श्री. बाळासाहेब महादेव काकडे उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित
श्री. बाळासाहेब महादेव काकडे उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर ) दि.३० कै. चंपाबाई व कै. ज्ञानोबा गणपत पवार यांच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच माजी आमदार कै. दिगंबर भेगडे यांच्या ११ व्या मासिक श्राद्ध निमित्त रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता मावळ तालुक्यातील विविध व्यक्तींचा सन्मान सोहळा भंडारा लॉन्स मंगल कार्यालय येथे ह.भ.प. श्री. शिवाजीराव ज्ञानोबा पवार यांनी आयोजित केला होता. या या सोहळ्यात तळेगाव दाभाडे येथील प्रतिष्ठित उद्योजक श्री बाळासाहेब महादेव काकडे यांना उद्योगरत्न पुरस्कार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री. बाळासाहेब काकडे यांच्याबरोबर त्याच्या पत्नी सौ.राधिकाताई बाळासाहेब काकडे, कनिष्ठ बंधू व प्रसिद्ध उद्योजक श्री. रामदास (आप्पा) काकडे व काकडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.