Posts

Showing posts from January, 2024
Image
व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये Sports Week  चे आयोजन  लोणावळा दि २९ (प्रतिनिधी)  व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये आज दिनांक 29/01/2024 रोजी  शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या Sports Week ची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल मेम्बर श्री.भगवान आंबेकर, अॅड श्री.संदीप अगरवाल व कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ.ठाकूर यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते प्रथम श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले नंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.                       यावेळी मान्यवरांनी हॉली बॉल व क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला तसेच शंभरहुन अधिक विद्यार्थी खेळात  सहभागी झाले होते.मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर खेळाचेही महत्व सांगत मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके ...

विद्या प्रसारीणी सभेची प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आय. मेडीटा ला औद्योगिक भेट

Image
विद्या प्रसारीणी सभेची प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आय. मेडीटा ला औद्योगिक भेट लोणावळा (प्रतिनिधी) दि. २७  विद्या प्रसारीणी सभेचे व्हि. पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड टेक्नोलोजी वाकसई लोणावळा येथून दि. १९/०१/२०२४ रोजी विद्या प्रसारीणी सभेची प्रथम वर्षाची औद्योगिक भेट (Industrial Visit) आय. मेडीटा (I-Medita) बानेर, पुणे येथे गेली होती. या भेटरीकरीता इंजिनिअरींग कॉलजचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर तसेच प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रो. हुसेन शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या भेटीमध्ये कॉलजच्या शिक्षक कर्मचारी प्रो. मनिषा कचरे व प्रो. रश्मी भुंबरे आणि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा  लोणावळा दि 26 (प्रतिनिधी)  व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्निंग कौन्सिल चे मेम्बर श्री. अरविंद मेहता,विद्या प्रसारिणी सभेचे मेम्बर श्री. राजेश मेहता तसेच गजाननभाई मेहता उपस्थित होते.                          ध्वजारोहन मा. श्री.अरविंद मेहता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालायचे प्राचार्य मा. डॉ. मानव अ. ठाकूर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.हरीश हरसुरकर ,प्रो.हुसेन शेख, प्रो. प्राणेश चव्हाण, प्रो.सोनी राघो, प्रो. मनीषा कचरे, श्री. रोहित जगताप , व्ही. पी एस इंग्लिश मीडीअम स्कुल च्या प्राचार्या सौ. निशा नाईक उपस्तित होत्या तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्तित होते.           या प्रसंगी व्ही. पी. एस इंग्लिश मी...

पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य शिवाजीराव कामथे तर सचिव पदी प्राचार्य राज मुजावर यांची बिनविरोध निवड

Image
 पुणे  माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य शिवाजीराव कामथे  तर सचिव पदी प्राचार्य राज मुजावर यांची बिनविरोध निवड पुणे, दि. २५ (प्रतिनिधी)  पुणे माध्यमिक सहकारी पतसंस्थेची पदाधिकारी निवडी बाबतची वार्षिक सभा 1030 ,सगुना अपार्टमेंट, सदाशिव पेठ पुणे या पतसंस्थेच्या कार्यालयात आर.पी. बनाईत अध्यासी अधिकारी,सहकार  खाते, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व  प्रमुख संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रामराज्य विद्यालयाचे प्राचार्य तसेच पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष, प्राचार्य शिवाजीराव कामथे सर यांची अध्यक्षपदी तर अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे प्राचार्य व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर यांची सचिव पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.    तसेच पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी अशोक विद्यालयाचे धोंडीबा तरटे, खजिनदारपदी नूमवि विद्यालयाच्या डॉ.मंगल शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय विजय कचरे सर तसेच सर्व उपस्थित संचालकांच्या वतीने पुष्पगुच्छ द...

विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न

Image
  विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न   तळेगाव स्टेशन दि. 22 ( वार्ताहर ) न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुll विद्यालयात स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा पार पडला. डिसेंबर २०२३ मध्ये विद्यालयात विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्याचा बक्षिस समारंभ संस्थेचे सचिव अशोकजी बाफना यांच्या हस्ते शुभहस्ते पार पडला. तसेच विद्यालयातील सेवा निवृत्त होणारे प्राचार्य बाळासाहेब उभे ,तसेच इतर शिक्षक असवले नारायण , माणिक जाधव व पिराजी वारिंगे यांचा सेवा सन्मान सोहळा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते सहपत्निक झाला . समारंभ प्रसंगी सरपंच,उपसरपंच ,ग्रा.पंचायत सदस्य, पो.पाटील,चेअरमन व ग्रामस्थ माजी विद्यार्थी बहु संखेने उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे, माध्यमिक शिक्षक संघाचे, प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी समारंभ प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी सन्मार्थीना  शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे प्रास्तविक  नारायण असवले यांनी व उपस्थितांचे स्वागत प...

शुभम दिलीप घरात चे Aurus Pvt. Ltd. Nigdi Pune या कंपनी मध्ये निवड

Image
 शुभम दिलीप घरात चे Aurus Pvt. Ltd. Nigdi Pune या कंपनी मध्ये निवड लोणावळा दि. १७ (प्रतिनिधी) विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मधून कॉम्पुटर इंजिनिअरिंग या शाखेतून BE उत्तीर्ण झालेला विद्यार्थी शुभम दिलीप घरात या विद्यार्थ्याला Aurus Pvt. Ltd. Nigdi Pune या कंपनी मध्ये नोकरी मिळाली आहे त्याबददल त्याचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे तसेच सर्व सभासदांनी केले. त्याच्या पुढील वाटचालीस कॉलेजचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, TPO (Training & placement officer) डॉ. हरीश हरसूरकर व Computer HOD प्रो. सोनी राघो यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या

अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Image
 अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी वडगाव मावळ दि.१२ (प्रतिनिधी) येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यापक महाविद्यालय  (बीएड व एम.एड.) वडगाव मावळ यांच्या वतीने महाविद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी उपस्थित  प्र.प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी सर्व बी.एड. व एम.एड. चे शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हॅपी फ्लावर्स प्री प्रायमरी स्कूलचे तळेगाव दाभाडे, स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Image
  हॅपी फ्लावर्स प्री प्रायमरी स्कूलचे तळेगाव दाभाडे,  स्नेहसंमेलन उत्साहात साजरे तळेगाव स्टेशन दि. १०  (प्रतिनिधी) येथील कालेकर एज्युकेशन सोसायटीच्या तळेगाव दाभाडे येथील हॅपी फ्लॉवर्स प्री प्रायमरी स्कूलचे "वार्षिक स्नेहसंमेलन" अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले .    कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने करताना येणाऱ्या प्रत्येक मुलाचे पालकांचे स्वागत जोकर द्वारे केल्यामुळे "हॅप्पी फ्लॉवर्स" मध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी येतानाच 'हॅपी' झाला. प्रायमरी सेक्शन मधील बालचमुने  एवढ्या लहान वयात विविध कलागुण सादर केले. यामध्ये कोळीगीत, लेट्स शाईन  असे ग्रुप डान्स सादर  करण्यात आले. त्याबरोबर वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या लहान वयात 2 ते 5 या वयोगटातील 13 विद्यार्थ्यांनी हजार हात हे स्वामी समर्थांवर आधारित नाटक सुद्धा सादर केले. आणि प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा महा गजर झाला. कार्यक्रमाची सांगता करताना सांता अवतरला आणि त्याबरोबर सुरुवातीला आलेला जोकर सुद्धा उतरला. यामुळे तर बालचमुनमध्ये आणि पालका...

प्राचार्य शिवाजीराव कामथे यांना मातृशोक

Image
 प्राचार्य शिवाजीराव कामथे यांना मातृशोक पुणे, दि. 10 (प्रतिनिधी)   पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष व पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या मातोश्री कै. सुलोचना दशरथ कामथे यांचे दि. 9 जानेवारी 2024 वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देऊन परिसरामध्ये परिवाराचा नावलौकिक त्यांनी वाढवला. त्यांच्या निधनाने  सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव कामथे , खळद गावचे प्रगतशील शेतकरी नारायण कामथे,दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सदर दशक्रिया विधी खळद ता.पुरंदर येथे  क-हा नदीकाठी शनिवार दि.13/1/2024 रोजी सकाळी ठि. 8.30 वा.संपन्न होईल.

अध्यापक महाविद्यालय, वडगाव - मावळचा 'बालिका दिन' संपर्क बालग्राम, भाजे येथे साजरा

Image
 अध्यापक महाविद्यालय, वडगाव - मावळचा 'बालिका दिन' संपर्क  बालग्राम, भाजे येथे साजरा      वडगाव मावळ दि. 7 (प्रतिनिधी) श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमातून वेगळा अनुभव व समाजाप्रती कृतज्ञता बिंबवण्याचा प्रयत्न करत असते. शैक्षणिक वर्ष २३-२४ मध्ये सांस्कृतिक विभागाचा पहिला कार्यक्रम ‘बालिका दिन’ ३ जानेवारी २०२४ रोजी अनाथ बालिकांसाठी कार्यरत समाजसेवी संस्था ‘संपर्क बालग्राम, भाजे’ येथे साजरा करण्याचे ठरले. आश्रमातील मुलींच्या शाळेच्या वेळेस अनुसरून हा कार्यक्रम ६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.      सांस्कृतिक गट 'भरड धान्य - राळा' यांनी गट मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. शीतल देवळालकर यांच्या मार्गदर्शनाने हया कार्यक्रमाची रूपरेषा आखली. रुपाली तुपे हिने सूत्रसंचालन केले, नमिता ओव्हाळ हिने कार्यक्रमास आवश्यक सामग्रीची जमवाजमव केली. घुले रंजना हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संकल्प बालग्रामचे प्रकल्प अधिकारी श्री. अवधूत बोगार्डे सर यांची ...

संशोधनामुळे भारतदेशाचा विकास – उदय निरगुडकर

Image
संशोधनामुळे भारतदेशाचा विकास – उदय निरगुडकर तळेगाव दाभाडे दि.६ (प्रतिनिधी) भारतातील तरूण संशोधकांमुळे नविन तंत्रज्ञान  विकसित होत आहे. त्यामुळे भारत देश हा जगात अव्वल स्थानी आपल्याला दिसेल असे भाकित जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ भुषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफताना श्री निरगुडकर हे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार डाॅ शैलेश गुजर हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,संचालक युवराज काकडे,संदिप काकडे,विलास काळोखे,माजी नगराध्यक्ष ॲड रविंद्र दाभाडे,निरुपा कानिटकर,प्राचार्य डॉ संभाजी मलघे, राजश्री म्हस्के, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, माजी नगरसेवक संतोष भेगडे, भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संस्कृती मध्ये सर्व धर्म- समभावाचे दर्शन घडते– डॉ. श्रीपाल सबनीस

Image
भारतीय संस्कृती मध्ये सर्व धर्म- समभावाचे दर्शन घडते– डॉ. श्रीपाल सबनीस तळेगाव दाभाडे दि. ५ (प्रतिनिधी) “माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय. चांगुलपणाची विभागणी करून चालत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वरांच्या ओवीला बहिष्कृत भारतात डोक्यावर घेतात, हा संवाद आपण लक्षात घेणार आहोत की नाही,” असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत तिसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्थिक विकास मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर होते. यावेळी व्यासपीठावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष दीपक शहा, गोरखभाऊ काळोखे,कार्यवाहक चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,सदस्य गणेश खांडगे,संदीप काकडे,युवराज काकडे, रणजीत काकडे,विलास काळ...

सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ शैक्षणिक कार्यासाठी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Image
 सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ शैक्षणिक कार्यासाठी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित तळेगाव दाभाडे दि.७  (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारणी समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने उरुळी कांचन येथे सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मा. रवींद्र चव्हाण संचालक यशदा व बार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना स्नेहल बाळसराफ यांनी 'सावित्रीबाई फुले स्त्री उद्धारकाच्या आद्य प्रवर्तक' या विषयावर व्याख्यान झाले यावेळी भाषणामध्ये त्यांनी फुले दांपत्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद झालेली आहे, असे मत प्रतिपादन केले.  शूद्र व अतिशूद्र तसेच महिला यांच्या सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड विरोध पत्करून प्रसंगी शेण-गोटे यांचा मारा सहन करून महिलांना शिकवण्याचे महान कार्य केले आणि शूद्रांना व महिलांना समाजा...

सावित्रीची लेक या पुरस्काराने सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ सन्मानित

Image
 सावित्रीची लेक या पुरस्काराने सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ सन्मानित तळेगाव दाभाडे दि.7 (प्रतिनिधी) श्री संत सावता माळी समाज विकास मंडळ कळंबोली, नवी मुंबई यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती व महिला मुक्ती दिन या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, तसेच इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री मा. नामदार श्री. अतुलजी सावे यांच्या शुभहस्ते स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ यांना सावित्रीची लेक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  सौ स्नेहल बाळसराफ  शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मंडळातर्फे  सौ स्नेहल बाळसराफ यांना विशेष सन्मानित करण्यात आले. मा. नामदार श्री अतुलजी सावे यांनी सौ. स्नेहल बाळसराफ यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल विशेष कौतुक करून महिलांच्या विकासासाठी सौ. स्नेहल बाळसराफ यांनी सामाजिक कार्य जोमाने पुढे चालू ठेवावे,  तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठा अनुभव असल्याने अधिक लिखाण करून समाजाला प्रबोधित करावे असे मत स्पष्ट करून त्यांच्या  कार्याचा गौरव केला. सौ बाळसराफ याचे माध्यमातून समाजातील महिलांचे संघटन, युवा...

डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट, वराळे, तळेगाव पुणे येथे नोकरी / रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
 डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट, वराळे, तळेगाव पुणे येथे नोकरी / रोजगार मेळाव्याचे आयोजन    तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी डॉ. डी. वाय पाटिल एज्युकेशनल फेडरेशन अंतर्गत डॉ. डी वाय पाटिल इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट या संस्थेमध्ये नोकरी / रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्या मध्ये एकुण २ हजार १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या पैकी ९५८ विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखती साठी उपस्थित राहीले होते. हा एकदिवसीय मेळावा अभूतपूर्व ठरला आहे.    सामाजिक बांधिलकी व समाजकार्य या भावनेतून संस्थेचे अध्यक्ष डॉ सुशांत पाटील, सचिव अॅड अनुजा सुशांत पाटील तसेच संचालिका डॉ. प्रियंका सिंग यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या करीता पुणे व परिसरातील ३० पेक्षा जास्त नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तळेगाव व परिसरातील बेरोजगार तरुण व तरुणींना एकाच ठिकाणी विविध कंपन्यां मध्ये रोजगार मिळण्या च्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ह...

मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार वेगाने - पृथ्वीराज चव्हाण

Image
मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार वेगाने  - पृथ्वीराज चव्हाण  तळेगाव स्टेशन दिनांक 3 (वार्ताहर) मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार वेगाने काम करतो ही सकारात्मक बाब असताना त्यापासून होणाऱ्या तोटयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रचंड वेगाने घडणारी क्रांती असून ती प्रत्येकाला कसे प्रभावित करू शकेल हे अद्याप अनिश्चित आहे. असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित नवव्या मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे (Talegaon Dabhade)दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानमालेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या बी फार्मसी महाविद्यालयाला कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च असे नाव देण्यात आले.हा नामकरण सोहळा पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी त्रिदल पुणेचे डॉ.सतिश देसाई हे उपस्थित होते. व्यासपीठावर सं...

पुस्तके, व्याख्याने आणि संगत यामुळे माणसाचे जीवन घडते - यजुर्वेंद्र महाजन

Image
 पुस्तके, व्याख्याने आणि संगत यामुळे माणसाचे जीवन घडते - यजुर्वेंद्र महाजन तळेगाव दाभाडे दिनांक २ (वार्ताहर) चांगली पुस्तके वाचणे, व्याख्यान ऐकणे आणि चांगल्या माणसांच्या-मित्रांच्या संगतीत राहणे फार गरजेचे आहे. यातून आपल्याला प्रेरणा मिळते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी या तीन गोष्टींना महत्त्व आहे. असे प्रतिपादन जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केले. या व्याख्यानमालेत ‘स्वप्न बघा’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्य गणेश खांडगे, निरुपा कानिटकर, संजय साने, डाॅ. अनंत परांजपे, भास्करराव म्हाळसकर, राजश्री म्हस्के, सदस्य विलास काळोखे,परेश पारेख, रणजीत काकडे, युवराज काकडे, प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे आदी उपस्थित होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाब...