Posts

Showing posts from December, 2024

लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकावर संशोधन व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित

Image
  लोणावळा दि. ३१ (प्रतिनिधी) अल्फा-क्लोरालोज (α-chloralose) हा एक विषारी अंमली पदार्थ आहे, जो उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पक्षी मारण्यासाठी सर्रासपणे वापरला जातो. लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी प्रयोगशाळेत उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करून मानवी शरीरातील रक्तात असलेल्या सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया उलगडली आहे. या संशोधनासंदर्भातला शोधनिबंध नुकतेच नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड, इम्पॅक्ट फॅक्टर ५.३” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे या शोधनिबंधामध्ये अल्फा-क्लोरालोज कीटकनाशक हे मानवी शरीरासाठी मध्यम प्रमाणात विषारी असल्याचे सिद्ध झाले आहे. “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड” सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जेच्या उच्च प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी सामान्यत: ३४८० डॉलर (सुमारे तीन लाख रुपये) प्रकाशन शुल्क संशोधकांकडून घेतले जाते. परंतु, या संशोधनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि समाजासाठी अ...

ग्रंथांची मैत्री करणे म्हणजे ज्ञानाशी मैत्री करणे - संजय चाकणे

Image
डावीकडून प्रा.आनंद नाईक, डॉ.सुचेता दळवी, प्रा.राजेंद्र लेले, प्रा.शरदचंद्र बोटेकर आणि प्राचार्य डॉ.संजय चाकणे. पुणे दि.31 (प्रतिनिधी) वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य  संजय चाकणे यांच्या हस्ते "ग्रंथ प्रदर्शना चे उद्घाटन करण्यात आले.  याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना  "मैत्री करावी तर ग्रंथांची करावी कारण जो वाचक ग्रंथांशी मैत्री करतो त्याला मैत्रिरुपात अफाट ज्ञान मिळते" असे प्रतिपादन केले उपप्राचार्य डॉ.सुचेता दळवी, प्रा.राजेंद्र लेले, प्रा.बोटेकर, संचालक/ग्रंथपाल आनंद नाईक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यांस टी जे कॉलेज आणि सी के गोयल ज्यू कॉलेज मधील शेकडो विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शन पाहिले आणि अवांतर वाचन करणार असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल आनंद नाईक यांनी केले व तर आभार प्रदर्शन डॉ. शैलेंद्र काळे यांनी केले. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क  डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन...

पुस्तकांच्या सहवासात राहणारे कायम उच्च स्थान मिळवतात" - कृष्णकुमार गोयल

Image
  डावीकडून डॉ.संजय चाकणे, आनंद छाजेड, राजेंद्र भुतडा, डॉ.अर्जुन मुसमाडे, कृष्णकुमार गोयल, रमेश अवस्थे आणि आनंद नाईक पुणे दि. 30 (प्रतिनिधी)"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते "ग्रंथालय स्वच्छता अभियान" राबविण्यात आले प्रथमतः ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रंथालयातील 34000 अधिक ग्रंथांचा तसेच 27 नियतकालिके  आणि ग्रंथालयांची स्वच्छता व सर्वेक्षण केले.  अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी वाचकांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी "जे वाचक पुस्तकांच्या सहवासात राहणारे असतात ते कायम उच्च स्थान मिळवतात" असे प्रतिपादन केले तसेच 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या पंधरवड्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले, या उपक्रमानिमित्त खडकी शिक्षण सं...

विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांचे विचार दिशादर्शक-- प्रा. विवेक गुरव

Image
   वडगाव मावळ दि. ३० (प्रतिनिधी)  विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांची चरित्रे आणि विचार दिशादर्शक ठरतात विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचले पाहिजेत महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाचे ठरतात असे प्रतिपादन यशदाचे व्याख्याते प्रा. विवेक गुरव यांनी केले श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य बी.बी.ए. महाविद्यालय वडगाव मावळ या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते हे शिबिर नागाथली ता. मावळ जि पुणे इथे 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात प्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी छत्रपती संभाजी महाराज या विषयावर विचार मांडले प्रा. सोमनाथ कसबे यांनी युवकांपुढील आव्हाने या विषयावर विचार मांडले, शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावाचा परिसर, गावातील रस्ते स्वच्छ केले तसेच विविध प्रबोधनात्मक आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पथनाट्य सादर केली.        शिबिराच्या समारोपप्रसंगी संस्थेचे संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ...

बदलता भारत नव्या पिढीला समजून सांगण्याची गरज : संजय आवटे मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचा समारोप

Image
तळेगाव दाभाडे, दि. २८ : (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) बदलत्या जगात उद्याच्या पिढ्यांना फुलता यावे, असे वातावरण तयार करण्याची गरज आहे. मुलांना जाती धर्माच्या जंजाळात न अडकवता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर अशा विचारवंतांचा वारसा समजून सांगितला पाहिजे. मुलांना अश्रूचे महत्त्व, संवेदनशीलता शिकवा, तसेच आपले विचार मुलांवर न लादता त्यांना करिअर स्वातंत्र्य दिले, तरच उद्याची पिढी फुलणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.           इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचा समारोप संजय आवटे यांच्या ''चला उभारू नवी पिढी' या विषयावरील व्याख्यानाने झाला. दरम्यान, पर्यावरण संवर्धनात केलेल्या कार्याबद्दल अलोक काळे यांना, तर पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पं. सुरेश साखवळकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समारोपाच्या अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, उद्योजक संजय साने, परेश पारेख, राजेश म्हस्के, निरूपा कानि...

मुलींनो, खोट्या प्रेमाला भुलून आई-वडिलांची मान खाली जाऊ देऊ नका : वसंत हंकारे तुमच्यासाठी राजकुमार आणून देण्याची हिंमत तुमच्या बापात निश्चित आहे : वसंत हंकारे घरी गेल्यावर बाप किंवा आईला कडाडून मिठी मारून बघा काय चमत्कार होतो : वसंत हंकारे अनाथांकडून शिका आई-वडिलांची किंमत काय असते..! मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  तळेगाव दाभाडे, दि. २७ : (संपादक - डॉ. संदीप गाडेकर)    मी आंतरजातीय विवाहाच्या विरोधात नाही, परंतु शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात सोशल मीडियावरील मैत्रीला भुलून वाईट मार्गाला जाऊन आई - बापाची मान खाली जाईल, असे वर्तन करू नका. चांगलं शिक्षण घेऊन मोठे व्हा. तुमच्यासाठी राजकुमार आणून देण्याची हिंमत तुमच्या बापात निश्चित आहे, असे आवाहन व्याख्याते वसंत हंकारे यांनी मुलींना केले. दरम्यान, त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित सर्वच भावूक झाले.            इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना 'बाप समजून घेताना' या विषयावर वसंत हुंकारे बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू मारुती आडकर यांचा संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, गोरखभाऊ काळोखे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, निरूपा कानिटकर, विलास काळोखे, संदीप काकडे, युवराज काकडे, किरण काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदिंसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.           ह...

भारतीय ज्ञान परंपरेत जीवनाचे पॅकेज तयार होते : पद्मविभूषण सुमित्रा महाजन

Image
  तळेगाव दाभाडे, दि. २६ (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) :  ज्याला स्वतःची बुद्धीच नाही त्याला कितीही शास्त्र, ज्ञान सांगून उपयोग नाही. आंधळे बनून ज्ञान ग्रहण करता येत नाही. भारतीय ज्ञान परंपरेत जीवनाचे पॅकेज तयार होते. आपली राष्ट्रीय संपत्ती जपता आली पाहिजे. भारताला लाभलेली समृद्ध ज्ञान परंपरा आज सगळया जगाला दिशादर्शक ठरत आहे. या ज्ञान परंपरा, वारसा आजच्या पिढीने जतन करुन ठेवला पाहिजे. समाजासाठी काम केल्याने जो सन्मान मिळतो, त्याला तोड नाही, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मविभूषण सुमित्रा महाजन यांनी केले.             इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुमित्रा महाजन यांनी गुंफले. कार्यक्रमात साहित्य क्षेत्रात योगदानासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांना व  सांप्रदायिक क्षेत्रासाठीच्या भरीव योगदानासाठी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब ...

रक्षक झाला भक्षक : विसापूर किल्ला परिसरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार : मावळात पुन्हा निर्भया ?

Image
लोणावळा दि. 26 (प्रतिनिधी) बदलापूर प्रकरण , मावळातील कोथूर्णे प्रकरण या  सारख्या अनेक घटनांमधून बोध घेण्याचे सोडून रक्षकच भक्षक होत असल्याचे दिसून येत आहे. विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर दि. २५ डिसेंबर रोजी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय धक्कादायक असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख...

देहूरोड धम्मभूमीवर उसळला भिमभक्तांचा महासागर

Image
  देहूरोड, दि.२५ ( संपादक - डॉ.संदीप गाडेकर )  देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा ७० वा वर्धापन बुधवारी ( ता.२५ ) विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाख्खो बौद्ध बांधव,डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांनी भगवान गौतम बुद्ध आणि अस्थीस्तुपाचे दर्शन घेतले. वाहतूक नियंत्रक पोलीस आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.        .चैत्यभूमी,धम्मभूमी आणि दीक्षाभूमी असा त्रिवेणी संगम असलेल्या देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या बुद्ध विहारामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते २५ डिसेंबर १९५४ मध्ये  भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.ऐतिहासिक धम्मभूमीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले  हजारो भीम अनुयांयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपास मेणबत्त्या प्रज्वलित करून व पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले .पुस्तके, कॅलेंडर,फोटो, स्टेशनरी,कटलीरी, कपडे, खेळण्याच्या थाटलेल्या दुकानांनी धम्मभूमीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.धम्मभूमीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील उपस्थितीत भीमअनुयायीनी फुलून गेले होते.     ...

भीमथडीला खासदार सुप्रिया सुळेंची भेट, सुट्टीचा मुहूर्त साधत पुणेकरांनी केली प्रचंड गर्दी

Image
  पुणे ता. 25 (संपादक - डॉ .संदीप गाडेकर)   पोतराज, नंदीबैल, आदिवासी नृत्य, शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भारुडवाले, मल्लखांब प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या 18व्या भीमथडी जत्रेत आज पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली. अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीमथडी जत्रेचा काल समारोप झाला. महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यासह इतर 12 राज्यातील 338 बचत गटातील महिलांनी बनविलेल्या उत्पादनांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामीण उत्पादने, हस्तकला, व गावाकडील चवीचे पदार्थ या सर्वांना शहरी भागात बाजार पेठ मिळावी, दुवा साधला जावा यासाठीच भीमथडी काम करते. अनके पुणेकरांनी आवडलेल्या वस्तू तर खरेदी केल्याच पण पुढे भविष्यात आणखी काही मागणी द्यायची असेल तर बचत गटांचे संपर्क नं घेतले आहेत- आणि हेच भीमथडीचे यश आहे. चालू वर्षीच्या भीमथडी जत्रेला जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिली व सामाजिक बांधिलकी जपत जवळपास 7 कोटी 63 लाख रुची खरेदी करून बचत गटातील महिलांना समर्थन केले. या अर्थाने ...