उद्या सत्यदत्त पूजा व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता

 


तळेगाव स्टेशन दि. १५ (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांचे माध्यमातून श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक ९ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत स्वामी समर्थ नगर तळेगाव स्टेशन येथे साजरा होत आहे. या सप्ताहात गुरुचरित्राचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

 या सप्ताहाचा समारोप सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजा व महाप्रसाद याने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे तरी सर्व भाविकांनी व पहिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व सिद्धिविनायक प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी केले आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश