Posts

Showing posts from September, 2024

राजेंद्र गाडेकर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Image
जुन्नर दि.२८ (प्रतिनिधी) विद्या विकास मंदिर राजुरी शाळेचे उपशिक्षक श्री. राजेंद्र दिगंबर गाडेकर यांना  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद  ग्रामीण विभाग यांच्या वतीने  जिल्हा गुणवंत  शिक्षक पुरस्कार सन २०२४ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी विद्याधाम प्रशाला शिरूर येथे होणार आहे.  या कार्यक्रमासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे,  खासदार डॉ. निलेश लंके, आमदार अशोकबापू पवार, आमदार जयंत आसगावकर , आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित राहणार आहेत. राजेंद्र गाडेकर सर विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण लोणी हवेली ता.पारनेर येथे झाले असून दहावी बारावी व बी.एससी. पर्यंतचे शिक्षण पारनेर येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी डी.एड. तसेच एम. एस्सी. बी.एड. पर्यंत उच्च शिक्षण घेतले आहे.  इयत्ता ५ वी स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, मंथन परीक्षा  याबाबतीत ते मार्गदर्शन करतात. तंत्र स्नेही शिक्षक म्हणून त्यांची विद्यालयास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. इयत्ता ५ वी प्रवेश प्रक्रिया, विद्यालयातील किल्ले बनवा स्पर्ध...

मावळातील प्राथमिक शिक्षकांकडून लोहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम

Image
तळेगांव दाभाडे दि. 24 (प्रतिनिधी) स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत गड किल्ले संवर्धन व स्वच्छता तसेच युनोस्कोने नामांकन केलेल्या लोहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मावळ  शिक्षण विभाग यांच्यावतीने  फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे, मावळ शिक्षक प्रबोधन परिवार व हिरकणी शिक्षिका मैत्रीण ट्रेकिंग ग्रुप यांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी लोहगड गाव व किल्ला परिसर याची संपूर्ण स्वच्छता केली. सदर स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व माननीय गटविकास अधिकारी सुधीर भागवत, माननीय गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्ताराधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख निर्मला काळे, सुनंदा दहीतुले, सुहास धस, सहदेव डोंबे, राजू भेगडे, मनोज भांगरे, संदीप कांबळे,तानाजी शिंदे, सुरेश पाटील, संतोष राणे, गोरक्ष जांभुळकर,शिवाजी जरग, स्मिता कांबळेआदी सुमारे 80 शिक्षकांनी केले.  युनेस्कोने नामांकन केलेल्या पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांपैकी लोहगड हा एक किल्ला आहे. तसेच अनेक पर्यटकांचे आकर्षण नाचा केंद्रबिंदू आहे. अभेद्य  तटबंदी असलेला आणि दैदीप्यमान इतिहास असलेला हा लोहगड किल्ला मावळ त...

ज्ञानार्जनासाठी उचललेले उपयुक्त पाऊल - डॉ. वसंत वाघ

Image
पुणे दिनांक 24 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेतील केस्रो (KSRO )  ॲस्ट्रॉनॉमी  लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने या लॅबच्या माध्यमातून ज्ञानोपासना वाढीस लागणार असून सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे ते म्हणाले...नेहमीच्या  साचेबद्ध शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक अभ्यासाकडे कल वाढवण्याचा हा विकसनशील प्रयोग असल्याचेही ते म्हणाले        या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधायुक्त शिक्षण खडकी शिक्षण संस्थेमध्ये दिले जाते. त्याच प्रमाणे  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काळाची गरज ओळखून आवश्यक त्या शिक्षण पद्धती संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.  आपल्या मनोगतीय भाषणामध्ये हेंकेल इंडियाचे प्रोडक्शन मॅनेजर डॉ. प्रसाद खंडागळे, रिजनल मॅनेजर श्री. भूपेश सिंग, सी. एस. आर .श्री. रमित महाजन,संस्था सचिव श्री.आनंद छाजेड यांनी संस्थेमध्ये होत असल...

इंद्रायणी महाविद्यालयामध्ये हिंदी दिवस उत्साहात संपन्न

Image
तळेगाव स्टेशन दिनांक 24 (प्रतिनिधी) इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. विपिन पवार पूर्व निदेशक (राजभाषा) रेल मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली चे उपस्थित होते. त्यांचे नाव साहित्यिक, पत्रकार आणि संपादक म्हणून सर्व देशाला माहित आहे. त्यांनी आपल्या अतिथी भाषणामध्ये राजभाषा हिंदी चे महत्व सांगितले. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीचे स्थान, महत्त्व, सन्मान खूप होत आहे. त्यामध्ये मॉरिशस, अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, नार्वे, टोकियो अशा 40 देशांमध्ये हिंदीच्या पाठशाला आहेत. पहिले विश्व हिंदी संमेलन नागपूर मध्ये भरले होते त्याची आठवण करून देऊन त्यामधील काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. हिंदी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले त्यामध्ये शिक्षक, लेखक, अनुवादक, हिंदी निदेशक, रेल्वे, बँक आणि इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत व पगार ही समाधानकारक आहे हे आवर्जून सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना काही प्रश्न...

इंद्रायणी महाविद्यालयात 'जागतिक ओझोन दिनानिमित्त' पर्यावरण जागृती कार्यक्रम संपन्न

Image
  तळेगाव दाभाडे दि. २४ (प्रतिनिधी) येथील इंद्रायणी महाविद्यालयातील विज्ञान विभाग व इंद्रायणी निसर्ग कट्टा यांच्या वतीने जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. रोहित नागलगाव, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. काशिनाथ अडसूळ, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे तसेच विज्ञान विभागातील विविध प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मित्रांसोबत केक कापून परदेशी संस्कृती आत्मसात न करता वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घ्यावा. भांडवलशाहीचे विस्तारीकरण व बाजारपेठा म्हणून पुढे आलेला प्रत्येक देश यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढत असून हरित वायू उत्सर्जनाचे अनेक विपरीत परिणाम वातावरणावर होत आहेत. पृथ्वीवर माणूस म्हणून व्यवस्थित जगायचे असेल तर ओझोनचा थर सुव्यवस्थित राखणे तसेच निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी ठरते आणि म्हणून ...

मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था तळेगाव दाभाडे पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Image
तळेगाव दाभाडे दि. २३ (प्रतिनिधी) मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर येथील सभागृहात संपन्न झाली यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष भेगडे उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, जेष्ठ सल्लागार भाऊसाहेब आगळमे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे,पतसंस्थेचे अध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष अशोक कराड, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे यांच्यासह संचालक सोपान असवले, सुमन जाधव, दत्ता गायकवाड, विजय वरघडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्या सभासदांनी अविरतपणे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी योगदान देऊन पतसंस्था वाढीसाठी व प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत निवृत्त सभासदांचा सन्मान  करण्यात आला.  मान्यवरांच्या उपस्थितीत सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करत यश संपादन केले त्यांचा सन्मान  करण्यात आला....

तळेगाव दाभाडे येथील निवासी डॉक्टरांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

Image
  तळेगाव दाभाडे दि.२२ (प्रतिनिधी) येथील मायमर मेडीकल कॉलेज व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना जर केंद्र व राज्यसरकारच्या नियमानुसार विद्यावेतानामध्ये वाढ न केल्यास कॉलेज प्रशासनाला निवासी डॉक्टरांनी २४ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) व राज्य सरकार यांनी वेळोवेळी निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतानामध्ये वाढ केलेली आहे, परंतु मागील एक वर्षापासून कॉलेज प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या सरकारच्या अधिनियमांची अंमलबजावणी झालेली नाही. निवासी डॉक्टरांच्या दैनंदिन व आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी या निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कॉलेज प्रशासनाला मागील ३ आठवड्यापासून आंदोलनाचा इशारा देऊनसुद्धा अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. निवासी डॉक्टर मागील २ आठवडे रुग्णसेवा देत असताना काळी फीत लावून आंदोलन करत आहेत, जर २४ सप्टेंबरच्या आत विद्यावेतन वाढीबाबत निर्णय न झाल्यास निवासी डॉक्टर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करणार आहेत. या दरम्यान अत्यावश्यक सेवा फक्त चालू राहतील. या आंदोलनाला केंद्रीय महाराष...

विद्यार्थ्यांनी युद्ध सोडता कामा नये - प्यारा ऑलंपियन विजेते मुरलीकांत पेटकर

Image
  (डावीकडून ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय चाकणे, मुरलिकांत पेटकर, राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल) पुणे दिनांक 22 (प्रतिनिधी)विद्यार्थी दशे मध्ये असतानाच विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रासाठी  युद्ध आणि देशवासीयांसाठी  होतात्म्य  पत्करलेल्या जवानांचा इतिहास वारंवार मनावर ठसविणे गरजेचे आहे... खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये आयोजित 'विकसित भारत युवा कनेक्ट 'अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते...    युवकांनी क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन ऑलम्पिक मध्ये आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले...    छात्रशक्ती ही राष्ट्राची संपत्ती असून देशाच्या सेवेसाठी विकासासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आपल्या भाषणात म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र लेले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी मानले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना अध्यक्ष राजेश पांडे ,संस्था संचालक अजय सूर्यवंशी, सुरजभान अगरवाल, काशिनाथ देवधर,धीरज गु...

कृष्णकुमार गोयल यांची डॉ. संजय चाकणे यांनी घेतलेली मुलाखत

Image
 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील हॅलो_सह्याद्री या कार्यक्रमामध्ये अवश्य पहा, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची डॉ. संजय चाकणे यांनी घेतलेली मुलाखत निर्मिती सहाय्य - नारायण ढेबे निर्माते - विनायक मोरे निर्मिती - दूरदर्शन पुणे प्रक्षेपण - सोमवार, दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता आणि पुन:प्रसारण रात्री 11 तसेच 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1:30, पहाटे 4:30 सकाळी 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. #KrishanakumarGoyal #HelloSahyadri #DDSahyadri जाहिरात व बातमी संपर्क  डॉ.संदीप गाडेकर  संपादक  मो.8208185037

"युवकांनी विकसित भारताचे ब्रँड अंबेसिडर व्हायला हवे" - ना. रक्षाताई खडसे ( राज्यमंत्री,क्रीडा ,युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार)

Image
    (डावीकडून संजय चाकणे , राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, आनंद छाजेड, रक्षा खडसे, सपना छाजेड) खडकी दि.20 (प्रतिनिधी) - या राज्यातील तरुणांनी माय पोर्टल व्हारे विकसित भारत या अभियानात सामील व्हावे.आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्याकरता पुढे यावे आणि विकसित भारताचे ब्रँड अँबेसेडर व्हावे,असे आवाहन केंद्रीय क्रीडाडा राज्यमंत्री नामदार  रक्षाताई खडसे यांनी  केले.पुण्यातील खडकी मधील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत अँम्बेसेडर युवा कनेक्ट उपक्रमातंर्गत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी महाविद्यालयाच्या आवारात एक झाड आईच्या (एक पेड मां के नाम) या केंद्रशासन प्रणित  उपक्रमातंर्गत रक्षा खडसे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . तसेच त्यांनी महाविद्यालयातील तरुण यु ट्युबरर्सशी संवाद साधला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे यांनी ,उपस्थित तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या  भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषत:  'माय भारत पोर्टल' विषयी माहिती देऊन यात सर्वांनी...

"खडकी बोपोडी परिसरातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार ." - कृष्णकुमार गोयल

Image
(आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन करताना कृष्णकुमार गोयल (मध्यभागी) -डावीकडून  कार्यालय अधिक्षक लक्ष्मण डामसे ,ज्ञानेश्वर मुरकुटे,रमेश अवस्थे, आनंद छाजेड,प्राचार्य डॉ.संजय चाकणे,अर्जुन मुसमाडे व डॉ.शीतल रणधीर)  खडकी: दि 20 (प्रतिनिधी) - 'खडकी बोपोडी,दापोडी,येरवडा, परिसरातील  हजारो युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळेल आणि कौशल्यधिष्ठित शिक्षणाच्या आधारे रोजगार उपलब्ध होईल' असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.  टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमात गोयल  बोलत होते .   केंद्रशासन प्रणित 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे केले. या प्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी बोलत  गोयल होते. पंतप्रधान मोदी यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले की, या योजनेमुळे महाराष्ट्रातील किमान दोन लाख युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.   महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसचिव डॉ.सं...

मावळात शिक्षकांसाठी बाल संरक्षण परिषदेचे आयोजन

Image
   वडगाव मावळ दि. 19 (प्रतिनिधी) जिल्हा विधी प्राधिकरण पुणे,पंचायत समिती मावळ,होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे, व गेस्टटॅप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांसाठी बाल संरक्षण परिषद प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.           या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या शि. वि. अधिकारी शोभा वहिले मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुढे परिषदेतील प्रमुख तज्ञ मार्गदर्शक सचिन पाटील यांनी बाल संरक्षण कायदा (pocso )अंतर्गत येणाऱ्या बाबींचा सविस्तर उलगडा केला. त्यांनी बालकांचे अधिकार,बालकांचे संरक्षणाविषयी शिक्षकांची भूमिका तसेच बाल संरक्षण कायद्याची वैशिष्ट्ये, या कायद्याचे स्वरूप, कायद्यामध्ये येणारे विविध कलम आणि त्या कलमा अंतर्गत येणाऱ्या शिक्षा चे स्वरूप , तसेच हा गुन्हा कशाप्रकारे घडला जाऊ शकतो  , तसेच या संरक्षण कायद्यामध्ये शिक्षकाची भूमिका व पालकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.             पुढे परिषदेस उपस्थित मान्यवरांपैकी...

पेन्शनच्या लढाईत कायम शिक्षकांबरोबर राहणार- आमदार संजय जगताप यांचे प्रतिपादन, सासवडमध्ये जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार संपन्न

Image
  सासवड दि. 15 (प्रतिनिधी)  आमदार मंडळी निवडणूक आल्यावर शिक्षकांच्या जवळ येतात, निवडणूकांनंतर विचारत नाहीत, मात्र आमदार संजय जगताप हे एकमेव असे आहेत ज्यांनी वेळोवेळी जूनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रश्न विधीमंडळात मांडले. शिक्षकांविषयी तळमळ आणि शिक्षणाबाबत प्रेम असणारे आमदार म्हणून आमदार संजय जगताप यांची ओळख असल्याचे याप्रसंगी अनेक वक्त्यांनी सांगितले. समाज, देश, राष्ट्र घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. सर्व प्रगत देशांत शिक्षकांना मोठी प्रतिष्ठा असून शिक्षणावर सर्वाधिक खर्च केला जातो. मात्र आपल्या देशातील शासन शिक्षकांकडून कोरोना काळातील तसेच निवडणूकांची कामे अशा सर्व भूमिका बजावून घेत असूनही शिक्षकांचे जूनी पेन्शनसारख्या अनेक प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही, शिक्षकांना पेन्शनची शाश्वतता, संचयती महत्त्वाची असून जूनी पेन्शनच्या लढ्यात कायम शिक्षकांबरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले. रविवारी सासवड येथे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा शिक्षिका संघ आणि जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. ...

शिक्षक हाच समाजाचा खरा आदर्श: बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अपडेट राहण्याची आवश्यकता- डॉ.दिगंबर दुर्गाडे

Image
   पुणे दि. १४ (प्रतिनिधी) शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाने  आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्यात  शिक्षक हाच समाजाचा खरा आदर्श असून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही बनून बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये अपडेशन केले पाहिजे असे मत पीडीसीसी  बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व म. फुले सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राज्याचे मा. शिक्षण संचालक डॉ.दिगंबर देशमुख, लेखक व शिक्षणतज्ञ यशराजजी पारखी, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य कार्याध्यक्ष जी. के. थोरात,विश्वस्त के.एस. ढोमसे, पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे, पुणे विभाग माध्य.चे सचिव सचिन दुर्गाडे यांच्या हस्ते शिक्षकांना शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा जीवनगौर...

टी. जे. कॉलेज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते होणार

  पुणे दि. १५ (प्रतिनिधी) टी.जे. कॉलेज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ११ वाजता  मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते ऑनलाइन करण्यात येत आहे. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी  मा.श्री मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, हे उपस्थीत राहणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व  भविष्यातील रोजगार संधी यामध्ये आपली भूमिका यावर मार्गदर्शन होईल अशी माहिती खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. यावेळी प्राचार्य संजय चाकणे तसेच आनंद छाजेड आणि शितल रणधीर हे यावेळी उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास विद्यार्थी , पालक , सामाजिक कार्यकर्ते, लोक प्रतीनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खडकी शिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले. जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क  डॉ. संदीप गाडेकर  संपादक मोबाईल 820 818 50 37

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत व माय भारत पोर्टल ची माहिती मंत्री रक्षा खडसे देणार - कृष्णकुमार गोयल

पुणे दि.15 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी येथे 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता  टी जे कॉलेज मध्ये माय भारत पोर्टल व विकसित भारत विषयी माहिती केंद्रीय मंत्री देणार असल्याची माहिती खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत आणि माय भारत पोर्टल च्या सेवा सुविधा ची माहिती प्रत्यक्ष देण्यासाठी तसेच माय भारत पोर्टल चे फायदे आणि विकसित भारत ट्रान्सफॉर्मिंग रेल कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक लीडरशिप, ॲडव्हान्सिंग डिजिटल लिटरसी, बुष्टिंग स्पोर्ट टॅलेंट, प्रमोटिंग टुरिझम, लीडिंग इन एज्युकेशन, अशा भारत सरकारच्या विविध विकासात्मक धोरणांची व  योजनांची माहिती क्रीडा व युवक कल्याण  भारत सरकार च्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे देणार आहेत. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय आनंद छाजेड,प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रम अधिकारी डॉ.  निलेश काळे उपस्थित होते.  ...

"विद्यार्थ्यांनो काहीही करा,काय वाटेल ते करा,पण जे करणार ते अतिशय उत्तम असले पाहिजे" डॉ . संजय चाकणे

Image
पुणे दि. 14 (प्रतिनिधी) जे जे उत्तम उदातत्त उन्नत ते सर्व केले पाहिजे  असा मोलाचा संदेश देत चौफेर फटकेबाजी करत आजचा 'कॉलेज कट्टा' हा कार्यक्रम अतिशय रंगला खडकी शिक्षण संस्थेच्या  टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये आज वाणिज्य विभागा अंतर्गत 'कॉलेज कट्टा' या सदरामध्ये प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना "वाटेल ते करा, कोणतही तुमच्या आवडीचा काम तुम्ही करू शकता परंतु ते करत असताना त्या कामामध्ये  अतिशय उच्च पातळीचे प्राविण्य तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे.  कार्यक्रमाचे स्वरूपच कॉलेज कट्टा असल्यामुळे कॉलेजमध्ये घडणाऱ्या अनेकविध गोष्टींवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामध्ये अभ्यास, परीक्षा,नियमितपणा वेळेच व्यवस्थापन या गोष्टी तर होत्याच परंतु त्याचबरोबर चाकोरी बाहेरील शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले. "विद्यार्थ्यांनो जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये निपुण झालात तर कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही" हे सांगत असताना त्यांनी महाविद्यालयातील खेळ, नाटक, सिनेमा, रिल्स,  यूट्यूब व्हिडिओ,रेडिओ, रांगोळी...

मुलींनी निर्भय बनले पाहिजे- कृष्णकुमार गोयल

Image
  पुणे दि.14 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या पाच दिवसीय गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ते बोलत होते.. निर्भय कन्या हा ज्वलंत विषय यावर्षी देखाव्यात सादर करण्यात आला होता.मुलगी ही कुटुंबाचा प्रमुख घटक असून.. सामाजिक उन्नतीचा पाया तिच्या कडूनच रचला जातो.. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला न घाबरता येणाऱ्या आव्हानाला सामोरे जात तिने निर्भयतेने वावरले पाहिजे असेही ते म्हणाले..       या प्रसंगी सहसचिव सुरजभान अगरवाल, संचालक राजेंद्र भुतडा महाविद्यालयाचे प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे , गजानन आहेर, सरिता नायर, घाडगे, शरदचंद्र बोटेकर, नवनाथ जाधव, महादेव रोकडे,मंगेश दळवी आणि संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते  संस्थेच्या सर्व विभागांनी मिळून सालाबाद प्रमाणे ढोल लेझीम, पथनाट्य, दिंडी अशा अनेक कला अविष्कारानी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते..      ज्ञान.. बुद्धी ..आणि शक्तीचे स्त्रोत असणाऱ्या श्री. गणराया कडून  सदसद विवेक बुद्धीने आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे प्रतिपादन सहसचिव डॉ. संजय चाकणे यांन...

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कर्करुग्णांना मिळणार अत्याधुनिक टोमोथेरेपी उपचारप्रणालीव्दारे उपचार

Image
 तळेगावच्या टिजीएच - ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये शासकिय योजनेतंर्गत टोमोथेरपी उपचारप्रणालीव्दारे उपचार देणारे महाराष्ट्रातील पहिले रूग्णालय तळेगाव, सप्टेंबर १०, २०२४ : टिजीएच - ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये MJPJAY (महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य) योजनेतंर्गत मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक टोमोथेरपी या अद्ययावत उपचारप्रणालीचा या योजनेत समावेश झाला असून या आर्टीफिशियल इंटेलिजेन्सचा समावेश असलेल्या या तंत्राने कर्करोग झालेल्या अवयवावर ३६० च्या कोनामध्ये वि-किरण सोडून उपचार केले जातात. यामुळे रुग्णांवर अधिक परिणामकारकरित्या उपचार करणे शक्य होत आहे. या योजनेच्या शुभारंभ स्थानीक आमदार श्री.सुनिल शेळके यांच्याहस्ते करण्यात आला तर याप्रसंगी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख, श्री गणेश खांडगे (प्रसिडेंट-टिजीएच), श्री शैलेश शाह (अध्यक्ष-टिजीएच), डाँ.सत्यजीत वढावकर( सचिव- टिजीएच), डाँ. सचिन देशमुख, कार्यकारी संचालक, प्रताप राजेमहाडीक, संचालक आणि डाँ.संतोष साहू यांच्यासह सर्व ड...

नॅक च्या 'अ ' श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर - कृष्णकुमार गोयल

Image
  ( डावीकडून श्री.आनंद छाजेड राजेंद्र लेले, कृष्णकुमार गोयल , डॉ.संजय चाकणे ,आणि श्री अनिल मेहता) पुणे दि. ८ (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे  नॅक मूल्यांकन दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी पार पडले या मूल्यांकन प्रक्रियेचा निकाल नुकताच नॅक कडून जाहीर करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडल्याचे गोयल यांनी सांगितले..  त्यावेळी महाविद्यालयाच्या लौकिकात  भर पडल्याचे गोयल यांनी सांगितले... पुढे ते म्हणाले की मागील पाच वर्ष वर्षात महाविद्यालयाने अभ्यास,  अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक राष्ट्रीय छात्र सेना, स्पर्धा परीक्षा क्रीडा नेमबाजी या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. यावेळी त्यांनी प्राचार्य संजय चाकणे व राजेंद्र लेले यांचा सत्कार केला.  यावेळी बोलताना प्राचार्य संजय चाकणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले व सर्व क्षेत्रात  विशेषता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या सुधारणा संस्थेने केल्याचे आवर्जून सांगितले. महाविद्यालयाने केलेले संशोधन लिखाण,क्रीडा क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी याचा आढावा घेतल...

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

Image
तळेगाव दाभाडे दि.7 (प्रतिनिधी) गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे.   संस्थेमध्ये ज्या शिक्षकांनी २५ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिली अशा ०९ वरिष्ठ शिक्षकांचा संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांचे हस्ते त्यांना मानपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. यावेळी सम्मानित सर्व शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या प्राचार्य   डॉ. संध्या कुलकर्णी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.  यावेळी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी संस्थेत २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष सेवा दिले...

व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

Image
 लोणावळा दि.५ (प्रतिनिधी) येथील व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दि.05/09/2024 रोजी शिक्षकदिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे व कार्यवाहक डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री.विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर श्री.भगवान आंबेकर,ॲड. संदीप अगरवाल व श्री.नितीन गरवारे, श्री.स्वप्नील गवळी, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला.                      तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व सांस्कृतिक विभागप्रमुख नेहा शाह यांनी देखील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .सर्वप्रथम दीपप्रज्वलन , सरस्वतीपूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच तिसऱ्या वर्षातील  विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर , प्रो. हुसेन शेख, प्रो.सोनी राघो , प्रो.प्रीती चोरडे य...

पीएम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम

Image
  तळेगाव स्टेशन दि. ६ (वार्ताहर)  शालेय क्रीडा विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा (DSO) जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे पार पडल्या. या स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातील 55 ते 60 प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. या क्रीडा स्पर्धेत  पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 6 यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन तालुकास्तरीय 14 वर्षाखालील मुलींचा खो-खो गटात तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे यांचा 1 डाव व 6 गुणांनी पराभव करून तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मोठ्या गटातील 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे या संघाचा दोन गुणांनी पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.             सर्व खेळाडूंचे  शिल्पाताई रोडगे  प्रशासनाधिकारी अधिकारी तळेगाव दाभाडे, मुख्याध्यापक  केशव चिमटे, Asking प्रमुख मार्गदर्शक सुनील जगताप सर, किरण तळपे, कार्तिक मोरे, व सर्व सहकारी शिक्षक यांनी  कौतुक करून शाब्बासकी दिली. जाहिरात व बातमीसाठी संपर्क...

श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक बी ++ गुणवत्ता मानांकन प्राप्त

Image
  लोणावळा दि.५ (प्रतिनिधी) महाविद्यालयास आपला योग्य दर्जा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजे नॅक समितीमार्फत मूल्यांकन होणे आवश्यक असते. महाविद्यालयास मानांकन प्राप्त झाल्यास सदर महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवून प्रदेशात एक चांगल्या विद्यापीठाची संबंध जोडण्याची शक्यता वाढते तसेच कॅम्पस मध्ये येणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढते त्यामुळे विद्यार्थ्यांचे उपलब्ध करिअरच्या संधीची विविधता वाढते. या उद्देशाने नॅक मूल्यांकनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीमती काशीबाई नवले शिक्षण शास्त्र महाविद्यालय लोणावळा या महाविद्यालयाने अर्ज दाखल केला होता. यावेळी नॅक मूल्यांकन तज्ञ समितीकडून महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली होती. या महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली उच्चशिक्षित व शिस्तप्रिय अनुभवी प्राध्यापक नामवंत महाविद्यालयात होत असलेले विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट‚ स्वच्छ इमारती व महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थीना खेळांसाठी लागणारे अद्यावत मैदाने, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ...

मातृभाषेतील ज्ञाननिर्मिती ही शिक्षकांची जबाबदारी - डॉ. रंगनाथ पठारे

Image
  तळेगाव दाभाडे (दि.५ सप्टेंबर): आजचे आधुनिक ज्ञान, विज्ञान हे मातृभाषेत आणले पाहिजे. मातृभाषेत ज्ञानाची निर्मिती करणे ही शिक्षकांची जबाबदारी ठरते. आज इंग्रजी भाषेच्या अनैसर्गिक ओझ्याखाली समाज भरडून निघत असताना जे काही नवीन ज्ञान निर्माण होत आहे ते समजून घेण्यासाठी आपली मातृभाषाच हितकारक असल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित शिक्षक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कवयित्री व शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्य गणेश खांडगे, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ.संजय आरोटे, प्राचार्य गुलाब शिंदे, उपप्राचार्य प्रा.संदीप भोसले, गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व नामांकित कवी डॉ. संभाजी मलघे यांच्या 'अजूनी येतो वास फुलांना' या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते पार पडले. तसेच वर्षभरामध्य...

तळेगाव स्टेशन येथे हॅटसन ॲग्रो अरुण आईसक्रीम च्या आऊटलेटचे उद्घाटन

Image
तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. छत्रपती शिवाजी चौक,  तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी प्रविणकुमार हुलावळे व बंधू प्रदिप व जयसिंग हुलावळे यांनी सुरू केलेल्या हॅटसन ॲग्रो अरुण आईसक्रीम च्या आऊटलेटचे उद्घाटन हुलावळे बंधूंचे आई-वडिल व तळेगाव नगरपरिषदेचे  मा. नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक श्री . सचिनदादा टकले , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वेटलिफ्टर श्री . नितीनजी म्हाळसकर, निवृत्त पोलिस निरिक्षक कविराज पाटोळे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ फुलोत्पादन तज्ञ श्री . अविनाश जी दांडेकर, कृषि पंढरी उद्योगसमुह चे मालक श्री . नितिन जी जगताप , गोविंद ग्रीनहाऊस चे  मालक श्री . बाळासाहेब गाडेकर, कृषी अधिकारी पिरजादे साहेब, किनारा ढाबा मालक निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंखे,  हॅटसन ॲग्रो अरुण आईसक्रीम चे अधिकारी गौरव सिंघ (ZSM ), सुरेश जे . ( RSM ), द्रविड मनी ( RSM ), पुरुषोत्तम बी (RSM ), अरुण आईसक्रीम चे BDM , RDM , BDE , FDE, या  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाले. याप्रसंगी परिसरातील नागरिक बंधू भगिनी व मित्रपरिवार उपस्थित होते.  ...

लक्ष्मणराव आपटे प्रशाला, सखी सावित्री मंच व शिक्षक लोकशाही आघाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न

Image
  पुणे,दि. 4 (प्रतिनिधी)  आपटे प्रशालेमध्ये विद्यार्थिनी सुरक्षा व्याख्यानमालेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. गिरिषा निंबाळकर  यांनी विद्यार्थिनींना पॉक्सो कायदा, समाज माध्यमांचा वापर कसा करावा, तसेच स्वतःचे संरक्षण कसे करावे, तक्रार कोणाकडे करावी, अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे या संदर्भात मार्गदर्शन केले व स्वतःचा फोन नंबर मुलींना संपर्क करण्यासाठी दिला. आपटे प्रशालेच्या दामिनी मार्शल पोलीस कॉन्स्टेबल संगीता खवळे यांनी सुरक्षिततेसंदर्भातील नियम सांगितले. लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या प्राचार्य माननीय मेधा सिन्नरकर यांनी प्रास्ताविकातून मुलींना मनोबल कायम उंच ठेवण्याचा सल्ला दिला. शिक्षक लोकशाही आघाडी पुणे विभागाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव कामथे यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळा कोणकोणत्या गोष्टी करते हे सांगितले व मुले व मुलींनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.  स्वागत आणि सूत्रसंचालन हर्षा पिसाळ  यांनी केले. पाहुण्यांची ओळख टीडीएफ महिला आघाडी पुणे शहर च्या कार्याध्यक्ष कल्पना कोल्हे यांनी सांगितली...

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Image
पुणे दि.४ (प्रतिनिधी) माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी दिली. पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ.दिगंबर दुर्गाडे, डॉ.भाऊसाहेब कारेकर, विजय कोलते, सतीश उरसळ, अजित निगडे, जी.के.थोरात, के.एस.ढोमसे या मान्यवरांच्या हस्ते 15 सप्टेंबरला दुपारी अकरा वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सभागृह सासवड याठिकाणी पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे.  सदर पुरस्कार्थींची निवड समितीचे सदस्य मुरलीधर मांजरे, पंकज घोलप, तानाजी झेंडे, राजेंद्र पडवळ, स्वाती उपार, दत्तात्रय रोकडे यांनी केली. – पुरंदर : इस्माईल सय्यद, शिवाजी कदम, संजय भिंताडे, रमेश जाधव, अबोली भोंगळे, जालिंदर घाटे. – शिरूर : रोहिदास मांजरे, दिपाली गावडे, कैलास पुंडे, तुषार रुके,  प्रकाश चव्हाण. – हवेली : शेखर...

पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Image
  पुणे, दि.4 सप्टें. पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून पुरस्कारांचे वितरण दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी मान्यवरांच्या   उपस्थितीत पुणे मनपाचे सावित्रीबाई फुले सभागृह भवानी पेठ, पुणे येथे होणार आहे असे पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर यांनी कळवले आहे. पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिले जाणारे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार जाहीर झाले आहेत. संघटनेच्या वतीने दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन नियोजन केले जाते. पुणे शहरामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या पुरस्कारांसाठी निवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने खालील पुरस्कारांचा समावेश आहे. जीवनगौरव पुरस्कार-1 विशेष पुरस्कार-3 गुणवंत मुख्याध्यापक-06 ज्युनिअर कॉलेज प्रा.-05 शिक्षक/ शिक्षिका-38 शिक्षकेतर-02 एकूण 55 पुरस्कारांचा समावेश आहे.