Posts

Showing posts from November, 2022

आयुष्य मौल्यवान आहे,तरुणांनी काळजी घेणे महत्त्वाचे - प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

Image
  आयुष्य मौल्यवान आहे,तरुणांनी काळजी घेणे महत्त्वाचे - प्राचार्य डॉ. संभाजी मलघे तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि.१ : येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जन-जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना या रोगाबद्दल अधिक शास्त्रशुद्ध माहिती मिळावी म्हणून प्रा. राखी चौडणकर यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. रोहित नागलगाव,प्रा. राखी चौडनकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्यडॉ. मलघे म्हणाले की,आपल्याला कोरोना महामारीने आरोग्याच्या बाबतीत खूप जागृत केले आहे.परंतु आरोग्याच्या बाबतीत आपण सदैव जागृत असायला हवे. त्यामुळे एड्स सारखे आजार पसरणार नाहीत. अनैतिक, चुकीच्या अशा अनेक कारणांनी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तरूणांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आयुष्य मौल्यवान आहे. या वयात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याचे प्राचार्य म्हणाले. खेळ, योग-प्राणायाम याकडे जास्त लक्ष देत प्र...

डॉ. शुभांगी सूर्यकांत कुऱ्हाडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
 डॉ. शुभांगी सूर्यकांत कुऱ्हाडे  राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित  तळेगाव स्टेशन (संपादक डॉ.संदीप गाडेकर) दि. 30 महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह व रयत प्रकाशन यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे या ठिकाणी संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 61 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल  पुणे येथील अध्यापक महाविद्यालय अरण्येश्वर येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ.शुभांगी सूर्यकांत कुराडे यांना हा पुरस्कार श्री.राजू शेट्टी, श्री. ज्ञानेश महाराव, डॉ.पी.ए. इनामदार व श्री.श्रीमंत कोकाटे यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल सर्व शैक्षणिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे यांना मातृशोक

Image
 प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे यांना मातृशोक तळेगांव दाभाडे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय चिंचवड, पुणे येथील प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे यांच्या मातोश्री गं.भा. सिंधुबाई लक्ष्मण वाणी (कोठावदे) यांचे गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पश्चात मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे गंधमुक्ती व उत्तरकार्य मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्रमभक्ती भवन, मुंबई- पुणे रोड बजाज ऑटो समोर, आकुर्डी, पुणे. या ठिकाणी होणार आहे.

अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

Image
 अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा  तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि. 27 वडगाव मावळ येथील श्री. संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात 26 नोव्हेंबर 2022 रोजी 'भारतीय संविधान दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे होत्या. यावेळी डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. ज्योती रणदिवे, प्रा. सोनाली पाटील, श्री. संतोष ढमाले व बी.एड. व एम. एड. चे विद्यार्थीशिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्री.तुकाराम असवले व सचिव श्री.अशोक बाफना यांनी कौतुक केले.

डॉ. सुरेंद्र हेरकळ भूषण पुरस्काराने सन्मानित

Image
  डॉ. सुरेंद्र हेरकळ भूषण पुरस्काराने सन्मानित तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज आळंदी देवाची, पुणे येथील प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांना नुकताच ग्लोबल रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने पद्मश्री मा. पोपटराव पवार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे सभागृहात शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत " भूषण पुरस्कार" प्रदान करण्यात आला. डॉ. सुरेंद्र हेरकळ मागील 17 वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. तसेच मागील 7 वर्षेपासून ते एम. आय. टी संस्थेत प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. भूषण पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आला. आजपर्यंत त्यांनी 15 पदव्या, 7 पुस्तके , 1 पेटंट, 9 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार त्यामध्ये ग्लोबल टीचर आॅवर्ड चा समावेश असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. 6 विद्यार्थी त्यांकडे पीएच.डी चे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांचे 27 संशोधन पेपर हे आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रात...

आई-वडिलांमुळे आपण आहोत, त्यामुळे बायकोचे थोडेसेच आणि आई वडिलांचे जास्त ऐका; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Image
  तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदिप गाडेकर) आई-वडिलांमुळे आपण आहोत, त्यामुळे बायकोचे थोडेसेच आणि आई वडिलांचे जास्त ऐका; असा मार्मिक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि. २२) पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे केंद्रीय राखीव पोलीस दल आयोजित रोजगार मेळाव्यात दिला. तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ केंद्र येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते, केंद्र सरकारच्या विविध विभागात/संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या २१३ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा 'रोजगार मेळावा' सुरु केला - आठवले यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की, आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. “देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पूनम लहु सोनवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. जाहीर

Image
 पूनम लहु सोनवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. जाहीर  तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.23 पूनम लहु सोनवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. जाहीर झाली. त्यांनी इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या विद्याशाखेअंतर्गत आपला शोधप्रबंध "इनक्लूजिव एज्युकेशन एक्सलेन्स मॉडेल फॉर सेकंडरी स्कूल" या विषयामध्ये सादर केला. त्यांना शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील विभागप्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) संजीव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल शिक्षणक्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे

श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेचा दिंडी सोहळा संपन्न

Image
 श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेचा दिंडी सोहळा संपन्न तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि. 22 मावळ विकास मंडळ संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण (आजिवली) या शाळेचा कार्तिक एकादशीनिमित्त दिंडी सोहळा अतिशय उत्साहाने पार पडला. पालखीचे पूजन संस्थापक संचालिका स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ.‌बाळसराफ यांनी दिंडीचा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पारमार्थिक भावना वाढीस लागत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमध्ये उच्च-नीचता हा भेदभाव जाऊन सर्व समान असल्याची भावना वाढीस लागते असे सांगून  भारतीय संस्कृतीचा अभिमान मुलांच्या मनामध्ये विकसित होऊन संस्कारांची पाळेमुळे अधिक घट्ट होतात त्यामुळे आध्यात्मिक दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास चालना मिळते, अशी भावना व्यक्त केली.  शाळेपासून निघालेली दिंडी वाघेश्वर गावाकडे जाताना दिंडी सोहळ्यातील विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणी संत देखावा वारकरी यांचे प्रतीकात्मक दर्शन घडले व सर्व वातावरण विठ्ठलमय झाले होते. विद्यार्थ्यांनी भजन गौळण,  अभंग इत्यादी माध्यमातू...

आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमान नगर मधील विद्यार्थी गिरवतायेत जर्मन भाषेचे धडे

Image
 आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमान नगर मधील विद्यार्थी गिरवतायेत जर्मन भाषेचे धडे  पुणे, विमाननगर दि.17 नोव्हें.2022.  आनंद विद्यानिकेतन हायस्कूल हे विमान नगर मधील  विद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या नवनवीन उपक्रमामुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच विद्यालयामध्ये german language learning course सुरू करण्यात आलेला आहे या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची नामी संधी उपलब्ध झालेली आहे.   श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेच्या कार्यवाह श्रीमती किरण तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,इनर व्हील क्लब ऑफ रिव्हर साईट पुणे व FLOA यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबच्या अध्यक्षा श्रीमती माधवी चंदन मॅडम यांच्या पुढाकारातून प्रशालेमध्ये हा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे.  या कोर्स साठी जवळपास100  विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ या कोर्सचे  समन्वयक संतोष थोरात यांच्या माध्यमातून FLOA या संस्थेचे समन्वयक श्री शैलेश लेले यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण दिले जात ...

नूतन विद्यामंदिर व ॲड. पु.वा. परांजपे विद्या मंदिर अमृत महोत्सवी वर्ष साजरे

Image
  नूतन विद्यामंदिर व  ॲड. पु.  वा. परांजपे विद्या मंदिर  अमृत महोत्सवी वर्ष साजरे   तळेगांव स्टेशन दि. 18 (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) ॲड.पु.वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये 17 नोव्हेंबर 2022 रोजी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर करणारा दीपोत्सव मंगलमय, आनंदी व उत्साही वातावरणात घेण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ शिक्षण महर्षी, मावळ भूषण, माजी आमदार श्री. कृष्णरावजी भेगडे साहेब यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार,यादवेंद्र खळदे,विनायक अभ्यंकर,शंकर नारखेडे,डॉ.प्रमोद बोराडे, डॉ.सत्यजित खांडगे, डॉ.संदीप कांबळे संदीप पानसरे अमर जीत ढालपे माझी शिक्षिका चेतना वैद्य मॅडम,माझी विद्यार्थी शालेय समिती सदस्य अशोक काळोखे,रमाकांत नायडू,नगरसेवक संतोष भेगडे बासरकर मॅडम आजी माझी शिक्षक विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील  मंडळी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या दिव्याची माहिती शाळेतील अध्यापिका ...

अड.पू. वा.परांजपे विद्यामंदिरात मराठी तसेच हिंदी या विषयांची पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

Image
  ऍड.पू. वा.परांजपे विद्यामंदिरात मराठी तसेच हिंदी या विषयांची पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन तळेगांव स्टेशन (संपादक-संदीप गाडेकर) दि ९  नोव्हेंबर रोजी अड.पू. वा.परांजपे विद्यामंदिरात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग  तर्फे मराठी तसेच हिंदी या विषयांची कार्यशाळा बुधवार दिनांक नऊ ते रविवार दिनांक 13 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज नू.म.वि. प्र.मंडळाचे सचिव माननीय श्री.संतोषजी खांडगे साहेब, न्यू समर्थ स्मार्ट स्कूलचे कार्यकारी संचालक  श्री संजय देशमुख सर  व श्री सुरेश पांडे सर ,प्रगती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री सुदाम वाळूंज सर ,समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री संजय वंजारे सर , परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक  श्री पांडुरंग पोटे सर तसेच सर्व शाळांमधील मराठी विषयाचे अध्यापक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत श्रीपांडुरंग पोटे सरांनी केलं तर आलेल्या पाहुण्यांसाठी आरोग्यवर्धक तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. सुरेश पांडे सर तस...

' तेजोमयी वातावरणात तळेगावात साकारले पंढरपूर! दीपोत्सवात उजळले श्री डोळसनाथ महाराज मंदिर!

Image
  ' तेजोमयी वातावरणात तळेगावात साकारले पंढरपूर! दीपोत्सवात उजळले श्री डोळसनाथ महाराज मंदिर!    तळेगाव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि 8 -  ' दिवे लागले रे, दिवेलागले तमाच्या तळाशी दिवे लागले या उक्तीप्रमाणे जीवनातील अंधःकार दूर सारून आपले आत्मरूप जागविण्याची ताकद दीपोत्सवात आहे. या जाणिवेतून श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४१०० दिव्यांच्या तेजोमय वातावरणात श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रंगावलीच्या रूपात साक्षात पंढरपूर अवतरले होते.  याप्रसंगी माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, आमदार सुनिल शेळके, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक अरुण माने, अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे, प्राची हेंद्रे,सुनिता काळोखे,शैलजा काळोखे,ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सरोदे, हभप ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे, दिलीप शहा,यतीन शहा,हेमंत दाभाडे, डोळसनाथ पतसंस्थेचे ...