Posts

Showing posts from November, 2023

डॉ. राजश्री जायभाये यांचा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

Image
 डॉ. राजश्री जायभाये यांचा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान पुणे दि. ३० महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमी महाराष्ट्र, राष्ट्रसेवा समूह गिरिप्रेमी ग्रुप यांच्या वतीने पुणे येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  यामध्ये आदर्श बहुव्यापी शिक्षणशास्त्र व संशोधन महाविद्यालय, पुणे येथील डॉ. राजश्री जायभाये  यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याने शिक्षण क्षेत्रातून डॉ. राजश्री जायभाये यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले याना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Image
 प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले याना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे दि. ३० प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमी महाराष्ट्र, राष्ट्रसेवा समूह गिरिप्रेमी ग्रुप यांच्या वतीने पुणे येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  यामध्ये अध्यापक महाविद्यालय, अरण्येश्वर पुणे येथील प्राचार्य डॉ.बापूसाहेब चौगुले यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याने शिक्षण क्षेत्रातून प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव चे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात ९००० दिव्यांचा भव्य "दीपोत्सव" साजरा

Image
 त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव चे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात ९००० दिव्यांचा भव्य "दीपोत्सव" साजरा  तळेगाव दाभाडे: दि. २९ नोव्हेंबर २०२३ त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वा श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह संपूर्ण रामायणावर आधारित श्रीराम जन्म, सीता- श्रीराम विवाह, श्रीराम वनवास, सीतामातेचे हरण,श्री हनुमान संजीवनी, रामसेतू , रावण दहन,  व अयोध्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती रांगोळी काढून ९००० दिव्यांची नयनरम्य  सजावट करण्यात आली होती.  जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात अखंड हिंदुस्थानचे आराध्य व जिव्हाळ्याचा विषय असलेले श्रीराम मंदिराची भव्य रांगोळी काढण्यात आली व  भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल  ९ हजार आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, भव्य दिव्य व अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.  कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमासुद्ध...

डॅा. सुरेंद्र हेरकळ यांना महात्मा फुले शिक्षणरत्न पुरस्कार

Image
 डॅा. सुरेंद्र हेरकळ यांना महात्मा फुले शिक्षणरत्न पुरस्कार  तळेगाव दाभाडे: दिनांक २९ नोव्हेंबर २०२३   अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित महात्मा फुले साहित्य संमेलनात प्राचार्य डॅा. सुरेंद्र हेरकळ यांना महात्मा फुले शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॅा. सुरेंद्र हेरकळ हे आळंदी येथील एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड . कॅालेज चे प्राचार्य आहेत. त्याची ११ पुस्तके प्रकाशित झाली असून ते मागील १८ वर्षापासून शिक्षणशास्त्रात कार्यरत आहेत . ५२ पेक्षा जास्त शोधनिबंध हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. अनेक विद्यापीठांत ते विविध समितीवर काम करतात.  या पूर्वी त्यांना २१ पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. आता पर्यंत डॅा. हेरकळ यांना १६ पदवी मिळविलेल्या आहेत. ६ विद्यार्थी हे पीएच. डी. चे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांनी नुकताच भिमाशंकर येथील भोरगिरी परीसरातील लोकोंसाठी प्रोजेक्ट परक्युलेशन एज्युटॅक २.० हा उपक्रम राबविला जो महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या पाझर सिध्दांतावर आधारित होता . या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना महात्मा फुले...

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

Image
 इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे निबंध  लेखन  स्पर्धेचे आयोजन  तळेगाव दाभाडे: दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे शनिवार दि. 25/11/2023 रोजी अँडव्होकेट पु. वा. परांजपे शाळेत  8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची  निबंध  लेखन  स्पर्धा घेण्यात आली.  इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ संध्या थोरात यांच्या कल्पनेला क्लब सदस्या शीतल शेटे यांनी  मूर्त रूप दिले.  या स्पर्धेत सहा शाळांमधील 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.  परीक्षक म्हणून दिपाली चव्हाण आणि  अर्चना  मुरूगकर यांनी  काम  पाहिले.   विजेते विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेचे नाव पुढीलप्रमाणे.. प्रथम क्रमांक-मंगेश प्रदीप राठोड प्रगती विद्यामंदिर, इंदोरी द्वितीय क्रमांक-कुमारी सायली रामकृष्ण घोडके -परुळेकर विद्यामंदिर तृतीय क्रमांक-लवण सूर्यकांत बेल्लेकर - आदर्श विद्या मंदिर उत्तेजनार्थ परम गोरख कुंभार - सरस्वती विद्यामंदिर कुमारी आदिती भरत पवार -_अँ. पु. वा. परांजपे विद्यामंदिर जय रमेश कढरे  _ अँ. पु. वा. परांजपे विद्यामंदि...

अगम्य ज्ञानाची उपलब्धि संशोधकांमुळेच सहजशक्य - न्यायमूर्ती श्री. उदयजी लळीत

Image
 अगम्य ज्ञानाची उपलब्धि संशोधकांमुळेच सहजशक्य - न्यायमूर्ती श्री. उदयजी लळीत  तळेगाव दाभाडे दि. २३ (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) : समाजाकडून संशोधकांची उपेक्षा होते ही नेहेमी अनुभवायला येणारी गोष्ट आहे. समाजाचा हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे आणि त्यासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या प्रांगणात विद्यावाचस्पतींचा केलेला गौरव हा सर्वार्थाने गौरवास प्राप्त ठरावी अशी घटना असल्याचे मत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केले.  बहुभाषिक ब्राह्मण संघ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित विद्या वाचस्पती (पीएचडी प्राप्त) गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, उपाध्यक्ष सुधीर राईलकर, सचिव सतीश भोपळे, खजिनदार सतीश देशपांडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, माजी राजयमंत्री संजय भेगडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवर उपस्थित होते. या व...

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रविवारी दीपोत्सव

Image
  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रविवारी दीपोत्सव तळेगाव स्टेशन दि. 23 (वार्ताहर) तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. दीपोत्सवाचे यंदा आठवे वर्ष आहे. यादव काळात हेमाडपंथी बनावटीच्या मंदिरांच्या स्थापनेत सुमारे अकराव्या शतकात श्री डोळसनाथ महाराज मंदिराजाची उभारणी झाली आहे. कालानुरूप आजवर चार वेळा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छत्रपती शाहू महाराजांनी श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांना सेनापतीपद दिले. त्यानंतर या मंदिराचे वैभव वाढले. मंदिरात नित्य पूजाअर्चा, भजन, कीर्तन, प्रवचन होत असते. कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हटले जाते. यानिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच हजार दिव्यांनी मंदिर परिसर गजबजणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी स...

किशोर भाऊंचे जाणे म्हणजे मावळ तालुक्याची मोठी हानी : ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ

Image
 किशोर भाऊंचे जाणे म्हणजे मावळ तालुक्याची मोठी हानी : ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ  किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ यांचे प्रवचन संपन्न तळेगाव दाभाडे, (डॉ.संदीप गाडेकर) किशोर आवारे यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील योगदान न विसरता येण्यासारखे आहे. अनेक गोरगरीब, दीनदुबळे, गरजवंत यांच्या हाकेला धावून जाणारा तरुण अशी त्यांची ख्याती होती  त्यामुळे किशोर भाऊंचे अचानक जाणे म्हणजे तळेगावकरांची मोठी हानी आहे, अशा शब्दात ह.भ.प. रसाळ महाराज यांनी किशोरभाऊंना आदरांजली अर्पण केली.              जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ यांच्या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त भजनी मंडळ, रुक्मिणी महिला भजन मंडळाची भजन सेवा झाली. माही फाउंडेशन, नैसर्गिक शिक्षण संस्था यांना देणगी देण्यात आली. दिनेश ठोंबरे शिव वंदना सादर केली.            यावेळी उद्योजक रामदास काकडे, गणेश काकडे, सत्यशीलराजे द...

प्रा. मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान

Image
 प्रा. मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान   तळेगाव स्टेशन दि. ९  प्राध्यापक मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडून नुकतीच पी.एचडी. प्रदान करण्यात आली. लोणावळा येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात मल्हारी नागटिळक हे सहाय्यक प्राध्यापक या पदावर बारा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी मानवी शरीरातील रक्तामध्ये असलेल्या सिरम अल्बमिन नावाच्या प्रथिनांवर संभाव्य घातक कीटकनाशकांचा काय परिणाम होतो याचा स्पेक्ट्रोस्टॉपिक आणि मॉलिक्युलर डॉकिंग टेक्निक चा वापर करून त्याच्याविषयी सखोल अभ्यास केला आहे व ह्या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठात शोधनिबंध सादर केला आहे. नागटिळक यांनी त्यांच्या पी.एचडी. दरम्यान दोन पेपर प्रकाशन, एक पुस्तक प्रकाशन व सहा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला. यासाठी त्यांना औंध, सातारा कॉलेज येथील प्राचार्य डॉ. शकुंतला सावंत मॅडम व एस. एम. जोशी कॉलेज मधील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. रंजना जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्...