Posts

Showing posts from June, 2024

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

Image
  पुणे (प्रतिनिधी) दि. 24  राजेंद्र भोजने  व उज्वला टेमगिरे या दोघांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयाची पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली. डॉ. शुभांगी कुऱ्हाडे यांनी या दोघांना टिळक शिक्षण व संशोन महाविद्यालय,पुणे या संशोधन केंद्रांतर्गत संशोधन मार्गदर्शन केले.  पीएच. डी. संशोधन अहवाल सादरीकरण व मौखिक चाचणी परीक्षा शिक्षणशास्त्र  व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे व बहिस्थ परीक्षक डॉ.चंद्रकांत बाविसकर यांच्या उपस्थित झाले. यावेळी  आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. मोहन कांबळे,  अध्यापक महाविद्यालय, अरणेश्वर चे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले, टिळक शिक्षण व संशोधन महाविद्यालयातील डॉ. विजय धामणे, डॉ. सुरेश इसावे, शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातील  डॉ. वैभव जाधव, डॉ. गायत्री चौकडे , डॉ. बाळासाहेब मुरादे , डॉ.बरागडे, डॉ. स्मिता खोपडे उपस्थित होते.  राजेंद्र भोजने  व उज्वला टेमगिरे या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर व...

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी महेश भागीवंत

Image
  तळेगाव स्टेशन दि. 20 (प्रतिनिधी)  तळेगाव दाभाडे येथील युवा पत्रकार महेश सुधाकर भागीवंत यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि जिल्हाध्यक्ष गणेश महाडिक यांनी बुधवारी त्यांना  नियुक्तीपत्र दिले. भागीवंत हे पत्रकारिता क्षेत्रातील पदवीधर असून  विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. सामाजिक  प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी लेखन केले आहे.  एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य मावळ तालुका उपाध्यक्ष पदावर सुद्धा काम केले आहे.  सदर निवड जाहीर होताच पुढारीचे उपसंपादक अमीन खान, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे, प्रेस फाउंडेशन मधील सर्व सदस्य आणि पत्रकार राजेंद्र जगताप यांनी भागीवंत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवा आणि विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि माध्यमातील बदलांचे प्रशिक्षण देण्यावर आपल्या कार्यकाळात काम करणार असल्याचे भागीवंत यांनी सांगितले.

वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळेत नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

Image
तळेगाव स्टेशन दि. १५ : तळेगाव स्टेशन येथील नगरपालिकेच्या वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रं 5 मध्ये नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.           नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थिनींचे  औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रशासन अधिकारी श्रीमती. शिल्पाताई रोडगे मॅडम, मा. नगरसेविका शोभाताई भेगडे, श्री. मनोज लांजेकर, श्री. मयुरेश मुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके  व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.         तळेगाव दाभाडे शहराच्या माजी नगरसेविका सौ. शोभाताई भेगडे यांच्या सहकार्याने मुलींना मोफत वह्यांचे  वाटप करण्यात आले. तसेच कै. लक्ष्मणराव जगताप यांच्या स्मरणार्थ श्री. शंकराव जगताप व श्री.मनोज लांजेकर यांच्या सहकार्याने मुलींना देखील विद्यार्थिनींना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.     सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष बच्चे सर यांनी तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेमधील सर्व...

नॅक मूल्यांकनात एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल

Image
  आळंदीः दि. १२ (प्रतिनिधी) येथील माईर्स, एम आय टी संत ज्ञानेश्वर बीड कॉलेजला नॅक समितीकडून “ ए “हे मानांकन ३.१० CGPA ने प्राप्त झाले. यासोबतच 2023 -24 या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयाने अध्यापक महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च संस्था म्हणून स्थान मिळवलेले आहे . दि. 28 व 29 मे रोजी बंगळूर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद ( नॅक) समितीतर्फे महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली . दोन दिवस या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांचे शैक्षणिक उपक्रम , भौतिक सोयी सुविधा , नवीन उपक्रम , विद्यार्थी शिक्षकांची प्रगती , प्रशासकीय बाबी  तसेच विद्यार्थी , पालक व माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली तसेच प्राध्यापकांसाठी सर्व गुणसंपन्न असा शेरा त्यांनी दिला . सदर नॅक समितीचे अध्यक्ष प्रा. तिरुमलाई कुमार एस.  नॅक समन्वयक प्राध्यापक रेणु नंदा व सदस्य डॉ.अभय कुमार परमार हे होते. महाविद्यालयाचे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये सर्व समावेशकता असून आणि समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्न करतात . प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना वैयक्ति...

प्रा. संतोष थोरात स्व. शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
  राजगुरुनगर ता. 9 जून 2024 आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर शाळेतील विद्यार्थी प्रिय, इंग्रजी विषयाचे शिक्षक संतोष थोरात यांना राजगुरुनगर येथे स्व. शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार खेडचे कार्यसम्राट आमदार दिलीपजी मोहिते पाटील यांच्या हस्ते व राज्याचे अध्यक्ष मा. आमदार नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष जी.के. थोरात, खेडचे मा. आमदार राम कांडगे, शिरूरचे मा. आमदार पोपटराव गावडे पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे राज्याचे सचिव हिरालाल पगडाल, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर साहेब, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, सचिव पंकज घोलप , माध्यमिक विभागाचे सचिव प्रा. सचिन दुर्गाडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.   टीडीएफ चे माजी आमदार स्व. शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टीडीएफ यांच्या वतीने करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम राजगुरुनगर येथील खांडगे लॉन्स कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होत...

प्रा. संतोष थोरात व सौ.भारती राऊत यांना स्व. मा.आमदार शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Image
पुणे,ता.7 मे 24 विमाननगर मधील आनंद विद्यानिकेतन हायस्कूल मधील  विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू,इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रा.संतोष थोरात यांना तसेच गॅरीसन  चिल्ड्रन हायस्कूल खडकी येथील अष्टपैलू शिक्षिका सौ. भारती राऊत यांना नुकताच स्व. माजी आमदार शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी 9 जून रोजी या पुरस्काराचे वितरण होते. टीडीएफ चे आमदार शिवाजीदादा पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ हे  पुरस्कार जिल्हा टीडीएफ व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित केले जातात.      प्रा. संतोष थोरात हे गेली 20 ते 22 वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून विद्यार्थी व शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच ते  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात तसेच ते इंग्रजीचे लेखकव, पत्रकार असून व्याख्याते सुद्धा आहेत. आतापर्यंत त्यांची तीन इंग्रजीची पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे संशोधन करीत आहेत तसेच पुणे शहर टीडीएफ घ्या अध्यक्ष पदाची जबा...