मावळ शिक्षक प्रबोधन परिवार संचलित वसंतचैतन्य व्याख्यानमाला उत्साहात संपन्न
मावळ शिक्षक प्रबोधन परिवार संचलित.. वसंतचैतन्य व्याख्यानमाला नुकतीच वडगांव मावळ येथे पार पडली. यात पहिल्या दिवशी माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी तर दुसऱ्या दिवशी हास्य कवी अशोक नायगावकर आणि तिसऱ्या दिवशी मराठी भाषांच्या सदिच्छादूत, ख्यातनाम अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेसाठी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. दररोज व्याख्यानानंतर ११ गुणवंत शिक्षकांना 'सानेगुरुजी पुरस्कार', 'राष्ट्रमाता जिजाऊ गुणवंत शिक्षिका पुरस्कार' तर तालुक्यात आदर्श काम करणाऱ्या ११ शिक्षक जोडप्यांना 'साऊ-ज्योती गुणवंत शिक्षक दाम्पत्य पुरस्कार' अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजधुरिणांच्या मार्गाने चाला. -इंद्रजित देशमुख. माजी सनदी अधिकारी तथा निरुपणकार इंद्रजित देशमुख यांनी 'माणूस म्हणून जगण्यासाठी..' आपल्याला समाजधुरिणांच्या मार्गाने चालण्याचा सल्ला दिला. छत्रपती शिवराय, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या अनेक थोर महापुरुषांनी समाज घडवण्यासाठी आपलं अवघं आयुष्य वेचलं. स्वतःच्या उदात्त त्या...