Posts

Showing posts from February, 2024

सेक्टर 12 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Image
 सेक्टर 12 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी    भोसरी दि १९ (प्रतिनिधी) शिवजयंती उत्सव समिती सेक्टर-12 च्या वतीने यावर्षी प्रथमच शिवजयंती उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत आणण्यात आली, ज्योत आणण्यासाठी 40 ते 50 जणांनी अखंड दौड करून 6 तासात 90 km अंतर पार केला.        अतिशय उत्तम नियोजन, करून पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात शिस्तबद्ध मिरवणूक पार पाडली, मिरवणुकीत कोणताही धांगडधिंगा न करता पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात पालखीतून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न झालं          सर्वात आकर्षण म्हणजे सेक्टर 12 मधील महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, डोक्यावर रुबाबदार फेटा असा फ्राव करून  महाराजांचा पाळणा सादर केला.      शिवव्याख्याते प्रमोदजी कारकर यांचं शिववख्यान तर  सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले त्यांनी ज्या पंचसूत्री सांगितल्या त्या जर आचरणात आणल्या तर जीवन समृद्ध होईल.महाराजांच्या ...

शिवजयंती निमित्त सिंहगडावर ट्रेकिंग पलटन पुणे तर्फे प्लास्टिक मुक्त अभियान

Image
 शिवजयंती निमित्त सिंहगडावर ट्रेकिंग पलटन पुणे तर्फे प्लास्टिक मुक्त अभियान पुणे दि. २१(प्रतिनिधी)  औचित्य साधून  9 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेकिंग फलटण पुणे ग्रुप तर्फे सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये ऋणी दरवाजा कल्याण दरवाजा झुंजार बुरुज तानाजी कदम राजाराम महाराज समाधी नरवीर तानाजी समाधी आणि अतकरवाडी तर्फे पुणे दरवाजापर्यंत जाणारी गडवाट यावरील पर्यटकांनी फेकून दिलेले प्लास्टिक गोळा करण्यात आले.  ट्रेकिंग फलटण तर्फे 2020 पासून शिवजयंतीच्या निमित्याने सिंहगडावर दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते दरवर्षीच्या मानाने यावर्षी प्लास्टिक कचरा कमी प्रमाणात आढळून आला बरेचसे पर्यटन कचराकुंडीचा वापर करताना दिसून आले. तसेच काही पर्यटक स्वतःहून इतरांनी फेकून दिलेला कचरा कचरा कुंडीत मध्ये टाकताना आढळले. गडावर कचऱ्याचे प्रमाण अत्यल्प आढळले पुणे दरवाज्यापासून घोड्याच्या पागेपर्यंत थोड्याफार प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून आला सर्वात जास्त कचरा अतकरवाडी मार्गे पुणे दरवाजा या गडवाटेवर सर्वात उंच शेवटच्या टप्प्यावर आढळून आला. काही पर्यटक हे सोबतचा कचरा गडवाटेच्याकडे वरील ...

शिवजयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी - शिवव्याख्याते संपत गारगोटे

Image
  शिवजयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी - शिवव्याख्याते संपत गारगोटे तळेगाव स्टेशन दि.21 (वार्ताहर) शिवजयंती उत्सव हा नाचून  साजरा करण्यापेक्षा वाचून साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनात व घराघरात पोहचावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. जगात शिवजयंती विचाराने साजरी केली जाते, युवक डीजे लावून जयंती साजरी करतात. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा हीच खरी शिवजयंती होईल असे प्रतिपादन शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी केले. येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयात बुधवारी (दि.21) शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. शिव पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  शिवजयंती उत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर ते महाविद्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. व्याख्यान झाल्यावर विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात पुढाकार घेतला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, संचालक प्रल्हाद जांभुळकर, दत्तात्रय असवले, प्राचार्य अ...

व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साहात साजरी

Image
व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साहात साजरी लोणावळा दि.२० (प्रतिनिधी )  व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात एखाद्या सणाप्रमाणे साजरी करण्यात आली.                  या कार्यक्रमावेळी अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके व संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल मेम्बर श्री.भगवान आंबेकर , श्री.कुदळे सर, संस्थेचे सभासद श्री. नितीन गरवारे, सौ.कुदळे मॅडम कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ.ठाकूर या सर्वांच्या हस्ते "श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली.        तसेच या कार्यक्रमावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, संस्थेचे सभासद श्री. नितीन गर...

शिवरायांचा पराक्रम हे मावळ तालुक्याचे खरे संचित - रामदास काकडे

Image
 शिवरायांचा पराक्रम हे मावळ तालुक्याचे खरे संचित - रामदास काकडे तळेगाव दाभाडे दि.१९ (प्रतिनिधी) :- शिवरायांचा कार्यकाळ हा महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर गारूड बनून राहिला. शिवाजी या तीन जादुई अक्षरांनी संपूर्ण देश व्यापून राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने मावळची भूमी पावन झलेली आहे. महाराजांचा पराक्रम हेच आपले खरे संचित असल्याची भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रामदासजी काकडे यांनी व्यक्त केली. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. एस. शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेश पाटील, संस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद बोराडे, गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होत. पुढे बोलताना काकडे म्हणाले की, शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हे फक्त हिंदूंचे राज्य नव्हते तर समग्र रयतेचे राज्य ह...

वेदांगी नारायण असवले आंदर मावळातील पहिली सी. ए.

Image
  वेदांगी नारायण असवले आंदर मावळातील  पहिली सी. ए. तळेगाव स्टेशन दि 15 (प्रतिनिधी) टाकवे बुद्रुक येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तुकाराम असवले व ह.भ. प. सुभाष असवले यांची पुतणी आणि मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण असवले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे  बु. मुख्याध्यापिका वंदना नारायण असवले या शिक्षक दाम्पत्याची सुकन्या वेदांगी असवले हिने सी. ए. परीक्षेत उतृंग यश संपादन करून  टाकवे बु.  व  असवले  परिवाराचे नाव भारतात पोहोचवले. भारतात दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल फक्त ९.४२ टक्के लागला आहे. वेदांगीने सातत्यपूर्ण अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात उज्वल यश प्राप्त केले. मावळ तालुक्यातील आदर्श शिक्षक नारायण असवले व वंदना असवले यांनी  वेदांगीचे जीवन सार्थक करून दाखवल्याचे भावना व्यक्त केली. टाकवे बु. गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी  वेदांगी व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर- धाराशिव मावळ मित्र मंडळ आणि मावळ तालुक्याती...

व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये Sports Week साजरा

Image
 व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये Sports Week साजरा  लोणावळा दि.14 (प्रतिनिधी)  व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दिनांक 29/01/2024 ते दिनांक 06/02/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023-24 चा Sports Week साजरा  करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला होता. यामध्ये विजेते व विविध खेळामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा  पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 06/02/2024 रोजी कॉलेजच्या seminar hall मध्ये  आयोजित करण्यात आला होता.                  या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील विविध शाखांचे विभाग प्रमुख डॉ.हरीश हरसुरकर, प्रो.हुसेन शेख, प्रो. प्राणेश चव्हाण, प्रो.सोनी राघो, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. प्रीती चोरडे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.         या कार्यक्रमासाठी  संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्र...

मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे

Image
  मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे तळेगाव स्टेशन, दि.०९ (वार्ताहर) रोजी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पद व इतर पदांची  निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी हॉटेल बगीचा, महालक्ष्मी आर. एम .सी चे प्रोप्रायटर, घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते  श्री निलेश राक्षे, उपाध्यक्षपदी विकास कंद, समीर भेगडे, सचिवपदी अतुल राऊत, खजिनदारपदी अमित भसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  या निवडींबाबत आपल्या भावना व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक/ सहकारभूषण श्री .बबनराव भेगडे (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व संचालकांनी संस्थेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ देऊन संस्था वाढीसाठी प्रयत्न करावेत. चांगली कर्जे देण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन केले.  पीएमआरडीए सदस्य व संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांनी संस्थेच्या कामकाजावि...

अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ चे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

Image
अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ चे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न तळेगाव दाभाडे दि ३ (प्रतिनिधी) वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ व आयक्यूएसी यांच्या विद्यमाने आयोजित स्वयं अर्थसहाय्यित दोन दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर करंजगाव ता. मावळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर विशेष हिवाळी  शिबिराचे आयोजन समाजसेवा विभाग प्रमुख डॉ. शीतल देवळालकर यांनी केले होते. शिबिराचे  उद्घाटन सरपंच वैशाली कुटे, माजी सरपंच दिपाली साबळे,  शाळा समिती अध्यक्ष अमोल शेलार व दत्तात्रय कुटे यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरात  बीएड व एम. एड प्रशिक्षणार्थींना ग्रामीण जीवनाची ओळख, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण , सामाजिक जनजागृती , अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवर काम करण्याची संधी मिळाली.                    शिबिरातील क्षणचित्रे   वृक्षारोपण            ऐतिहासिक तळे परिसर स्वच्छता               ...

व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग क्या कृष्णा टेकळे ची Neutrino Tech Systems Kharadi या कंपनी मध्ये Associate Software Engineer पदी निवड

Image
 व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग क्या कृष्णा टेकळे ची Neutrino Tech Systems  Kharadi  या कंपनी मध्ये Associate Software Engineer पदी निवड  लोणावळा दि. 2 (प्रतिनिधी) विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मधून कॉम्पुटर इंजिनिअरिंग या शाखेतून BE उत्तीर्ण झालेला विद्यार्थी कृष्णा टेकळे या विद्यार्थ्याला Neutrino Tech Systems  Kharadi  या कंपनी मध्ये Associate Software Engineer या पदावर नोकरी मिळाली आहे. त्याबददल त्याचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे तसेच सर्व सभासदांनी केले. त्याच्या पुढील वाटचालीस डॉ. मानव अ. ठाकूर कॉलेजचे प्राचार्य, डॉ. हरीश हरसूरकर TPO (Training & placement officer) ,प्रो.हुसेन शेख (FE HOD), प्रो. सोनी राघो (Computer HOD) यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.