Posts

Showing posts from December, 2022

प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Image
    प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.31  प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,  उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, संचालक गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा, शंकर नारखेडे, इंदोरी गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी चे अध्यक्ष विन्सेंट सालेर अध्यक्ष भंडारा देवस्थान ट्रस्ट साहेबराव काशीद, वडगाव मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी उपसरपंच प्रशांत भागवत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे,माजी आदर्श सरपंच संदीप काशीद प्रगती विद्या मंदिर व ह. भ.प.आ.ना.काशीद पाटिल ज्यु कॉलेजचे शालेय समितीचे अध्...

प्रतीक विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Image
 प्रतीक  विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न निगडे, मावळ: (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि. 23 मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, प्रतीक विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज निगडे या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी, मान्यवर समारंभाचे अध्यक्ष मा. श्री यादवेंद्रजी खळदे साहेब (सचिव मावळ शिक्षण प्रतिष्ठान), संस्थेचे सहसचिव मा.श्री. प्राध्यापक वसंत पवार सर,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री महेश फडके साहेब (व्हॉइस प्रेसिडेंट,प्लांट हेड,एल. अँड. टी. डिफेन्स. तळेगाव पुणे). रांगोळी प्रदर्शन उद्घाटक मा. श्री गोपाळजी शिंदे साहेब (असिस्टंट जनरल मॅनेजर, इन्चार्ज तळेगाव पुणे). हस्तलिखित विमोचक मा. श्री सोनबा गोपाळे गुरुजी (सदस्य नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ)विविध गुणदर्शन उद्घाटक मा. श्री भिकाजी भागवत(विद्यमान सरपंच,निगडे) इ. मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील  विद्यार्थिनींनी औक्षण करून केले.अक्षरदीप हस...

माजी विद्यार्थी पंडित श्री. विदुर महाजन यांच्या सुश्राव्य सतार वादनाचा १५० वा कार्यक्रम संपन्न

Image
  माजी विद्यार्थी पंडित श्री. विदुर महाजन यांच्या सुश्राव्य सतार वादनाचा १५० वा कार्यक्रम संपन्न  नूतन महाराष्ट्र च्या अमृत महोत्सव निमित्ताने आयोजन तळेगांव स्टेशन (संपादक- डॉ. संदीप गाडेकर) दि.२४ डिसेंबर 2022 रोजी शाळेचे माजी विद्यार्थी पंडित श्री. विदुर महाजन यांच्या सुश्राव्य सतार वादनाचा १५० वा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार शेलार साहेब, संगीत प्रेमी श्री. विश्वास देशपांडे, सौ. अपर्णा महाजन, श्री कोनकर काका, पंडितजींचे नातेवाईक, शिष्य व संगीत क्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीणा धारिणी विद्येची देवता सरस्वती चे पूजन करण्यात आले. पंडित विदुर महाजन यांनी राग संगीत विद्यार्थ्यांना समजावा, सतार हे भारतीय वाद्य विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावे ,शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून 150 वा कार्यक्रम शाळेत व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे नियोजन शाळेमध्ये केले होते. सांस्कृतिक केंद्र असणारी तळेगाव नगरी आणि पूर्वीची नूतन विद्यामंदिर आत्ताची ॲड. पु.वा.परांजपे विद्यामंदिरा...

राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम-उद्योजक रामदास काकडे यांचे गौरवोद्गार

Image
राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम-उद्योजक रामदास काकडे यांचे गौरवोद्गार तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर)  दि.26 प्रगतीच्या नव्या स्वरूपाचा पाया म्हणजे आजची तरूणाई आहे. त्यामुळे या तरूणाईचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे. या जोरावर राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम ठरेल. असे गौरवोद्गार इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांनी काढले. नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयाच्या क्रीडा महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात काकडे बोलत होते. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रंथालय स्वखर्चाने बांधून देण्याची घोषणा काकडे यांनी केली. जग आज जलदगती प्रवासाने प्रगतीच्या नव्या आविष्कारांकडे झेपावते आहे. प्रगतीच्या या नव्या स्वरूपाचा पाया म्हणजे आजची तरूणाई आहे. या तरूणाईचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे, या जोरावर आजची ही नव शिक्षित तरूणाई आपल्या...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे - संतोष खांडगे

Image
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे -  संतोष खांडगे  पवनानगर - (संपादक- डॉ. संदीप गाडेकर) दि.23 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे  असते तसेच शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे असल्याचे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले. पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलातील कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थांंचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ प्रसंगी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे,पवना शिक्षण संकुलाचे पालक व सरपंच परिषेदेचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे,संत तुकाराम साखरकारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर,मावळ बाजार समिती अध्यक्ष नंदकुमार धनवे,मावळ खादी ग्रामउद्योग अध्यक्षा कांचन भालेराव...

आनंद विद्यानिकेतन हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात संपन्न

Image
 आनंद विद्यानिकेतन हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात संपन्न पुणे, विमाननगर 16 डिसेंबर 2022  आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर या प्रशालेमध्ये 16   ते 22 डिसेंबर  या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहाचा आज मान्यवरांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेचे  संस्थापक कार्यवाहक  कै.बाबुरावजी तावरे यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर  मुख्य   क्रीडांगणावर ज्योतीचे आगमन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये क्रीडा ज्योतीचे स्वागत करून क्रीडा कुलांनी संचलन केले. यानंतर सरस्वती प्रतिमा व क्रीडा साहित्याचे पूजन संस्थेच्या कार्यवाह श्रीमती किरण तावरे मॅडम,लायन्स क्लब ऑफ पुणे गणेश खिंडचे चेअरमन राजीव अग्रवाल यांच्या हस्ते व प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ, संत गोरोबा बाल विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक सतीश पाटील, गुरुकुलच्या प्राचार्य डॉ.प्रीती मानेकर इतर मान्...

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

Image
  प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत तळेगांव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि. 14 व्ही.पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज लोणावळा येथे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फ्रेशर पार्टीचे आयोजन दिनांक १० डिसेंबर २०२२ सेरेनिटी रिसॉर्ट लोणावळा मध्ये करण्यात आले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत असताना संस्थेकडून व महाविद्यालयाकडून काय अपेक्षा आहे याबाबत मनोगत व्यक्त केले. तिसऱ्या व अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले प्राचार्य डॉक्टर मानव अ. ठाकूर यांनी भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते महाविद्यालयातील अध्ययन - अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्यांनी विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कला गुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयांमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षक...

इंद्रायणी महाविद्यालय अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न

Image
  इंद्रायणी महाविद्यालय अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि. 9 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीथांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा दि ६ व ७ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या केशवराव वाडेकर सभागृहात पार पडल्या. २७ महाविद्यालयाच्या एकूण ८० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.  यावेळी इंद्रायणी महाविद्यालयातील प्रनोती नंब्रे व सेजल मोईकर याविद्यार्थीनींनी अनुक्रमे ७६ कि व ६९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ओंकार पापळ याने ६६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. प्रेरणा जाधव व आरती तरकसे या विद्यार्थ्यीनींनी अनुक्रमे ८४ किलो व 63 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांची निवड श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील सी. डी. जैन महाविद्यालयात होणा-या विभागीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत झाली आहे.  स्पर्धेचे उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खजिनदार शैलेश शहा यांच्या हस्ते झाल...

संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळात महापरिनिर्वाणदिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Image
 संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळात महापरिनिर्वाणदिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि. 6 वडगाव येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरकचंद रायचंद बाफना अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय  (बी.एड. व एम.एड.) व  कला वाणिज्य व बी.बी.ए. महाविद्यालयाच्या वतीने 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.  सर्वप्रथम प्राचार्य श्री. हिरामण लंघे, प्र.प्राचार्य श्री. अशोक गायकवाड व ज्येष्ठ प्राध्यापक श्री. महादेव सांगळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डी.एड. ची  विद्यार्थिनी हर्षदा पवार हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयक माहिती सांगितली, त्यानंतर प्र.प्राचार्य श्री .  अशोक गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र डोके यांनी केले व आभार श्री. मनोज गायकवाड सर यांनी केले यावेळी संस्थेतील सर्व विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व ...

विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
 विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा तळेगांव दाभाडे (संपादक -डॉ.संदीप गाडेकर) विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन 3 डिसेंबर 2022 रोजी व्ही.पी.एस. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक यांनी एकत्र येत  या शैक्षणिक उत्सवात सहभाग घेतला. संस्थेला  100 वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दीमहोत्सवी वर्षाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. गो.व्यं.शिंगरे, सचिव डॉ.स.बी.गवळी तसेच अभियांत्रिकी विभागाचे  प्राचार्य  डॉ. मानव आ.ठाकुर हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास श्रीमती निशा नाईक या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. तसेच अभियांत्रिकी शाखेचे तीनही विभागप्रमुख, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आले होते.

व्हॉलीबॉल स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघास विजेतेपद

Image
  व्हॉलीबॉल स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघास विजेतेपद तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि. 5 क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि ४) रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर आण्णासाहेब चोबे स्कूल व कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.  १९ वर्षाखालील मुलांच्या गटात इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांकांची विजयश्री संपादित केली तर लोणावळ्याच्या व्हीपीएस हायस्कूल व तळेगावातील आण्णासाहेब चोबे हायस्कूल या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले.  या संपूर्ण स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील गटांमध्ये उत्कृष्ट व चमकदार कामगिरी करणा-या खेळाडूस उत्कृष्ट खेळाडूचा किताब देऊन गौरविण्यात आले. १७ वर्षाखालील गटात इंद्रायणी इंग्लिश मी...

इंद्रायणी महाविद्यालयात भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे व 8 एकर भव्य क्रीडामैदानाचे उद्घाटन

Image
 इंद्रायणी महाविद्यालयात भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा व 8 एकर भव्य क्रीडामैदानाचे  उद्घाटन तळेगांव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.4  शिक्षकांनी विद्यार्थी घडवताना खडतर परिश्रम, खेळाची शास्त्रशुद्ध माहिती आणि सचोटी या त्रिसूत्रीवर भर द्यावा. त्यातून अनेक क्रीडापटू नावारूपाला येतील. मावळच्या क्रीडा समृद्धतेत निश्चित भर पडेल. क्रीडा छंदाला उपजिविकेचे माध्यम बनविले तर चरितार्थाच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. त्यासोबत उत्तम आरोग्य व जगण्याचे समाधानही प्राप्त होईल, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या आठ एकरवरील भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन आज रविवार (दि ४) रोजी संपन्न झाले. तसेच 17 व 19 वर्षा खालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये भाग घेण्यासाठी मावळ तालुक्यातून विविध शाळांमधून संघ उपस्थित होते.   यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त विलास काळोखे, संदीप काकडे, संजय साने, युवराज काकडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार,...

महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती" मध्ये प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांची निवड

Image
महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती" मध्ये प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांची निवड   तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि.2 महाराष्ट्र शासनातर्फे नव्याने गठीत करण्यात आलेल्या "महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती" मध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचेकडून परिपत्रक काढून  करण्यात आली. राज्यातील गड व किल्ले जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली.  प्रा. डॉ. प्रमोद बोराडे हे प्रसिध्द इतिहास तज्ज्ञ असून आज पर्यंत राज्यभर शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्याच्या निवडी बद्द्ल मावळ परिसररातून त्यांचे अभिनंदन होत आहे.