रदर्श...

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
तळेगाव दाभाडे दि. 26 (प्रतिनिधी) येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेशजी कार्ले, संस्थेचे संस्थापक  चंद्रकांत काकडे,अध्यक्ष संदीप काकडे, सचिव प्रशांत शहा, खजिनदार गौरी काकडे, सचिव राजश्री म्हस्के, संचालिका सोनल काकडे, संस्थेचे सदस्य सुभाष दाभाडे, मंगलताई काकडे, लायन्स क्लबचे उपस्थित मेंबर व शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सावंत पर्यवेक्षिका शुभांगी वनारे, पर्यवेक्षिका कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

ॲड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Image
तळेगाव स्टेशन दि. 27 (प्रतिनिधी) ॲड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये दिनांक 14 जानेवारी 2025 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. शासन परिपत्रकाप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  दिनांक 18 जानेवारी रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत मराठी भाषा ग्रंथदिंडी, प्रभात फेरी, घोषवाक्य लेखनस्पर्धा ,चारोळी लेखन स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन विद्यालयातील शिक्षिका अनिता नागपुरे, सुवर्णा काळडोके, प्रभा काळे यांनी केले. दिनांक 20 जानेवारी रोजी विद्यालयामध्ये निबंध लेखन, हस्ताक्षर, शुद्धलेखन, कविता लेखन, कथालेखन इत्यादी स्पर्धा यांचे आयोजन गायत्री जगताप, रुपाली सरोदे यांनी केले. 21 जानेवारी रोजी प्रश्नमंजुषा, शब्दकोडी, काव्यवाचन या स्पर्धेचे आयोजन विद्यालयातील शिक्षिका सुजाता कातोरे व स्वाती तांबिरे यांनी केले. दि. 22 जानेवारी रोजी वादविवाद स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा ,परिच्छेद अनुवाद स्पर्धा यांचे आयोजन आशा आवटे व सुषमा दाते...

सरस्वती विद्या मंदिर इंदोरी हळदी कुंकू समारंभ व पालक सभा उत्साहात संपन्न

Image
 इंदोरी दि. 27 (प्रतिनिधी) सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर इंदोरी येथे मंगळवार दिनांक २१/०१/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता पालक सभा व  हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला.          या कार्यक्रमासाठी अर्चनाताई अरुण पिंपळखरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच ग्रामपंचायत सदस्या व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुरेखाताई शेवकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषाताई ढोरे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.        शाळेच्या आवारात रांगोळ्या काढल्या होत्या. तोरणे पताका लावून शाळा सजवण्यात आली होती. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती पूजन करण्यात आले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगती विषयी चर्चा केली.      त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मुलांशी संवाद कसा साधावा यावर महिलांना  समर्पक वाणीने मार्गदर्शन तथा उद्बोधन केले. यानंतर महिलांना हळदीकुंकू देण्यात आला. पसायदानानंतर चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता कवडे बाईंनी तसेच प्रास्ताविक प्राथमिक ...

नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
   तळेगाव दाभाडे दिनांक 26 (प्रतिनिधी) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे  सकाळी ठीक साडेसात वाजता नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव माननीय संतोषजी खांडगे साहेब यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेची पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.  स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांनी मान्यवरांना मान वंदना देऊन उत्तम असे संचलन केले. यावेळी शासन परिपत्रक प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह गीत गायन समूह गीत, नृत्य भाषण घरघर संविधान अंतर्गत विद्यार्थी शिक्षक पालक यांनी सेल्फी काढली व प्रभात फेरी यासारखे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी या सर्व उपक्रमाला अनुराधा हुलावळे,  मिरा शेलार, युवराज रोंगटे, बळीराम माळी, बापूसाहेब पवार, वृषाली जगताप, ऐश्वर्या शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले या कार्यक्रमास मार्गदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष महेश भाई शहा शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी केले. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.82081...

टि.जे.च्या नावाने चांगभलं...

Image
पुणे दिनांक 26 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उत्साह,जल्लोषाने झाले.प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात सोमवार,दि.२७ जानेवारी ते रविवार, ०१ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ.सतीश देसाईंनी यांच्या हस्ते "टि,जे.च्या नावाने चांगभलं"या संमेलन प्रतीकाच्या अनावरणाने झाले. याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे आनंद छाजेड, सुरजभान अग्रवाल, प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपस्थित होते.    विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या "टि.जे. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वतःहून विविध कला, संस्कृती, परंपरा, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कलागुण कौशल्याधिष्ठित कार्यक्रमाचे स्वतः आयोजन, संयोजन आणि नियोजन केलेले आहे. अशी माहिती  प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी यावेळी दिली. महाविद्यालयात पहिल्यांदाच असे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२० अवलक्षुण होणाऱ्या अनोख्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे डॉ.सतीश देसाई यांनी कौतुक करताना  खडकी शिक्...