Posts

Showing posts from September, 2025

सुदृढ समाज निर्मितीसाठी स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे: गणेश काकडे

Image
  तळेगाव दाभाडे दि. ५ (प्रतिनिधी) :  सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता श्रीरंग कलानिकेतन,  वनश्री, तळेगाव स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाला.  परमात्मा हे एकमेव सत्य आहे. मानवता हा खरा धर्म आहे. मानव धर्माचा संदेश आत्मसात करा. पुरातन काळापासून सामाजिक एकोपा आणि स‌द्भावना वृद्धिंगत करण्याचे काम महिलांनी केले आहे.सुदृढ समाज निर्मितीसाठी  स्त्रियांचे योगदान मोठे आहे. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर गणेश काकडे यांनी केले. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तळेगाव  दाभाडे शहरातील जवळपास ७५ महिलांनी सहभाग नोंदवला होता. गणेश काकडे म्हणाले, तळेगाव दाभाड...

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

Image
तळेगाव दाभाडे, दि. ०७ (प्रतिनिधी)  माईर एमआयटी पुणेच्या एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेतील २५ वर्षांपेक्षा जास्त सेवा बजावणाऱ्या वरिष्ठ शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पीएसएम विभागाच्या मानद प्राध्यापक डॉ. रत्ना मजुमदार, सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन नाईक, सर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. निखिल फडके, पॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. स्मिता भिडे, पीएसएम विभागाच्या सहप्राध्यापक डॉ. स्वाती राजे, फार्माकॉलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश पेंटेवार यांचा संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास व प्राचार्या डॉ. दीपा नायर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षकांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड व संस्थेचे वैद्यकीय संचालक कै. डॉ. सुरेश घैसास यांचे आभार मानले. कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी सर्व शिक्षका...

ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात

Image
तळेगाव दाभाडे दि.५ (प्रतिनिधी) ॲड.पु.वा परांजपे विद्या मंदिरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी दहावीचे वर्गशिक्षक संजय खराडे, आशा आवटे, अनिता नागपुरे यांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची सुरुवात दहावीतील विद्यार्थी शिक्षिका किरण काशीद हिने शिस्तबद्ध परिपाठ घेऊन संगितमय योगासने व कवायत प्रकार घेतले. आजच्या कार्यक्रमाचे विद्यार्थी मुख्याध्यापक आदित्य दराडे तसेच पर्यवेक्षिका श्रावणी हेळकर यांनी या कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन पहिल्या पाच तासिकांची शाळा उत्तम प्रकारे चालविली. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उत्तम तयारी करून वर्गा वर्गात जाऊन उत्तम प्रकारे शिकवले शिपाई झालेल्या विद्यार्थ्यांना शिपायांची कामे न लाजता चांगल्या प्रकारे केली शाळेतील दहावीचे विद्यार्थी यांनी शिक्षकांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडून शाळेतील शिक्षकांना अध्यापनाच्या कामातून एक दिवस विश्रांती दिली बजावली. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटला. दुपारच्या सुट्टीनंतर  शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्या...

मला घडविण्यात शिक्षकांचा मोठा हातभार : अभिनेते भूषण प्रधान शिक्षक दिनानिमित्त इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेमध्ये शिक्षकांचा सन्मान

Image
  तळेगाव दाभाडे, दि. ०४ : इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या नावातच मंदिर आहे आणि तुम्ही सगळे शिक्षक त्यातील देव आहात. शिक्षकांचा सन्मान करण्याचा मान मिळणे, हे माझे भाग्य आहे. मी जे घडलोय, जे आयुष्य जगतोय त्यामागे आई वडिलांसोबतच शिक्षकांचा मोठा हातभार आहे, असे प्रतिपादन अभिनेते भूषण प्रधान यांनी केले.        इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. अभिनेते भूषण प्रधान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, संचालक संदीप काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, उपप्राचार्य एस. पी. भोसले, अमृता सुराणा, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.              अभिनेते भूषण प्रधान म्हणाले, पहिली शिक्षिका आई आहे. शिक्षकांची कौतुकाची थाप आयुष्यात खूप काही देऊन जाते. त्...

तळेगावात प्रथमच आगळं वेगळं असं प्रेरणादायी सुविचारांचं प्रदर्शन... जीवन मूल्यांचे सामर्थ्य समजणार....

Image
  तळेगाव दाभाडे दि. ३ (प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी १० ते सायं.५ या कालावधीत कलापिनी सांस्कृतिक केंद्र तळेगाव दाभाडे या ठिकाणी तळेगावात प्रथमच आपलं वेगळं असं प्रेरणादायी सुविचारांचं प्रदर्शन भरणार आहे,  ज्यामधून जीवन मूल्यांचे सामर्थ्य समजणार आहे. मनुष्याला आज दैनंदिन आयुष्य जगताना अनेक  प्रसंगांना सामोरे जावं लागते. अशावेळी  प्रेरणादायी सुविचारांची खूप गरज असते. ती गरज पूर्ण व्हावी याकरीता कोणीही कधीही न भरवलेलं असं प्रदर्शन यशाचा मंत्र ,सुखाचा मंत्र ,एक वास्तव, एक प्रश्न ,एक सत्य ,एक चूक ,एक खंत ,चिंतन या सदराखाली मानवी जीवन मूल्यांवर सकारात्मक विचार प्रदर्शित करण्याचा एक छोटासा प्रयत्न प्रा. राजेंद्र पवार यांनी केला आहे. मानवी जीवनातील प्रेम मैत्री नातेसंबंध सुख- दुःख, यश- अपयश, भाव- भावना विचार कृती या विषयावर सकारात्मक विचार करणारे 108 प्रेरणादायी सुविचारांचं प्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे.  सदर प्रदर्शनातून प्रेक्षकांना निश्चितच पुढील फायदे होणार आहेत. १. सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करणे  2. स्वतःची स्वतःबरोबर एक वेगळी ओळख ...

रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे पोलीस बांधवांना जेवणाच्या किटचे वाटप

Image
तळेगाव दाभाडे दि. ३ (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ मावळ ही संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असते. गणपती विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांकरिता रात्रीच्या जेवणाची सोय या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मावळ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या,पुस्तके,शालोपयोगी वस्तूंचे वाटप, विद्यार्थिनींकरिता गुड टच व बॅड टच या विशेष व्याख्यानांचे आयोजन, रायलाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम, वृक्षारोपण,गोदान अशा अनेक उपक्रमांपैकीच पोलीस बांधवांना या संस्थेचे वेळोवेळी सहकार्य असते.  गणपती विसर्जना करिता तळेगाव दाभाडे व सोमाटणे परिसरात एकूण 225 पोलीस कर्मचारी कार्यरत होते.या पोलीस बांधवांना बंदोबस्तावेळी रात्रीच्या जेवणाची सोय दरवर्षी क्लबच्या माध्यमातून केली जाते,अशी माहिती क्लबचे संस्थापक मनोज ढमाले यांनी दिली. विसर्जन मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय,राज्य राखीव पोलीस दल,होमगार्ड येथून ज...

प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचा ‘आदर्श प्राचार्य' पुरस्काराने सन्मान

Image
  खडकी दि. 3 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेचे, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवाशी जैन कॉन्फ्रेन्स मुंबई, पुणे पंचम झोन व राष्ट्रीय महिला शाखा यांच्या वतीने 'आदर्श प्राचार्य पुरस्कार' ग.दि. माडगूळकर सभागृह,आकुर्डी येथे झालेल्या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते ज्योतीजी सोळंकी, श्री. कल्याणजी गंगवाल, प्रा. सुरेखा कटारिया व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.        प्राचार्य डॉ. चाकणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगल्भ दृष्टीकोन व दूरदृष्टी दाखवून महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. महाविद्यालयास नॅक अ श्रेणी, स्वायत्ततेचा दर्जा मिळवून दिला आहे, संशोधन व नवनविन उपक्रमांस चालना देणे,पेटंट प्राप्ती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, समाजाभिमुख उपक्रम राबविणे,विध्यार्थी केंदबिंदू मानत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, या सर्व क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. प्रशासकीय कामक...

तळेगावमध्ये अथर्वशीर्ष पठण उत्साहात गणेशोत्सवानिमित्त उपक्रम: परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी

Image
तळेगाव दाभाडे : दि.1 (प्रतिनिधी ) 'ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि' असे म्हणत दोन हजाराहून अधिक महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठण केले.शाळा चौक येथील स्व. कासाबाई भेगडे (पाटील) सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि मानाच्या पाचव्या श्री गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष ,विद्यमान संचालक, पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, पीएमआरडीचे सदस्य, माजी नगरसेवक, पतसंस्थेचेआधारस्तंभ संतोष भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. या सोहळ्यास पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, उपाध्यक्ष समीर भेगडे, माजी अध्यक्ष राहुल पारगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर वाजे, सल्लागार विलास भेगडे, गुलाब भेगडे, संध्या देसाई, सरव्यवस्थापक अनिल भोमे, व्यवस्थापिका  तस्लिम सिकिलकर, मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राधिका हेरेकर, उपाध्यक्ष सिद्धी जाधव, प्रशांत खेडेकर, सल्लागार दत्तात्रय मेढी , श्रीका...