राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारा'ने डॉ. संभाजी मलघे यांचा गौरव

तळेगाव दाभाडे दि. ३० (प्रतिनिधी) येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सचिन इटकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक गिरीष देसाई, महाराष्ट्र माहिती सहाय्यता तंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष केंद्राचे यशवंत शितोळे यांच्या हस्ते डॉ. मलघे यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. देवळाणकर म्हणाले, की अशा पुरस्कारामुळे महाविद्यालयांना काम करण्याची उर्मी मिळते. प्राचार्यांना प्रोत्साहन मिळते. विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये इंद्रायणी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करीत आहे. खेळाच्या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाची मक्तेदारी आहे. यावर्षी झालेल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रियंका इंगळे या विद्यार्थिनीने भारताचे नेतृत्व करून भारताल...