शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचे कंबरडे मोडणारे - प्रा.संतोष थोरात , अध्यक्ष - पुणे शहर टीडीएफ
शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचे कंबरडे मोडणारे - प्रा.संतोष थोरात, अध्यक्ष- पुणे शहर टीडीएफ आजच्या काळात शासनाने सर्वच क्षेत्रांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करण्याचे धोरण अवलंबल्याचे आपल्याला पाहायला मिळते.यास शिक्षण क्षेत्र अपवाद कसे असेल.नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने दि.18 सप्टेंबर 2023 रोजी शाळा खाजगी कंपनींना दत्तक देण्याचा तसेच वीस पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करून समूह शाळा संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.अशा तऱ्हेने महाराष्ट्र शासनाकडून जे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल केले जात आहेत हे बदल शिक्षण क्षेत्राचे कंबरडे मोडणारे असून विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आरटीई कायद्याला हरताळ फासणारे आहेत. कायम विनाअनुदान धोरण, स्वयंअर्थसहाय्य शाळा, तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक, कला ,क्रीडा, कार्यानुभव विषय हद्दपार करणे, शिक्षक भरती न करणे, समुह शाळा प्रकल्प राबवणे, शाळा दत्तक देणे, खाजगी विधेयक कायदा मंजूर करणे, मराठी शाळेला मान्यता न देणे, मागेल त्याला इंग्रजी शाळांच्या मान्यता देणे, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण...