Posts

ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे ईश्वरीय रक्षाबंधन संपन्न

Image
नांदेड दि. ८ (प्रतिनिधी)नांदेड फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास ब्रह्माकुमारीज वसंत नगर येथील वरिष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी,बि.के.अनिता दिदी,बि.के.सत्या दिदी व योगिनी दिदी यांची उपस्थिती होती. बि.के.अनिता दिदि यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर स्वाती दिदि यांनी रक्षाबंधन या भाऊ बहीनीच्या पवित्र उत्सवा प्रसंगी हेल्थ अँड वेल्थ चा आणि अध्यात्मिक कोर्स करण्याचा संकल्प परमात्मा कडे करु या असे प्रतिपादन दिदिनी केले. सर्व भाऊ बहिणीना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देऊन परमात्मा संदेश चे वाचन करण्यात आले. नंतर सर्वांना ईश्वरीय राखी बांधण्यात आली.कार्यक्रमास फरांदे पार्क व परिसरातील बि.के परिवार मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम आध्यात्मीक उत्साहात साजरा झाला. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

दिव्यांग मुलांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे विशेष आयोजन

Image
तळेगाव स्टेशन  दि. 7 (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच व रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील कामयानी संस्थेच्या सिंधुताई जोशी उद्योग केंद्रामध्ये दिव्यांग मुलांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले,या उपक्रमाची माहिती देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ.स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी असे सांगितले की, गेली एक तपाहून अधिककाळ  हा उपक्रम राबवित आहे.समाजातील अत्यंत संवेदनशील असणार्या दिव्यांग मुलांशी संवाद साधून त्यांच्या अंतर्मनातील भावनांचे प्रकटीकरण होण्यासाठी अशाप्रकारच्या सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाची नितांत गरज असते. सौ.बाळसराफ यांनी तरूण पिढीने हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की, परमेश्वराने आपल्याला उत्तम शरीरसंपदा दिलेली आहे.दुदैवाने त्यांना असे भाग्य प्राप्त झाले नाही त्या दिव्यांग मुलांसाठी सहकार्याचा हात पुढे करणे हीच खरी समाजसेवा व मानवधर्म आहे, त्यामुळे समाजातील दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती पेक्षा त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्याशी सहकार्याची भावना वृध्दिंगत करा ...

बडे अनमोल हे गीतों के बोल- डॉ. सुनील देवधर

Image
  तळेगाव दाभाडे दि.7 (प्रतिनिधी)हिंदी चित्रपट दिग्दर्शकांनी एक पिढी समृद्ध करत सामाजिक सांस्कृतिक कार्यात दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय आहे.  गुलजार यांनी दिल की उम्मीदों का हौसला तो देखो... इंतजार उसका है.... जिसको अहसास तक नहीं... अशी शेरो शायरी करत, हिंदी चित्रपट गीते ही अशी समृद्ध झाली  आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतांमधील भावनात्मक गूढता, साहित्यिकता आणि सांस्कृतिक संदर्भ तसेच शब्दांबरोबर केलेली तडजोड वाखाणण्यासारखी आहे.   असे उद्गार आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त सहाय्यक संचालक डॉ. सुनील केशव देवधर यांनी काढले. ते काल हिंदी विभाग आयोजित  'हिंदी फ़िल्मी गीत : साहित्य और संस्कृति की कसौटी पर' ह्या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,  हिंदी विभाग प्रमुख डॉ. मधुकर देशमुख, प्रा. राजेंद्र आठवले आधी उपस्थित होते.  हिंदी चित्रपट गीते आणि त्यातील गमती जमती आणि शब्दांशी लेखक, कवी, दिग्दर्शकांनी साधलेला हृदयी संवाद त्यातून ध्वनीत झालेले अर्...

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा लाईट हाऊस शोधावा... श्री. चंद्रकांत शेटे. इंद्रायणी महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत...

Image
  तळेगाव दाभाडे दि.६  (प्रतिनिधी): "शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्याशी मुक्त संवाद साधला पाहिजे. सहजगत्या संवादातून विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत सहज पोहोचता येते. महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो. हे जीवन तुमचे उद्याचे आयुष्य आणि भविष्य घडवत असते. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या मदतीने आपल्या आयुष्याचा लाईट हाऊस शोधला पाहिजे." असे गौरवद्गागार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी काढले. ते काल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.   यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, पर्यवेक्षिका प्रा. उज्वला दिसले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. राजाराम डोके, विज्ञान विभागप्रमुख प्रा. यु. एस. खाडप, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. वीणा भेगडे, कला विभागप्रमुख प्रा. के. डी. जाधव, तंत्रशिक्षण विभागप्रमु...

विद्यार्थ्यांनी जीवनाचा सक्सेस पासवर्ड शोधला पाहिजे... प्रा. डॉ. अशोक थोरात

Image
  तळेगाव दाभाडे दि. 02 (प्रतिनिधी) "विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पकता वापरून ध्येय साध्य करण्याचा अविरत प्रयत्न केला पाहिजे, असे केल्यास तुम्हाला जीवनाचा सक्सेस पासवर्ड मिळेल. नवीन शैक्षणिक धोरणात वेगवेगळ्या विद्याशाखेतील ज्ञान अर्जित करण्याची उत्तम संधी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच भाषिक कौशल्ये आत्मसात करण्याकडे भर दिला पाहिजे. भाषा ही सर्वव्यापी असून ती जगण्याच्या केंद्रस्थानी असते." असे गौरव उद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवविज्ञान  विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि पुणे स्थित इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन इंग्लिश ह्या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. अशोक थोरात यांनी काढले. ते काल इंद्रायणी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रूपकमल भोसले, विज्ञान विभागप्रमुख डॉ. रोहित नागलगाव , डॉ. विजयकुमार खंदारे, प्रा. दीप्ती पेठ, डॉ. मधुकर देश...

मोबाईलचा अतिरेक टाळा: विलास भेगडे

Image
  तळेगाव दाभाडे दि. 29 (प्रतिनिधी): मोबाईलमुळे संवाद हरवत चालला असून मीडियाच्या युगात मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.मुले-मुली मोबाइलचा अतिरेक वापर करतात. तो टाळला पाहिजे. गुणवंत विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन  तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे यांनी केले. राधा कल्याणदास दर्यानानी चारिटेबल ट्रस्ट संचलित साईबाबा प्रकल्प कान्हे, मावळ येथे शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करताना ते बोलत होते. यावेळी नॅशलिस्ट  डिटेक्टिव्ह फोर्सचे सीनियर ऑफिसर प्रफुल्ल झांबरे, ज्युनियर ऑफिसर अक्षय भोसले, बालाजी भोई, ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब काळे, सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे, प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती वेदक, सोशल वर्कर अर्चना पिंगळे, दत्तात्रय चांदगुडे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सदानंद भगवान दळवी व स्वर्गीय लक्ष्मण माधवदास वाधवानी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. आकाश पुंडलिक पुजारी (श्री छत्रपती...

पवना हॉस्पिटल आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
सोमाटणे दि. २९ (प्रतिनिधी) - मावळ तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्याचे हित लक्षात घेत, मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू - भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवारी (दि. २९) पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे आयोजित करण्यात आले होते. पवना हॉस्पिटलचे पवना मेडिकल फाउंडेशन आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या शिबिरास तालुक्यातील सर्वच विभागातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सत्यजित वाढोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. वर्षाताई वाढोकर, डॉ. प्रतिक वाढोकर यांच्या सहकार्याने आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, सचिव रामदास वाडेकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच तालुका पत्रकार संघाचे संलग्न पत्रकार संघ यात वडगाव शहर मराठी पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे प्रेस फाउं...

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या राजेंद्र शंकरपुरे यांना ‘राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार'

Image
  पुणे दि. 28 (प्रतिनिधी) ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार २०२५’ आज पिंपरी-चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार राजेंद्र शंकरपुरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि समाज उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला. शंकरपुरे यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या उपक्रमांना समाजातील विविध स्तरांतून मोठा प्रतिसाद लाभला आहे. या आधीही त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नेशन्स प्राईड अवॉर्ड, महाराष्ट्र उद्योग सन्मान, नवभारत सेवा रत्न पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार, राष्ट्रीय एकता वीरता पुरस्कार यांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचे आणखी एकदा कौतुक झाले असून, त्यांच्या गावासह संपूर्ण परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXi...

श्रावणमासी ..हर्षमानसी..मेंदी खुलली चोहिकडे - श्रावण महोत्सवात इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी

Image
  तळेगाव दाभाडे दि.२८ (प्रतिनिधी )  : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रावण महोत्सवात अंतर्गत इयत्ता १२ वी च्या कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील  विद्यार्थिनी उत्साहपूर्ण सहभागी होत ७० स्पर्धक मुलींनी सहभाग नोंदविला होता.विशेष बाब म्हणजे सदर स्पर्धेत मुलांचा सहभाग देखील महत्वाचा ठरला. याप्रसंगी मेहंदी महोत्सवाचे उद्घाटन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या हस्ते करण्यात आले.परीक्षण यशोदा महादेव काकडे काॅलेज ऑफ इंजीनियरिंग उपप्राचार्य डॉ.अमृता सुराणा तसेच बी. फार्मसी महाविद्यालयातील प्रा.कादंबरी घाटपांडे यांनी केले. यावेळी समन्वयक गोरख काकडे पर्यवेक्षिका प्रा. उज्वला दिसले व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. विना भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कला,विज्ञान विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हर्षदा पाटील तसेच समिती सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राची भेगडे तर आभार प्रा.शितल राजपूत यांनी मानले. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन ...