Posts

Showing posts from February, 2023

व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन

Image
 व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) दि.२७ व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये आठवड्याच्या अंतरात होणाऱ्या सांस्कतिक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसूरकर, प्रा. सोनी राघो व प्रा. प्राणेश चौव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आडठवडयामधील विविध होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेशा ठरवली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त

Image
 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) ट्रेकिंग पलटन पुणे ग्रूप तर्फे सलग तिसऱ्या वर्षी शिव जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंहगडाची अतकरवाडी ते पुणे दरवाजा ही गडवाट प्लास्टिक मुक्त करण्यात आली.  ट्रेकिंग पलटन गृप ची एकूण  ही ९६ वी मोहीम होती. घोड्यांची पागा, दारूगोळा कोठार, पाण्याची टाकं, पुणे दरवाजा मार्गे उतरत अतकरवाडी पर्यंत ट्रेक करत गडवाट च्या दोन्ही बाजूंना उतारावर पर्यटकांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेय बाटल्या तसेच बिस्कीट, वेफर्स अशा कोरड्या खाऊचे पॅकेट्स गोळा करून पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या स्वाधीन केला. असा सुमारे सहा पोती पर्यावरणास घातक कचरा गोळा करण्यात आला. ट्रेकिंग पलटन गृप च्या सदस्यांना कचरा गोळा करताना बघून काही पर्यटकांनी हातभार लावला. काहींनी आभार मानले. काहींनी कौतुक केले.  ट्रेकिंग पलटन गृप गेली सात वर्षे विविध गडावर अशा प्लास्टिक मुक्त अभियान राबवित आली आहे. सुदैवाने हळू हळू प्लास्टिक चे कचऱ्याचे प्रमाण कमी होत चाललेले दिसत आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी गडवाट वरील...

आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश

Image
आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा  स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. 17 कोरोना महामारीनंतर प्रथमच डी.एड.च्या विद्यार्थ्यांच्या कला स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये कॉलेजच्या PPT या स्पर्धेत बाफना डी.एड. कॉलेजची विद्यार्थिनी  कु. प्रीती माटे हिने तृतीय क्रमांक आणि लोकनृत्य या  स्पर्धेत विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य हिरामण लंघे, प्रा.राजेंद्र डोके, प्रा.मनोज गायकवाड, प्रा.शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई , प्रा.योगेश जाधव, नंदकिशोर, सोमनाथ धोंगडे  उपस्थित होते.

वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

Image
  वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न  शिक्षक शिक्षण क्षेत्रासाठी वसुधैव कुटुंबकम् संदेश महत्त्वपूर्ण : डॉ. दिपक माने  आळंदी पुणे : (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) येथील माईर्स, एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज मध्ये विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या  82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे संचालक डॉ. विजय खरे व डॉ. बी. बी. वाफारे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व संशोधक सहभागी झालेले होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये रोमानिया, युरोप मधून  डॉ. आन्का लाँयना निकोलायू, डॉ. नाडा राटकोव्हीक हे सहभागी झाले होते. या परिषदेत एमआयटी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांनी वसुधैव कुटुंबकम या विषयावर 12 शैक्षणिक मॉडेल तयार करून त्याचे सादरीकरण केले होते. सदर परिषदेमध्ये W2...