सुदृढ समाज निर्मितीसाठी स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे: गणेश काकडे

तळेगाव दाभाडे दि. ५ (प्रतिनिधी) : सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता श्रीरंग कलानिकेतन, वनश्री, तळेगाव स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाला. परमात्मा हे एकमेव सत्य आहे. मानवता हा खरा धर्म आहे. मानव धर्माचा संदेश आत्मसात करा. पुरातन काळापासून सामाजिक एकोपा आणि सद्भावना वृद्धिंगत करण्याचे काम महिलांनी केले आहे.सुदृढ समाज निर्मितीसाठी स्त्रियांचे योगदान मोठे आहे. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर गणेश काकडे यांनी केले. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडे शहरातील जवळपास ७५ महिलांनी सहभाग नोंदवला होता. गणेश काकडे म्हणाले, तळेगाव दाभाड...