Posts

Showing posts from July, 2023

एमआयटी बी.एड्. महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

Image
एमआयटी बी.एड्. महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल आळंदी (प्रतिनिधी ) दि २९ सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या जून 2023 मध्ये घेतलेल्या शिक्षणशास्त्र  पदवी (बी.एड्. )परीक्षेत आळंदी येथील माईर्स ,एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी. एड्.महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला . महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुवर्णा म्हस्के (८२.९० टक्के )यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी दिली .  दोन ते पाच क्रमांक मिळवणारे अनुक्रमे विद्यार्थी ,शितल शेंडे ( ८२.७५%), राजेश्वर पाखरे ( ८२.५०%), प्रणाली सोनवणे ( ८१.९० %), प्रियांका भावे ( ८१.२५ %) प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, डॉ. प्रतिभा दाभाडे, प्रा. अंगद जावळे, डॉ. गंगोत्री रोकडे, डॉ. विकास तुपसुंदर , डॉ. शिल्पा गावंडे , प्रा. संजय शिंदे,  प्रा. दर्शना पवार , प्रा. शेखर क्षीरसागर , प्रा. दिशा ठाकूर , प्रा. संदीप गाडीलकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले . संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . महाविद्यालयाच्या वतीने बी.एड्. हा अभ्यासक्रम अत्यंत आधुनिक पद्ध...

खडू फळा वापरून कुलगुरूंनी घेतला NEP चा वर्ग

Image
  खडू फळा वापरून कुलगुरूंनी घेतला NEP चा वर्ग  पुणे  (प्रतिनिधी) दि 21शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षण महाविद्यालयातर्फे आयोजित जे पी नाईक व्याख्यानमाला अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉ. श्री संजीवजी सोनवणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर दि 20 जुलै 2023 रोजी मार्गदर्शन केले. टिळक शिक्षण महाविद्यालयातर्फे जे पी नाईक व्याख्यानमाला अंतर्गत दर महिन्याच्या 20 तारखेला एका नामवंत शिक्षण तज्ञाचे व्याख्यान ठेवले जाते. दिनांक २० जुलै 2023 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री संजीवजी सोनवणे यांचे व्याख्यान टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या वा. ना. दांडेकर सभागृह आयोजित केले होते. आपल्या व्याख्यानात माननीय कुलगुरूंनी उच्च शिक्षणाचे बदलते स्वरूप शिक्षक प्रशिक्षणासमोरील आव्हाने अकॅडमी क्रेडिट बँक पद्धत पदवी आणि पदव्युत्तर वर्गाची रचना अशा विविध विषयावर पारंपारिक खडू फळाचा उपयोग करून मार्गदर्शन केले. एखाद्या अस्सल शिक्षकांनी तंत्रज्ञान ...

डॉ. सुरेंद्र हेरकळ यांची दोन विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर निवड

Image
 डॉ. सुरेंद्र हेरकळ यांची दोन विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर निवड  पुणे (प्रतिनिधी) दि १७ माईर्स,एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी. एड्. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तसेच,डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे येथील शिक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर पुढील पाच वर्षांसाठी  नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सुरेंद्र हेरकळ मागील 18 वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध विषयांत अशा एकूण 16 पदव्या प्राप्त केल्या आहेत ,9 पुस्तके, 11आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत 29 शोध निबंध आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये प्रसिद्ध झालेले असून, 6 विद्यार्थी  पीएचडीचे मार्गदर्शन घेत आहेत.  डॉ. सुरेंद्र हेरकळ शिक्षक-शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहाय्यक विविध उपक्रम उत्कृष्ट रित्या राबवित आहेत. सदर निवडीबद्दल संस्था, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील...

सुरेशजी चव्हाणके यांची लोणावळा वैक्स म्युझियम व शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सदिच्छा भेट...

Image
 सुरेशजी चव्हाणके यांची लोणावळा वैक्स म्युझियम व शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सदिच्छा भेट... तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) दि. १३ सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी लोणावळा वैक्स म्युझियम आणी शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास नुकतीच भेट दिली. सदर दौरा नियोजित होता. भेटी दरम्यान ते म्हणाले, "दोन्ही संग्रहालये मागील काही वर्षे पर्यटन विकासात मोलाचे योगदान देत आहेत. समाजाची पर्यटनाची भूक भगवणाऱ्या अशा संग्रहालयांचा झालेला विकास हा लोणावळा शहर आणी मावळ तालुक्याचे भूषण ठरले आहे. मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला अवाहन करेल की, त्यांनी या पर्यटन नगरीला आणी विशेष गुणवत्तेने उभारल्या गेलेल्या या संग्रहालयांना निश्चितच भेट द्यावी. श्री. राजेंद्र चौहान, श्री. धवल चौहान व डॉ. प्रमोद बोराडे यांच्या मेहेनेतीने लोणावळा शहरातील या पर्यटन स्थळाला अधिकांश लोकांनी भेट दिली तर आपला इतिहास, संस्कृती आणी परंपरा नव्या पिढीला कळतील.  दुर्मिळ वस्तू व शस्रास्र सहज कुठे पहायला मिळत नाही. मात्र येथे शस्राला प्रत्यक्ष हात लावून अभ्यास करण्याची तथा अनुभूती घेण्याची व्यवस्था ...

प्रा. श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान

Image
  प्रा. श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि. १० हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजचे प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. मनोज गायकवाड यांनी *"पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जागतिकीकरणाच्या दृष्टीने व्यष्टी अध्ययन"* या विषयावर शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातून संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. नवनाथ तुपे  यांचे मार्गदर्शन लाभले. मनोज गायकवाड यांनी पीएच. डी. प्राप्त करीत शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम असवले, सचिव मा. अशोकजी बाफना सो, उपाध्यक्ष मा. बंडोबा मालपाटे यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, आजी माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे.