राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

 

पुणे (प्रतिनिधी) दि. 24  राजेंद्र भोजने  व उज्वला टेमगिरे या दोघांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयाची पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली. डॉ. शुभांगी कुऱ्हाडे यांनी या दोघांना टिळक शिक्षण व संशोन महाविद्यालय,पुणे या संशोधन केंद्रांतर्गत संशोधन मार्गदर्शन केले. 

पीएच. डी. संशोधन अहवाल सादरीकरण व मौखिक चाचणी परीक्षा शिक्षणशास्त्र  व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे व बहिस्थ परीक्षक डॉ.चंद्रकांत बाविसकर यांच्या उपस्थित झाले. यावेळी  आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. मोहन कांबळे,  अध्यापक महाविद्यालय, अरणेश्वर चे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले, टिळक शिक्षण व संशोधन महाविद्यालयातील डॉ. विजय धामणे, डॉ. सुरेश इसावे, शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातील  डॉ. वैभव जाधव, डॉ. गायत्री चौकडे , डॉ. बाळासाहेब मुरादे , डॉ.बरागडे, डॉ. स्मिता खोपडे उपस्थित होते. 

राजेंद्र भोजने  व उज्वला टेमगिरे या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर व  मार्गदर्शक डॉ. शुभांगी कुऱ्हाडे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

Comments

  1. डॉ . राजेंद्र भोजणे व डॉ उज्वला टेमगिरे कठोर परिश्रम घेवून आम्ही ज्या आनंदी क्षणाची वाट पाहत होतो तो अखेर आज उगवला . तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश