Posts

Showing posts from July, 2024

जितेंद्र वळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Image
  पुणे दि.21 प्रतिनिधी शिक्षण शास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. निशा वळवी यांचे पती कै. जितेंद्र वळवी यांचे दिनांक 20 जलै 2024 रोजी पहाटे 1 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी 20 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता झाला. त्यांची मुलीने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी  दिला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते त्यांनी यावेळी त्यांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. जितेंद्र वळवी यांच्या जाण्याने वळवी परिवारावर दुःखाचे संकट कोसळले आहे.  वळवी परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो व त्यांच्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना शिक्षण क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी केली आहे. कै. जितेंद्र त्यांच्या पश्चात त्यांची आई, बहीण पत्नी व मुलगी असा परिवार आहे कै. जितेंद्र वळवी यांचा दशक्रिया विधी 29 जुलै 2024 रोजी औंध, पुणे या ठिकाणी होणार आहे.

डॉ.सुरेश ईसावे : शिक्षक पिढ्या घडविणारे महाशिक्षक - सूरज दिवटे, विटा

Image
आपल्या महान देशाला महान शिक्षकांचा वारसा लाभलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या शिक्षकांबद्दल एक हळवा कोपरा हा नेहमी असतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांनंतर शिक्षकच आदर्श स्थानी असतो, अगदी पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कधीही. मला सुद्धा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उत्तम शिक्षक लाभले. त्या प्रत्येकाकडून मी काहीतरी संचित वेचित गेलो, स्वतःला समृद्ध करीत गेलो. त्यामधील स्त्री शिक्षकांनी मला आईची माया संस्कार आपुलकी दिली. तर पुरुष शिक्षकांनी वडिलांचा आदरयुक्त धाक शिस्त लावली. त्याचाच परिपाक म्हणजे आज मी स्वतः एक शिक्षक म्हणून माझ्या सर्व शिक्षकांच्या संस्काराचा वारसा सोबत घेऊन सेवा करीत आहे.  त्यापैकीच एक शिक्षक मला आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उमेदीच्या काळात लाभले. ज्यांच्याअंगी वर नमूद केलेल्या गुणांचा अप्रतिम संगम मला अनुभवायला मिळाला. असे आमचे प्रेरणादायी शिक्षक म्हणजेच डॉ.प्रा.सुरेश गोपीचंद ईसावे सर. सर गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पुणे येथे ज्ञानदान करण्यासाठी शिक्षक पिढी घडवित आहेत.  सर स्वतः ग्रामीण पार्श्वभूमीतू...

आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन

Image
तळेगाव दाभाडे दि.16 (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) येथील पीएम श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र 6 नगरपरिषद शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक  केशव चिमटे यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या पालखी सोहळ्यात शाळेतील 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  संत ज्ञानेश्वर शाळा ते श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जोशीवाडा अशी विद्यार्थ्यांची पायी दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, विविध संत व वारकरी वेशभूषा परिधान केल्या होत्या. या दिंडी सोहळ्यात  शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापन समितीने उत्स्फूर्त सहभाग  घेतला होता. यासोबतच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण दिंडी काढण्यात आली होती. यावेळी तळेगाव दाभाडे शहर समन्वयक गीतांजली होनमाने व त्याचे सहकारी उपस्थित होते. बातमी व जाहिरात संपर्क  डॉ.संदीप गाडेकर  8208185037

राधाबाई भांगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

Image
  कान्हे दि. १३ (प्रतिनिधी) येथील श्रीमती राधाबाई किसनराव भांगरे (वय-८४) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दि. ०५/०७/२०२४ रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रिया दिनांक १४/०७/२०२४ रोजी कान्हे येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मावळ तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज भांगरे व आदर्श शिक्षक सागर भांगरे यांच्या त्या चुलती होत.

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

Image
  तळेगाव दाभाडे दि. १३ (प्रतिनीधी) दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड  अकाउंटंटस आॅफ  इंडिया कडून घेण्यात आलेल्या फायनल परिक्षेत तळेगाव दाभाडे येथील कु. वैष्णवी मखर हिन घवघवीत यश संपादन करुन मावळ तालुक्याचे नावलैकिकात  भर टाकली आहे . वैष्णवी हीने आपल्या कुशाग्र बुध्दीच्या जोरवार अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे. माऊंट सेंट अॅन हायस्कूल तळेगाव दाभाडे येथे सन २०१६ ला ९७ टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला होता . तेव्हाच तीने सनदी लेखापाल (सी .ए.) होण्याचा मनोदय व्यक्त केला होता. सातत्य , जिद्द, चिकाटी, ध्येय व आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. ई. वाय.सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीत आर्टिकल शिप पूर्ण करून पुढे कार्पोरेट  क्षेत्रात  करीअर करण्याचा मनोदय तिने  व्यक्त केला. आपल्या यशाचे सर्व श्रेय ती आपल्या आई वडिलांना देते.  वैष्णवीचे वडील लक्ष्मण मखर हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे येथे गेली २७ वर्षं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय मावळ तालुक्यातील विविध सामाजिक,सहकारी , शैक्षणिक संस्थांमध्ये विविध पदांवर का...

शिवराज्याभिषेक 350 सोहळा वर्षाच्या निमित्ते राजधानी रायगड अभ्यास सहल यशस्वीरित्या संपन्न

Image
  तळेगाव स्टेशन दि. 6 (प्रतिनिधी)     शिवशाही दुर्गाभ्यास परिवार व लॅटीस परिवार उत्सव समिती संयुक्त आयोजित राजधानी रायगड अभ्यास सहल नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.     शिवशाही दुर्गाभ्यास परिवारचे डॉ.प्रमोद बोराडे व डॉ.प्रिया बोराडे यांनी संपूर्ण ट्रेकचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. रायगड वरील संपूर्ण इतिहासाची डॉ.बोराडे यांनी इथंभूत कालनिहाय व्याख्याने घेतली. यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का व कसा झाला तसेंच त्याचे काय परिणाम काय झाले, रायगड सुरक्षा कशी होती, राजधानीचे भौगोलीक व ऐतिहासिक महत्व काय होते, शिवरायांच्या मृत्युचे खरे कारण काय होते, वाघ्या कुत्रा आणी सत्य काय, दुर्गावरील शिलालेख व त्याचा अर्थ काय तसेंच रायगडाचा प्राचिन ते भारताच्या स्वतंत्र्यापर्यंतचा इतिहास डॉ. बोराडे यांनी सांगितला.  तळेगाव दाभाडे शहर पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच सुमारे १०८ शिलेदारांचा ग्रुप या अभ्यास मोहिमेकरता रायगडावर दाखल झाला होता. वातावरण आल्हाददायक असल्याने सर्वांनी या ट्रेकचा मनमुराद आनंद घेतला. सदर अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी लॅटिस सोसायटीचे अध्यक्ष शैलेश भेगडे य...

माउंटन एज ॲडवेंचर्सचे संस्थापक सदस्य रोहित नागलगांव यांना पीएच.डी. प्रदान

Image
  तळेगाव दाभाडे दि.6 (प्रतिनिधी)  माउंटन एज ॲडवेंचर्स ॲंड वाईल्ड ट्रेल्स संस्थेचे  रोहित नागलगाव यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. रोहित नागलगाव यांनी "एक्स सिटु कंजर्वेशन ऑफ़ एंडेंजर्ड महासिर इन इंद्रायणी रिव्हर, पुणे, इंडिया" या विषयावर आपला शोधप्रबंध मुंबई विद्यापिठाला सादर केला होता. मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रतील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन नागलगाव यांना लाभले.  या संशोधन कामात डॉ. प्रविण सप्तर्षी, डॉ. शशांक ओगले, डॉ. सुधाकर इंदुलकर आदी मान्यवरांचे  मोलाचे मार्गदर्शन मिळाले. रोहित नागलगांव यांनी या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केले आहेत. इंडियन सायन्स यूथ कॉंग्रेस परिषदेमधे मौखिक सादरीकरणामधे तृतीय क्रमांक व इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लनरी कॉन्फरन्स ऑन ईमर्जिंग ट्रेंड्स इन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी मधे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्री रोहित हे मागील १५ वर्षापासुन गिर्यारोहण व निसर्ग संवर्धन कार्यात उल्लेखनिय काम करत असल्याचे माउंटन एज ॲडवेंचर्सचे अनिल जाधव यांनी सांगित...

व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, लोणावळा येथे योग दिन साजरा

Image
  दि. 21 व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, लोणावळा या महाविद्यालयात दिनांक २१ जून २०२४ रोजी जागतिक योगा दिनानिमित्त “राजयोग कन्सल्टिंग ग्रुप" तर्फे योगा दिन साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमावेळी नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. सतीश गवळी, सभेचे सदस्य श्री. भगवान आंबेकर, श्री. नितीन गरवारे, ऍड. संदीप अगरवाल यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरीश हरसुरकर आणि प्रो. हुसेन शेख व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.