Posts

Showing posts from October, 2022

साई कम्युनिकेशन येथे दिवाळी निमित्त मोबाईल खरेदीवर दमदार ऑफर

Image
 तळेगांव स्टेशन - (प्रतिनिधी) दि.23 ❣️ उठा उठा दिवाळी आली,❣️ *दिवाळी निमित्त मोबाईल खरेदी करताय* *मग एकदा तळेगाव दाभाडे मधील प्रसिद्ध* *साई कम्युनिकेशन मोबाईल स्टोर ला नक्की भेट द्या* 👉कारण येथे तुम्हाला मिळेल  स्मार्टफोन खरेदीवर🎁 💕झिरो डाऊन पेमेंट सहित झटपट लोन ताबडतोब फोन 💕 कॅश खरेदीवर सहा महिने अतिरिक्त वॉरंटी 💕 डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवर घसघशीत कॅशबॅक 💕ऑनलाइन सेल पेक्षाही जबरदस्त ऑफर्स आणि भेटवस्तू Address - पी एल खांडगे प्लाझा शॉप नंबर 30 चाकण     रोड तलेगाव स्टेशन    Contact:   8796349349/9822662266

विश्रामधाम वृध्दाश्रमात अनोखी दिवाळी साजरी

Image
 विश्रामधाम वृध्दाश्रमात अनोखी दिवाळी साजरी तळेगांव दाभाडे (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.22 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील विश्रामधाम वृध्दाश्रमात आजी-आजोबा यांच्या समवेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीची सुरुवात अतिशय प्रसन्न व उत्साहात साजरी करण्यात आली. विचारमंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ.स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना गेली दोन तपाहून अधिक काळ दिवाळी साजरी करताना आजी-आजोबा यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि त्यांचा दिवाळी साजरा करण्याचा उत्साह आम्हा सर्वांना उर्जा प्राप्त करुन देतो तसेच आपल्या हिंदू धर्मा तील पवित्र सण जेष्टांच्या समवेत साजरा करत असताना एकत्र कुटुंबातील मंगलमय व आशिर्वादाच्या वातावरणात साजरा करण्याची अनुभूती मिळते. या प्रसंगी वृध्दाश्रमात रांगोळी रेखाटून आकाशकंदील , पणत्यांची रोषणाई केल्याने परिसर उजळून जातो.अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होत असल्याने आजी-आजोबा यांच्या मनोरंजनातील सहभागामुळे आनंद द्विगुणित झाला.वृध्दाश्रमातील दिवाळी म्हणजे ऋणानुबंधाचे नाते दृढ होत असल्याची भावना व्यक्त करून वृध्दाश्रमात...

खुटबाव येथील जय हिंद ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने आगळ्या वेगळ्या दीपावली महोत्सवाचे आयोजन

Image
  खुटबाव येथील जय हिंद ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने आगळ्या वेगळ्या दीपावली महोत्सवाचे आयोजन. पुणे दि.17 (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) खुटबाव, तालुका दौंड येथील जय हिंद ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 20, 21 व  22 ऑक्टोबर या दिवशी दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष जी. के.थोरात यांनी कळवले आहे. या तीन दिवसांमध्ये प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवामध्ये सर्वांसाठीच वेगवेगळे कार्यक्रम असून  एका वेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी दिवाळीच्या निमित्ताने मिळणार आहे.   या कार्यक्रमांतर्गत ग्राम भूषण गौरव समारंभ अंतर्गत खुटबाव गावासाठी सार्वजनिक विकासात  योगदान देणाऱ्या, गावाच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या 8  कर्तुत्ववान ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे तसेच युवती व महिला भगिनींसाठी सुभाष यादव प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या  लोकप्रिय कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आलेले  आहे. तसेच विद्यार्थी, युवक व शेतकऱ्यांसाठी आजच्या तरुणांपुढील आव्हाने या विष...

जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते: किरण तावरे

Image
 जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते: किरण तावरे  वाचन प्रेरणा दिनानिमित्त केले विचार व्यक्त पुणे, विमाननगर,15 ऑक्टोबर 2022   विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द,चिकाटी व कठीण परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनामध्ये यश हमखास मिळते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, पुस्तकांचे नियमित वाचन केले पाहिजे यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते असेही यावेळी त्या म्हणाल्या. आनंद विद्यानिकेतन हायस्कूल,विमाननगर या प्रशालेमध्ये डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्या प्रमुख पाहुण्या होत्या.   वाचन प्रेरणा दिनानिमित्त संतोष थोरात यांनी डॉ. कलाम यांचे जीवन चरित्र तसेच त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देेऊन वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले.  प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ, माजी मुख्याध्यापक  विनायक घोगे त्याचप्रमाणे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सर्वांनी डॉ.एपीजे अब्दुल...

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून संतोष थोरात यांनी स्वलिखित पुस्तके दिली शालेय ग्रंथालयास भेट

Image
 वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून संतोष थोरात यांनी  स्वलिखित पुस्तके दिली शालेय ग्रंथालयास भेट  पुणे, विमाननगर 15 ऑक्टोबर 2022    15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. हा दिवस भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर पुणे या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमासाठी  संत गोरोबा शिक्षण संस्थेच्या कार्यवाह  तावरे तावरे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर जीवनात यश हमखास मिळते तसेच डॉ. कलाम यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले व वाचन संस्कृती टिकवण्यासाठी नियमित वाचन केले पाहिजे असेही सांगितले.   यावेळी प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक संतोष थोरात यांनी स्वतः लिहिलेल्या TOTAL ENGLISH GRAMMAR AND COMPOSITION  या इंग्रजी पुस्तकांचा संच ...

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना टिडीएफची उमेदवारी जाहीर: विजय बहाळकर

Image
पुणे (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि. 8 येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिक विभाग व कोकण विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर टीडीएफच्या उमेदवारी बाबत आज राज्य कार्यकारिणीची बैठक विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विद्यालय, सदाशिव पेठ पुणे येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.   यावेळी  यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन सर्वानुमते हे नाशिक विभाग मतदार संघाचे टीडीएफ उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले. डाॅ.सुधीर तांबे हे विद्यमान पदवीधर आमदार असून शिक्षकांसाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे तसेच विधानपरिषदेमध्ये वेळोवेळी त्यांनी शिक्षकांच्या तसेच युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत  ते प्रचंड बहुमताने निवडून येतील  असा विश्वास सर्वांनी  व्यक्त केला.    तसेच कोकण विभाग पदवीधर शिक्षक विभाग मतदार संघाच्या उमेदवारीबाबत  प्रत्यक्ष रत्नागिरी येथे बैठक घेऊन राज्य कार्यकारणीच्या वतीने  लवकरच उम...

भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीची संधी

Image
सर्व B Sc, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर कमीत कमी साठ टक्के मार्कांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी.भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती साठी जाहिरात,एकूण 990 पदे, मराठी मुलांच्या  निदर्शनास ही जाहिरात आणावी . फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण तीन वर्षात त्याला आपले चॉईस स्टेशन मिळते . सर्व दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जून बसतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते. त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा  कळकळीची विनंती आहे की अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे. https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp परीक्षेसाठी लिंक☝️☝️☝️

डॉ.वैभव जाधव यांना पितृशोक

Image
तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.5 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ वैभव जाधव यांचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कै. गोविंदराव जाधव यांचे बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा पंचक्रिया विधी रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता ऋणानुबंध हॉल, रामकुंड, कपालेश्वर जवळ, नाशिक या ठिकाणी होणार आहे. कै.गोविंदराव सुपडू जाधव यांच्या पश्चात त्यांचे पत्नी,भाऊ, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

श्री अशोक श्रीराम काळे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
तळेगांव स्टेशन (संपादक-संदीप गाडेकर) दि.3 पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या वतीने भोर येथील भोरेश्वर लॉन्स मंगल कार्यालय येथे रविवार, दि. 02  ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. श्री पद्मावती विद्यामंदिर व ज्यूनि. कॉलेज, उर्से. ता. मावळ येथील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक श्री अशोक श्रीराम काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली 20 वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन कार्य करत आहेत. सदर पुरस्कार मा.श्री संग्राम दादा थोपटे आमदार भोर वेल्हा मुळशी, टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी के  थोरात,  महाराष्ट्र राज्य विश्वस्त के एस ढोमसे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री वसंतराव ताकवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माध्यमिक शाळा व शिक्षकांच्या अनुदानाबाबत शासन उदासीन, सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज: आमदार संग्रामदादा थोपटे

Image
भोर, 2  ऑक्टोबर 2022 जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा दिमाखात संपन्न.  माध्यमिक शाळा व शिक्षकांचे अनुदानाबाबत तसेच त्यांच्या समस्या   बाबत सरकार उदासीन असून कायम विनाअनुदानित, अंशतः विनाअनुदानित व टप्पा अनुदानावरील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात  भोर - वेल्हे: मुळशी चे कार्यसम्राट आमदार मा. संग्राम दादा थोपटे यांनी  प्रतिपादन केले.   पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा टीडीएफ व पुणे जिल्हा महिला शिक्षिका संघाच्या वतीने भोर येथील  भोरेश्वर लॉन्स मंगल कार्यालय मध्ये जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.   यावेळी संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 65 मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भोर तालुक्यातील पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य टीडीएफचे विश्वस्त मा. के. ए...

इंग्रजी चे तज्ञ मार्गदर्शक प्रवीणकुमार हुलावळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर

Image
इंग्रजी चे तज्ञ मार्गदर्शक प्रवीणकुमार हुलावळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर दि.1 ऑक्टोबर 2022  मावळ तालुक्यातील देवघर विद्यालयातील इंग्रजीचे आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रवीण कुमार पाटीलबुवा हुलावळे यांना नुकताच माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टीडीएफ यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रवीण कुमाकुमार हुलावळे हे गेली 15 वर्ष इंग्रजी चे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेले आहे. तसेच यांना अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कारांनी  सन्मानित केले गेले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्व स्तरांमधून सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ 2 ऑक्टोबर सकाळी. अकरा वाजता भोर  येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी भोर चे माजी आमदार, अनंतराव थोपटे साहेब, आमदार संग्राम दादा थोपटे, टीडीएफ चे राज्य कार्याध्यक्ष जी. के. थोरात, राज्य विश्वस्त के. एस. ढोमसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, सचिव पंकज घोलप,टीडी...

श्री बबनराव भेगडे यांना "सहकार भूषण " पुरस्कार सन्मान

Image
तळेगांव स्टेशन दि. 1 ऑक्टोबर  श्री डोळसनाथ  नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा "आपण किती चांगले काम करतो या वर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते ,गेली ३१ वर्ष संस्था काम करीत आहे व ती चांगले करीत आहे म्हणूनच आजचा दिवस आहे".  सहकार क्षेत्रात राज्य व देश पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल होत असून देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झाले या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवीन दिशा देण्याचे धोरण अवलंबिले आहे ६३ लाख पेक्षा जास्त सोसायट्या ह्या ऑनलाइन झाल्या असून बाकी सोसायट्याना लवकरात लवकर ऑनलाईन करण्याचे धोरण सरकारने आखले आहे .असे प्रतिपदन मा राज्यमंत्री श्री बाळ भेगडे यांनी केले   श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा इशा हॉटेल तळेगाव दाभाडे येथे पार पडली .सभेमध्ये गेली ४५ वर्षे सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल मान्यंरांच्या शुभहस्ते श्री  बबनराव भेगडे याना मानपत्र फुले पगडी व उपरणे देऊन  "सहकार भूषण " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या प्रवासा मध्ये  सहा स...