व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दहीहंडी उत्साहात
लोणावळा दि. 27 (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दि.२६-०८-२०२४ रोजी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे व कार्यवाहक डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री.विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर श्री.भगवान आंबेकर,ॲड. संदीप अगरवाल व श्री.नितीन गरवारे, श्री.स्वप्नील गवळी यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाची सुरवात श्रीकृष्णाच्या पूजनाने झाली.त्यानंतर श्रीकृष्णाष्टकाम स्तोत्राचे पठन करण्यात आले . महाविद्यालयातील प्रो. मनीषा कचरे यांनी विध्यार्थ्यांना श्रीकृष्णजन्म याविषयी माहिती सांगितली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीस सलामी दिली. विशेषतः या कार्यक्रमात मुलींचाही सहभाग होता यावेळी मुलींनी व मुलांनीही श्रीकृष्णाच्या गाण्यावर नुत्य सादर केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मनोसक्त आनंद घेतला. ...