१२ वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाची दिव्या भेगडे मावळ विभागात प्रथम
तळेगाव दाभाडे: दि 21 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२३-२४ रोजी घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयातील मुलींनी बाजी मारली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशावर आपले नाव कोरले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७%, वाणिज्य शाखेचा निकाल ८९.२२% इतका लागला असून कला शाखेचा निकाल ७३.२५% इतका लागला आहे. तंत्रशिक्षण विभागाचा निकाल हा ९२.५०% इतका लागला आहे. या निकालात याही वर्षी विद्यार्थिनींनी आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेतून कु.भेगडे दिव्या संदीप या विद्यार्थिनीने ९५.१७% इतके गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला असून. रसायनशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवले आहे. वाणिज्य शाखेतून कु. पडवळ सार्थक रोहिदास या विद्यार्थ्यांने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे. कला शाखेतून कु. मराठे वैष्णवी साहेबराव हीने ७५.३३% गु...