व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर संपन्न
लोणावळा दि. १४ (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये दिनांक १२/११/२०२४ व १३ /११ /२०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक "स्पंदन ब्लड बँक" खराडी पुणे हे होते. या शिबीरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाला स्पंदन ब्लड बँककडून प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके संस्थेचे सभासद श्री. नितीन गरवारे,श्री स्वप्निल गवळी, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख,प्रा.सोनी राघो, प्रा.सायली धारणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. बातमी ...